फुलांना उत्सवामुळे तेजी

अहमदनगर : गौरी,गणपती व त्यापाठोपाठ नवरोत्रोत्सव,दिवाळी या सणांच्या पार्श्वभुमीवर बाजारात सध्या फुलांना चांगली मागणी वाढली आहे. मात्र पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे अनेक भागातील फूलशेती बहरलीच नाही. त्यामुळे त्यातुलनेत यंदा फुलांचे उत्पादन घटले असून,फुलांना चांगला भाव मिळत आहे. . नगर तालुक्यातील अकोळनेर,सारोळा कासार,घोसपुरी,चास,कामरगाव,पिंपळगाव माळवी,डोंगरगण,बारादरी,दरेवाडी आदी भागात फूलशेती केली जाते. मात्र यावर्षी पडलेल्या दुष्काळाने फूलशेतीत घट झाली आहे. … Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

संगमनेर : तालुक्यातील एका चोवीस वर्षीय तरुणीला दिनेश बाळू बर्डे (पत्ता माहीत नाही) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सोमवार दि. २७ मे २०१९ रोजी घडली. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही चोवीस वर्षीय तरुणी दिनेश बाळू बर्डे याच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी आली होती. त्यावेळी दिनेश बर्डे याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर … Read more

रिपाइं भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही !

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना व मित्रपक्षाच्या महायुतीचाच विजय होईल. रिपब्लिकन पक्षाने १० जागांची मागणी केली असून रिपाइं भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावरच लढू, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी नागपुरात आले असता आठवले यांनी रविभवन येथे पत्रकारांशी संवाद … Read more

४० वेळा गोळ्या झाडत फिल्मी स्टाइल गोळीबार करीत गुंडाला पळविले…

जयपूर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील बहरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी सहा अज्ञातांनी एके-४७ ने फिल्मी स्टाइल गोळीबार केला. यावेळी ४० वेळा गोळ्या झाडण्यात आल्या असता पोलिसांसोबत चकमकीचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यामागून ठाण्यात कैद असलेला कुख्यात गुंड विक्रम गुर्जर ऊर्फ पापला याला पळवून नेण्यात हल्लेखोर यशस्वी ठरले आहे. या आश्चर्यकारक घटनेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ … Read more

सुप्रिया सुळे ठरल्या नंबर वन खासदार!

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवडण्यात आलेले आहे. लोकसभा सदस्य म्हणून ही त्यांची तिसरी टर्म आहे. लोकसभेत विविध प्रश्न उपस्थित करत पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात त्यांना सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवडण्यात आलेले आहे. . … Read more

लिव्ह-इन रिलेशनशिप प्रथा बंद करा!

जयपूर : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ या प्रथेमुळे महिलांचा ‘उपवस्त्रा’सारखा वापर होत आहे. अशा नात्यात त्या रहात असल्याने त्यांच्या मूलभूत अधिकारांवरही गदा येऊ लागली आहे. राज्यातच नव्हे तर देशात या संबंधीच्या अनेक तक्रारी-याचिका दाखल झाल्या आहेत. महिलांवर आत्मसन्मान गमावण्याची पाळी या नातेसंबंधांमुळे येत असल्याने अशा प्रथांना समाजातून हद्दपार करण्याची गरज असल्याचे मत राजस्थान मानवाधिकार आयोगाने व्यक्त केले असून … Read more

भुलथापांचे राजकारण व चुकीच्या निर्णयाने देशात आर्थिक मंदी

अहमदनगर ;- भुलथापांचे राजकारण व चुकीच्या निर्णयाने देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. देशातील युवकांना नोकर्‍या तर मिळाल्या नसून, आहे त्या नोकर्‍या देखील धोक्यात आल्या आहेत. शाश्‍वत विकासाचा पर्याय राष्ट्रवादीच्या माध्यमातून युवकांना दिसत आहे. अल्पसंख्यांक समाजातील युवकांना राष्ट्रवादीत नेहमीच न्याय व सन्मान देण्याचे काम करण्यात आल्याची भावना राष्ट्रवादीचे मा.शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी … Read more

आळशी जीवनशैली दुपटीने वाढविते मृत्यूचा धोका

लंडन : आजच्या काळात जीवनशैलीशी संबंधित समस्या सामान्य झाल्या आहेत. खराब दिनचर्येमुळे लोकांना विविध प्रकारचे आजार विळख्यात घेत असल्याचे डॉक्टरही सांगत आहेत. मात्र हे कुणीच फारसे मनावर घेत नाही. आता एका ताज्या अध्ययनातून काही अशा गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या तुम्हाला आपल्या जीवनशैलीत बदल करणे भागच पडेल. या अध्ययनानुसार, समजा तुम्ही सतत सुस्तावलेले जीवन जगत … Read more

जंक फूडच्या अतिसेवनामुळे हिरावली त्याची दृष्टी

लंडन : ब्रिटनमधील १७ वर्षाच्या मुलाची दृष्टी हिरावली गेली असून त्याला ऐकायलाही कमी येऊ लागले आहे. याचे कारण अतिशय विचार करायला लावणारे आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्याने चिप्स, बर्गर, फ्रेंच फ्राइज याव्यतिरिक्त काहीच खाल्लेले नाही. म्हणजे गेले दशकभर तो फक्त जंक फूडवर जगत राहिला. माध्यमिक शाळेत प्रवेश घेतल्यापासून हेच त्याचे अन्न झाले. ब्रिस्टलमधील मुलांच्या रुग्णलयातील … Read more

मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

जामखेड : तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मळणी यंत्राव्दारे उडिदाची मळणी करत असताना,मळणी यंत्रात गेल्याने मंगल अशोक भाकरे (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील हभप भाकरे महाराज यांच्या पत्नी मंगल अशोक भाकरे यांचा उडदाची मळणी करत असताना मळणी यंत्रात डोके गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू … Read more

दारू पिण्यास पैसे न दिल्याने राडा

अहमदनगर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघांनी मित्रालाच कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. ही घटना बोल्हेगाव येथील जॉगिंग ट्रॅक येथे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गणेश शंकर वाकळे, आकाश गोरख कोलते (दोघेही रा. बोल्हेगाव, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या … Read more

बघायचं नाही, बोलायचं हा नवा मंत्र : अभिषेक कळमकर

अहमदनगर : शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी सर्वसामान्य नगरकरांचा आवाज उठणे गरजेचे आहे. अहमदनगर स्पीक्सच्या माध्यमातून नगरच्या सर्वांगीण विकासाचा आवाज बुलंद होणार आहे,असे स्पष्ट करीत अहमदनगर स्पीक्स या चळवळीची घोषणा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत केली. हि चळवळ राजकारणविरहित असून फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ चालणार आहे.यासाठी कळमकर यांनी पुढाकार घेतला आहे.बघायचं नाही,बोलायचं असा मंत्र या … Read more

कडकनाथ कोंबडी पालनात शेतकऱ्यांची फसवणूक

राहाता : तुम्ही फक्त कोंबडी वाढवा आणि परत द्या. बाजारातील इतर कोंबड्यांपेक्षा आम्ही तिला २०० ते २५० रुपये जास्त भाव देऊ, असे आमिष दाखवून कडकनाथ कोंबडी मार्केटिंगची साखळी चालविणाऱ्या एका कंपनीने राहाता व कोपरगाव तालुक्यातील सुमारे १५ शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. कडकनाथ कोंबडी चांगली असल्याचा मोठा गाजावाजा करीत एका कोंबडी मार्केटिंग कंपनीने शेतकऱ्यांना … Read more

नारायण राणे हद्दपार, त्यांना दुर्बिण घेऊन शोधावे लागेल

शिर्डी : राज्याच्या राजकारणातून नारायण राणे हद्दपार झाले असून, त्यांना राजकारणात दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, असे स्पष्ट करत त्यांनी हवं तिथं जावं शिवसेना त्यांना भूईसपाट करण्यास सक्षम असल्याचे शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी सांगितले. कुचिक हे किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आहेत. नुकतेच त्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईभक्त व कर्मचाऱ्यांसंदर्भात ते नेहमी … Read more

दामदुप्पटीच्या आमिषाने २९६ लोकांना गंडा

संगमनेर : संगमनेरात सुरुअसलेल्या फिनॉमिनल हेल्थ केअर स्व्हिहसेस कंपनीने २९६ लोकांना दामदुप्पटीचे आमीष दाखवून ८१ लाख २९ हजार ३८७ रूपयांची फसवणूक केली आहे. ही घटना दि. २८ फेब्रुवारी २००९ ते जून २०१६ या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी सातजणांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर याठिकाणी … Read more

७४ व्या वर्षी आजी झाली आई !

गुंटूर : वयाच्या ७४ व्या वर्षी एका महिलेने कृत्रिम गर्भधारणेच्या माध्यमातून जुळ्या मुलींना जन्म दिल्याची सुखद घटना गुरुवारी आंध्रप्रदेशच्या गुंटूर शहरात घडली. लग्नाच्या ५७ वर्षांनंतरदेखील बाळ होत नसलेल्या या वयोवृद्घ दाम्पत्याने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करत बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनुसार या वयात आई होण्याचा हा जागतिक विक्रम असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद होण्याची … Read more

फेसबुक पुन्हा वादात, ४१ कोटी यूझर्सचे फोन नंबर लीक !

 वॉशिंग्टन : जगातील आघाडीचे सोशल माध्यम असलेले फेसबुक डेटा चोरीवरून पुन्हा वादात आले आहे. फेसबुकच्या ४१.९ कोटी वापरकर्त्यांचे फोन नंबर चोरीला गेल्याचे वृत्त आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे वापरकर्त्यांना फेक कॉल आणि सीम स्वॅपिंगसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो; परंतु फेसबुकने ही माहिती जुनी असून यामुळे घाबरण्याचे … Read more

नव्या पवारांचा उदय होतोय,उद्धव ठाकरेंकडून रोहित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

अहमदनगर :- बारामतीत नव्या पवारांचा उदय झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?’ या अमित शाह यांच्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिलेल्या उत्तरामध्ये विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत असंही या अग्रलेखात म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते येत्या … Read more