देशाची अर्थव्यवस्था अनागोंदीत आनणार्‍या हुकुमशाहीचा निषेध !

अहमदनगर :- भाजप प्रणित मोदी सरकारच्या हुकुमशाही निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था अनागोंदीत सापडल्याचा पीपल्स हेल्पलाईन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारकात निषेध नोंदविण्यात आला. तर अर्थव्यस्थेसाठी वारंवार धोक्याचा इशारा देणारे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना इंडियन लॉरिस्टर अगेन्स्ट गव्हर्नन्स इन्ट्रॉपी सन्मानची मानवंदना देण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, शाहीर … Read more

अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

शेवगाव :- तालुक्यातील मुरमी येथे पावसात अंगावर वीज पडल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देवराव साहेबराव गरड (वय ७०), असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना गुरुवारी रोजी रात्री नऊ वा. घडली. तर याच दिवशी सामनगाव येथे पावसामुळे गंगाधर म्हस्के यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून एक गाय दगावली. शुक्रवारी देवराव गरड हे घराच्या पडवीत झोपले … Read more

थोरातांच्या तालुक्यात विखे पाटलांकडून विकासकामांसाठी १ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर!

संगमनेर :- तालुक्यातील १६ गावांमधील मूलभूत सुविधांकरिता युती सरकारच्या माध्यमातून १ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. सावरगाव तळ, मालुंजे, निमोण, अंभोरे, चंदनापुरी, जोर्वे, मनोली, शिबलापूर, आश्वी खुर्द व बुद्रूक, ओझर खुर्द, कोल्हेवाडी, चिंचपूर, पिंपरी लौकी, उंबरी बाळापूर या गावांचा यात समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठीचा प्रस्ताव … Read more

आमदार राहुल जगताप यांच्या निधीतील तब्बल ३ कोटी ८० लाख खड्ड्यांत…

श्रीगोंदा :- ढवळगाव ते बेलवंडीफाटा रस्त्यावर खर्च केलेले ३ कोटी ८० लाख खड्ड्यात गेले आहेत. डांबरीकरणास चार महिने उलटत नाही तोच ठिकठिकाणी मोठ्ठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे, तर काही ठिकाणी डांबरी रस्ता आहे की नाही अशी शंका येते. बऱ्याच ठिकाणी दीड मीटर रुंदीच्या साईडपट्ट्या केलेल्या नाहीत. बेलवंडीफाटा ते ढवळगाव रस्ता पुढे … Read more

आमदार मुरकुटे यांची आजपासून विकास दिंडी

नेवासा :- आमदार बाळासाहेब मुरकुटे हे विकास दिंडीच्या माध्यमातून मंगळवारपासून १२ सप्टेंबरपर्यंत नेवासे तालुक्यातील गावोगावी जनजागृती करणार करणार आहेत. केंद्र व राज्य सरकारने गोरगरिबांसाठी राबवलेल्या योजनांसह लोकप्रतिनिधी नात्याने तालुक्यातील विकासकामांचा लेखाजोखाही ते गावोगावच्या बैठकांत जनतेसमोर ठेवणार आहेत. जिल्ह्यात विकासकामांचा सर्वाधिक ओघ नेवासे तालुक्यात आणल्याचा आमदार मुरकुटे यांचा दावा आहे. तालुक्यातील प्रमुख रस्ते, सभामंडपासह अंतर्गत रस्ते, … Read more

शरद पवार यांच्या विषयी सोशल मिडीयावर बदनामी कारक मजकूर

शिर्डी : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याविषयी सोशल मिडीयावर बदनामीकारक लिखाण करुन जनतेच्या भावना दुखावणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले. लोणी पोलीस स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोशल मिडीयावर एका व्यक्तीने माजी केंद्रीय मंत्री … Read more

प्रसिद्ध निवेदक आणि रेडिओ जॉकी आर.जे ऋषि शेलार यांना महाराष्ट्राचा युवा आयडॉल पुरस्काने सन्मान

अहमदनगर :- आपल्या सुमधुर आवाजे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे निवेदक ,युवा व्याख्याते ,लेखक, कवी, रेडिओ जॉकी, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व ऋषिकेश शेलार यांना  महाराष्ट्राचा युवा आयडॉल निवेदक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या अनोख्या आवाजाने त्यानी रसिक प्रेक्षकांना अगदी थोड्या दिवसात आपलेसे केले आणि संपूर्ण महाराष्ट्राचा साठी त्यांचे व्यक्तीमत्व एक आदर्श बनून गेले.  सर्व … Read more

विधानसभेसाठी भाजपकडून राहुल झावरे ?

पारनेर :- अहमदनगर जिल्ह्यात राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर १२-०घोषणा करुन त्यादृष्टीने जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात बांधणी सुरु केली. पारनेर -नगर विधासभा मतदारसंघासाठी भाजपकडून विखे कुटूबियांशी पस्तीस वर्षापासून घनिष्ठ संबध असलेले माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे पुत्र पारनेर पंचायत समिती सभापती राहुल झावरे यांना विधानसभेसाठी तयारीला लागण्याचे विखेंनी आदेश देवून प्रवरेची यंत्रणा सक्रिय केल्याने … Read more

अजित पवारांना अटक होण्याची शक्यता

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे.  राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला असल्याने अजित पवार यांना अटक होवू शकते. काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका आणि राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर अटकेची कारवाई झालीच तर संरक्षण मिळावं यासाठी हा प्रयत्न असल्याचं बोललं … Read more

विवाहित तरुणीची आत्महत्या

राहाता : तालुक्यातील साकुरी येथे एका विवाहितेने छपराच्या बांबुला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील कविता विजय गायकवाड (वय १८) ही विवाहित महिला साकुरी येथील १३ चारीजवळ बनरोड येथे माहेरी आली होती. काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास ती तीच्या … Read more

पोलीस व ग्रामस्थ यांच्यात समन्वय आवश्यक – वैभव पिचड

राजूर : पोलीस प्रशासन व ग्रामस्थात समन्वय असल्यास गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडेल, असा विश्वास वैभव पिचड यांनी अकोले तालुक्यातील राजूर येथे शांतता कमिटीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना व्यक्त केला. मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राजूर येथील शासकीय विश्रामगृहावर ग्रामस्थ, मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, पत्रकार व शांतता कमिटी यांची बैठक मा. आ. … Read more

मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा खून झाल्याच उघड

श्रीरामपूर : शहरातील सूतगिरणी परिसरात राहणारे रामदास भीमराज कडनोर (वय ३४) यांचा मृतदेह कालव्यात आढळून आला होता. पोलीस तपासात त्यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, रामदास कडनोर यांचा मृतदेह दि. १६ ऑगस्ट रोजी वॉर्ड क्र. दोनमध्ये कालव्यात आढळून आला होता. … Read more

नापिकीला कंटाळुन शेतकर्याची गळफास घेवुन आत्महत्या

पारनेर :- गेल्या दोन तीन वर्षापासुन पाचविला पुजनेला दुष्काळ आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने पदरी आलेल्या नापिकीला कंटाळुन गारगुंडी( ता. पारनेर) येथील तरूण शेतकरी नितीन प्रकाश झावरे (वय-३८ ) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असुन पारनेर पोलिस ठाण्यात याबाबत खबर देण्यात आली … Read more

संगमनेर तालुक्यात भूकंपसदृश्य धक्के

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील बोटा माळवाडी परिसरात शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री भूकंपसदृश्य सौम्य धक्के बसले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही असे धक्के वारंवार बसलेले आहेत. गेल्या काही वर्षापासून बोटा परिसरासह आजूबाजूच्या गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत. तर काही धक्के मोठे बसलेले असल्याने त्या धक्क्यांची नोंदही नाशिक येथील मेरी … Read more

भाऊसाहेब कांबळेंचा सेना प्रवेश लांबणार ?

श्रीरामपूर : भाऊसाहेब कांबळे यांच्या शिवसेना प्रवेशाची तारीख 5 सप्टेंबर निश्चित झाली असली तरी शिवसेनेमधील अंतर्गत विरोधामुळे हा प्रवेश लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व शहराध्यक्ष सचिन बडदे हे कांबळे यांना मातोश्रीवर घेऊन गेले. हा निर्णय घेताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आ. नरेंद्र दराडे, खा. सदाशिव लोखंडे … Read more

या हॉटेलमध्ये होणार भाजप इच्छुकांच्या मुलाखती

नगर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांच्या मंगळवारी होणाऱ्या मुलाखती एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या. या मुलाखती बुधवारी होतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी दिली. तारकपूर येथील व्ही स्टार हॉटेलमध्ये या मुलाखती होतील. अकोले ११ ते ११.३०, संगमनेर ११ ते १२, कोपरगाव १२ ते १२.३०, शिर्डी १२ ते १ ,श्रीरामपूर १ ते १.३०, नेवासे १.३० … Read more

कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची आत्महत्या

नगर: चास येथील शेतकरी बाबासाहेब चांगदेव कार्ले (४०) यांनी कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. नगर तालुक्यातील ऑगस्ट महिन्यातील ही चौथी शेतकरी आत्महत्या आहे. बाबासाहेब यांच्या वडिलांच्या नावे अवघी चार एकर जिरायत जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने उत्पन्न नव्हते. पतसंस्थेचे आणि सावकारांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातून त्यांनी … Read more

चकमकीत भाजप खासदाराचे फुटले डोके !

कोलकाता: पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या डोक्याला रविवारी जखम झाली. बराकपूरचे पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांनी मारहाण केल्यानेच आपल्या डोक्याला मोठी जखम झाली, असा आरोप सिंह यांनी केला आहे. खासदार अर्जुन सिंह यांनी सांगितले की, श्यामनगर येथील भाजपच्या कार्यालयाचा ताबा घेतल्याच्या मुद्द्यावरून … Read more