नगर जिल्ह्यासाठी कांदा अनुदानासाठी ७३ कोटी मंजूर

अहमदनगर :- ‘राज्यात कांद्याचे दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी ७३ कोटी २१ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच प्रसन्ना कृषी मार्केट या खासगी बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर करण्यात … Read more

महाजनादेश यात्रेचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा

संगमनेर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने सध्या महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेला जे खोट सांगत आहेत, ते वस्तुस्थितीला धरून नाही. त्यामुळे या महाजनादेश यात्रेचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही आजपासून काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेला अमरावती येथून सुरुवात करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. संगमनेर येथे सहकार … Read more

महाराष्ट्रातील साखर कामगारांचा पुणे साखर आयुक्त कार्यालयावर बुधवारी मोर्चा

अहमदनगर :- महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे सरचिटणीस कॉ.आनंदराव वायकर व प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे यांनी दिली. या दोन राज्यव्यापी संघटनांच्या वतीने … Read more

शिक्षकांची शासनाकडून वारंवार फसवणूक शिक्षक दिनावर घालणार बहिष्कार

नगर- शिक्षक दिन हा शिक्षकांसाठी गौरवाचा दिवस असतो. मात्र शिक्षकाला गुरू मानणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात मागील पाच वर्षात शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाकडे शासन  वारंवार दुर्लक्ष करित असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, त्यामुळे शिक्षकांची वारंवार  फ़सवणुक होत असून या  मागण्यांचा तत्काळ शासन आदेश न काढल्यास येत्या शिक्षक काळ्या फिती लावून दिनावर बहिष्कार घालणार असल्याची माहिती अहमदनगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

पारनेर :- तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पारनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे. बाबाजी विठ्ठल बडे, कविता बाबाजी बडे, मुलगा आदित्य व धनंजय (सर्व रा. … Read more

काय होणार श्रीगोंदा मतदारसंघात ?

श्रीगोंदा :- विधानसभा मतदार संघात या वेळी पुन्हा पाचपुते विरुद्ध जगताप अशीच लढत होण्याचे चित्र दिसत आहे. मात्र, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा याही इच्छुक आहेत. आघाडी झाल्यास त्यांचा पत्ता आपोआप कट होईल.नागवडे व जगताप यांची दिलजमाई झाली तर पाचपुते विरुद्ध जगताप अशी मुख्य लढत ह्या निवडणुकीत … Read more

दहा हजार रुपयांसाठी तरुणाची दगडाने ठेचून हत्या

जळगाव :- लायटिंगच्या व्यवसायातून ३५ हजार रुपयांपैकी १० हजार रुपये बाकी असल्याच्या कारणावरून दोन तरुणांमध्ये शनिवारी रात्री एका हॉटेलमध्ये वाद झाले. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास दोघांनी तरुणाच्या घरी जाऊन बाहेर बोलावले. काही अंतरावर नेऊन त्याला बेदम मारहाण केली. दोघांनी पाच वेळा वीस किलो वजनाचा दगड तरुणाच्या डोक्यात घालून हत्या केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री ईश्वर … Read more

पावसाची पुन्हा दमदार हजेरी

नगर :- शहर व उपनगरात रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दीड ते दोन तास झालेल्या या पावसाने शहरातील रस्त्यांची पुन्हा दाणादाण उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित नगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतेचे काही रस्त्यांचे पॅचिंग करण्यात आले होते. त्या काही रस्त्यांवरील डांबर पावसाने वाहून गेले. या पावसामुळे शहरांतर्गत रस्त्यावर चिकचिक वाढली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची … Read more

शेतकरी आत्महत्येसाठी जबाबदार धरून मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर :- नगर तालुक्यात छावण्यां अभावी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येसाठी जबाबदार धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे. सहा वर्षापूर्वी ते स्वत:च अशी मागणी करत होते, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धनशाम शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किसन लोटके, बाळासाहेब पवार, अशोक … Read more

भाजपने अष्टपैलू नेता गमावला

अहमदनगर :- भारतीय जनता पक्षाने अलीकडच्या काळात तीन बहुमोल हिरे गमावले आहेत. यातील अरुण जेटली हे अर्थतज्ज्ञ, अभ्यासू व विचार प्रगल्भ विचारवंत नेते होते. अशा महान नेत्याच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने पक्षाने अष्टपैलू नेता गमावला आहे, अशा शब्दांत शहर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्व.अरुण जेटली यांना श्रद्धांजली … Read more

माजी महापौर कळमकर यांच्याकडून शक्तीप्रदर्शन करत आमदारकीचा ‘अभिषेक’ ?

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीचे वारे जोमाने वाहत असतानाच सावेडीत माजी महापौर अभिषेक कमळकर यांच्या स्टेजवर सिनेअभिनेत्री उर्वशी रौतेला यांची झलक नगरकरांना पहायला मिळाली. माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या श्रीयोग प्रतिष्ठानने सिनेअभिनेत्री उर्वशी रौतेला हिला बोलावून रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली.  10,000 हून अधिक तरुण यावेळी उपस्थित होते, दरम्यान रेकॉर्ड ब्रेक गर्दी खेचून आपणही आगामी काळात विधानसभा … Read more

‘या’दिवशी होवू शकतात विधानसभा निवडणुका

अहमदनगर ;- विधानसभेच्या प्रशासकीय कामांना गती आली आहे. गणेशोत्सवानंतर कधीही निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याची चिन्हे असून त्यादृष्टीने निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यातील अंतिम मतदारयादी 31 तारखेला प्रसिध्द करण्यात येणार असून शनिवारी यादीवर निर्णय घेण्याचा अंतिम दिवस होता. राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना गती आली आहे.राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यालयांना प्रशासकीय यंत्रणा सज्ज … Read more

गॅस वापरता येत नाही विवाहितेचा छळ

अकोले :- तालुक्यातील भंडारदरा येथे राहणारी विवाहित तरुणी सौ . पूजा सुनील भांगरे , वय २६ वर्ष हिला सासरी नांदत असताना नवरा व सासरच्या लोकांनी तुझ्या माहेरुन दागिने घेवून ये , तुला कपडे धुता येत नाही ! स्वयंपाक करता येत नाही ! गॅस वापरता येत नाही या कारणावरुन वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करुन शिवीगाळ … Read more

पुरग्रस्तांसाठी सरसावले शालेय विद्यार्थी

अहमदनगर (प्रतिनिधी)- सांगली-कोल्हापूर जिल्ह्यावर ओढवलेल्या जलप्रलयानंतर त्यांना आधार देण्यासाठी अवघा महाराष्ट्र एकवटला आहे. गरीब असो किंवा श्रीमंत लहान असो किंवा मोठे सर्वजन आपल्या परीने पुरग्रस्तांसाठी मदत पाठवित आहे. हीच सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैश्यासह घरोघरी जाऊन सुमारे 31 हजार रु. चा मदतनिधी जमा केला. … Read more

कर्जत-जामखेडला हक्काचे पाणी द्या- रोहित पवारांची मागणी

कर्जत – जामखेड तालुक्यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समन्यायी पद्धतीने पाणीवाटप व्हावे. दोन्ही तालुक्यांना हक्काचे पाणी द्या, अशी मागणी राष्टवादीचे नेते रोहित पवार यांनी कुकडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. पुण्यातील सिंचन भवन येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळासमवेत कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, मुख्य अभियंता व्ही. … Read more

मुख्यमंत्र्यांच्या नगर जिल्ह्यातील सभा रद्द

अहमदनगर :- माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या रविवारी नगर जिल्ह्यातील त्यांच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या. अकोले, संगमनेर, राहुरी व नगर शहर येथे त्यांच्या सभा होणार होत्या, त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत.

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

नवी दिल्ली – नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतीलएम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच … Read more

एकाच दिवशी एकाच वेळी भाजप ची महाजनादेश’ आणि राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य’ यात्रा या तालुक्यात येणार समोरासमोर

जामखेड :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा व राष्ट्रवादीचे खासदार असलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा या दिवशी दुपारी ४ वाजता जामखेडला समोरासमोर येणार आहेत. या यात्रांच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी होणार असल्या तरी यानिमित्ताने भाजप व राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन या दिवशी जामखेडात होणार असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान आहे. फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश … Read more