माजी आमदार यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे व चंद्रशेखर घुले यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता

अहमदनगर :- राज्याची शिखर बँक मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे हजारो कोटी रुपयांची कर्जे नियमबाह्यपणे वितरित केल्याने बँक अडचणीत सापडली. त्य़ामुळे यातील दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल होती. त्यावर निकाल देताना संबंधितांविरुद्ध पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे २००५ ते २०१० या काळात या बँकेवर … Read more

श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर : शहरातील भूमिगत गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे १३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्यासह पाच जण व दोन ठेकेदार संस्थांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, … Read more

रखडलेले मूलभूत प्रश्न शिवसेनेने मार्गी लावले : राठोड

अहमदनगर : अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्याचे काम शिवसेनेने केले आहे. आज सुरू करण्यात आलेले रस्त्याचे काम १५ वर्षांपासून रखडले होते. मागील काळात या भागातून निवडून आलेल्या विरोधी नगरसेवकांनी फक्त पदे भूषविली आणि विकासकामांत खोडा घालण्याचे काम केले. जेव्हा जेव्हा मनपावर युतीची सत्ता राहिली, तेव्हा शहरातील विकासकामांना वेग आला. विरोधकांची सत्ता असताना विकासकामे … Read more

कांदा मागितल्याने तिघास बेदम मारहाण

अहमदनगर : तालुक्यातील बाबुर्डी बेंद फाट्याजवळील राजविर हॉटेल व लॉजिंगवर कांदा मागितल्या कारणावरून तिघास लोखंडी पाईप, खोऱ्याच्या दांड्याने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात ६जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज बाजीराव चोभे, लखन चोभे, दत्ता चोभे, बंडू सावळे (सर्व. रा.बाबुर्डी बेंद ता. नगर), अक्षय रोकडे रा.कोरेगाव ता. श्रीगोंदा) … Read more

धनुभाऊ, बोलण्याआधी आपली पात्रता तपासा !

विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. माजीमंत्री बबनराव पाचपुते भाजपसाठी पूर्वी ‘बबन्या’ होते. मात्र भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे सर्व आरोप धुतले गेले आणि ते बबनराव झाले अशी टीका त्यांनी काल जिंतूर येथे बोलताना केली होती मात्र आता यावरून चांगलेच वाद झाले आहेत माजी मंत्री बबनराव पाचपुते … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे नगर मध्ये

अहमदनगर :- राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी (२३ ऑगस्ट) नगरला येत असून, येथील व्यापारी-व्यावसायिकांसह वकिलांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय नगर शहरातील पक्ष पदाधिकाऱी व नेत्यांशी चर्चा तसेच फिरोदिया वृद्धाश्रम भेट व सायंकाळी पारनेरचे युवा नेते नीलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचा समारोप त्यांच्या उपस्थितीत होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार सुळे … Read more

ते नेते उपस्थित राहिल्याने जिल्हा भाजपमध्ये अस्वस्थता

नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तयारीसाठी दोन दिवसांपूर्वी नगरला झालेल्या जिल्हा भाजप कोअर कमिटी बैठकीस अकोल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे उपस्थित राहिल्याने जिल्हा भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजपमध्ये नुकत्याच प्रवेश दिलेल्या अकोल्याच्या आमदार वैभव पिचडांचे कट्टर विरोधक म्हणून भांगरे ओळखले जातात. या पार्श्वभूमीवर आता भांगरेंचे करायचे काय, असा प्रश्न जिल्हा भाजपच्या … Read more

एवढी आहे चिदंबरम यांची संपत्ती

नवी दिल्ली :- आतापर्यंतच्या रिपोर्टनुसार, चिदंबरम यांच्या प्रतिज्ञापत्रात नमुद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे आणि पत्नीकडे जवळपास 95.66 कोटींची संपत्ती आहे. त्याचबरोबर त्याच्यावरही पाच कोटी रुपयांचं कर्ज आहे. देशातच नाही तर विदेशातही त्यांचे अनेक बंगले आणि कोट्यावधींची संपत्ती आहे. यामध्ये कोटींची एफडी आणि वार्षिक उत्पन्न 8.6 कोटी इतकं आहे. ही चिदंबरम यांची कौटुंबिक संपत्ती आहे. त्यांच्या कुटुंबाकडून घोषित … Read more

चारा छावणी बंद केल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर :- कर्जबाजारी असलेल्या व त्यातच चारा छावणी बंद केल्याने एका दिव्यांग शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नगर तालुक्यातील खांडके येथे गुरुवारी घडली. लक्ष्मण संपत गाडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गाडे यांच्या आत्महत्येनंतर संतप्त ग्रामस्थांनी नगर पाथर्डी रस्त्यावरील कौडगाव येथे रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध नोंदवला. नगर दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

‘या’ गावाने घेतला विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय !

नगर – गोंडेगाव येथील पाझर तलाव भरून देण्यासाठी केलेल्या रास्तारोकोप्रसंगी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी तलाव भरण्याचे लेखी अश्‍वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामसभेत एकमुखी घेतला. गोंडेगाव परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाणी टंचाईमुळे संतप्त शेतकर्‍यांनी दि. 17 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर – पुणतांबा राज्यमार्गावर रस्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी … Read more

‘बबन्या’ भाजपमध्ये प्रवेश करताच ‘बबनराव’ कसा झाला ?

22 ऑगस्ट 2019 :- विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आज जे नेते भाजपमध्ये जात आहेत तेच नेते राष्ट्रवादीत असताना त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेच नेते भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांना पावन करून घेतलं जातं असा हल्लाबोल त्यांनी केला. ते म्हणाले, बबनराव … Read more

प्रवीण चौगुलेच्या निष्ठेला सलाम – आ. जितेंद्र आव्हाड

ठाणे : सध्या राज्यात पळवापळवी सुरू असतानाच प्रवीण चौगुले या विटाव्यातील तरुणाने आपल्या नेत्याला त्रास होतोय म्हणून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे समर्थन करणार नाही. पण, त्याने दाखवून दिलेली ही निष्ठा महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारी आहे. त्यामुळे त्याला माझा सलाम आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रवीण चौगुले या तरुणाला आदरांजली … Read more

खंबीरपणे उभे राहत असाल तर विधानसभा निवडणूक लढवू

शेवगाव : पक्ष कोणता असेल ते आपण नंतर पाहू, परंतू जर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असाल तर विधानसभा निवडणुकीमध्ये सौ. हर्षदा काकडे उभ्या राहतील. निवडणूक लढवायची की नाही, हे तुम्ही तालुक्यातील घराघरांत जाऊन विचारा.सर्वसामान्य जनतेच्या जीवावरच यापूर्वी आम्ही निवडून आलो आहोत, व यापुढेही जनतेच्या जीवावरच निवडणूक करू, असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष … Read more

शेतीच्या वादातून महिलेस मारहाण

अहमदनगर : नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे शेतीच्या वादातून महिलेस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चंद्रकला भाऊसाहेब मोरे (वय 33, रा. बाबुर्डी घुमट) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अर्जुन सुखदेव मोरे व मंदा अर्जुन मोरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी चंद्रकला मोरे या त्यांच्या घरासमोर उभ्या होत्या. या … Read more

विमानातून येऊन चोऱ्या करणाऱ्या श्रीमंत चोरास अटक

पिंपरी : उत्तर प्रदेशातून विमानाने येऊन तसेच आलिशान हॉटेलमध्ये राहून उच्चभ्रू फ्लॅटची रेकी करीत त्यातील लाखोंचा ऐवज लांबवणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे वाकड पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्याच्याकडून २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण ८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनिल मिश्री राजमर (३६, रा. … Read more

होमगार्डचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस हवालदारावर गुन्हा

राहाता : येथील पोलीस ठाण्यात बंदोबस्तकामी गेलेल्या महिला होमगार्डचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस हवालदार निजाम शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता शेख याने पोलीस ठाण्यात बंदोबस्तकामी तैनात असलेल्या महिला होमगार्डशी अश्लिल भाषेत संवाद साधला. तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे … Read more

झोप येत नसेल तर व्हा सावध, तुम्हाला आहे हृदयविकाराचा धोका !

न्यूयॉर्क : सध्याच्या प्रचंड ताणतणावाच्या व धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांचे झोपेचे गणित कोलमडते व त्यांना वेळेवर झोप येत नाही. अशा अनिद्रेच्या समस्येला तोंड देत असलेल्या लोकांमध्ये ह्रदयाच्या आजारांचाही धोका वाढतो. हल्लीच झालेल्या एका अध्ययनानुसार, अशा लोकांमध्ये ह्रदयाचे ठोके थांबण्याची आणि पक्षघाताचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. जगभरात सुमारे ३० टक्के लोक अनिद्रेच्या समस्येने ग्रस्त आहेत. शास्त्रज्ञांच्या … Read more

साखर सोडायची असेल तर हे नक्की वाचा

अनेकांना साखर सोडायची इच्छा असते. पण प्रयत्न करूनही गोड पदार्थांचा मोह काही सुटत नाही. आहारातल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा साखर हद्दपार करण्यासाठी काय करता येईल याबाबतचे हे मार्गदर्शन. आरोग्यदायी आणि अनारोग्यदायी पदार्थांमध्ये फरक करायला शिका. कधी काय खायचं हे ठरवा. गोड खाण्याऐवजी आरोग्यदायी पदार्थाची निवड करा. जास्त काळ उपाशी राहणं टाळा. उकडलेल्या भाज्यांना प्राधान्य द्या. … Read more