पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न

निघोज : पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे झाली. पती-पत्नी दोघेही पुणे येथील ससून रुग्णालयात असून गंभीर जखमी आहेत.  निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे १ मे रोजी त्यांची पत्नी रुख्मिणी मंगेश रणसिंग (वय १९) यांना भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे … Read more

अवैधरित्या पाणी उपसा करणारे कृषिपंप जप्त

संगमनेर : तालुक्यातील आंबीदुमाला येथील कोटमारा धरणातून अवैधरित्या पाणीउपसा सुरूच आहे. शनिवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याविरोधात मोहीम हाती घेत धरणात टाकण्यात आलेले शेतीचे वीजपंप ताब्यात घेतले. संगमनेर तालुक्यातील आंबी-दुमाला येथील कोटमारा धरणातून शेतीसाठी होणारा अवैध्य पाणी उपसा थांबवावा अशी मागणी बोटा येथील युवकांनी केली होती. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाटबंधारे विभागाने धरणातील पाणी साठ्याने तळ … Read more

‘त्या’ने अल्पवयीन मुलीस वारंवार भ्रमणध्वनीद्वारे धमकी देऊन आत्महत्या केले प्रवृत्त

शेवगाव : अल्पवयीन मुलीस वारंवार भ्रमणध्वनीद्वारे धमकी देऊन तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अरुण शहादेव ढाकणे (हसनापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत मुलीची आई राधाबाई तुकाराम ढाकणे यांनी दिलेल्या फिर्याद दिली. सुमारे तीन महिन्यांपूर्वी मी घरकाम करत असताना मुलगी तेजस्विनी फोनवर बोलताना दिसली. त्यावेळी तू कोणाशी बोलत आहे, मोबाइल कुणाचा आहे … Read more

आ. संग्राम जगताप यांच्यावर खोटे आरोप केले, तर कायदेशीर कारवाई

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप यांच्यावर खोटे आरोप केले, तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मनपातील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नगरसेवक संपत बारस्कर यांनी शुक्रवारी शिवसेनेला दिला. मनपातील बूटफेक प्रकरणावरून सेना व राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. शुक्रवारी सेनेने पत्रकार परिषद घेऊन आमदार जगताप यांच्यावर टीका केली. सायंकाळी राष्ट्रवादीचे गटनेते बारस्कर यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. … Read more

राजकीय वादातून दोन गटांत मारामारी,पोलिसांवरही दगडफेक

नेवासे :- तालुक्यात राजकीय वादातून ३० एप्रिलला रात्री दहाच्या सुमारास नेवासे शहरात दोन गटांत मारामारी झाली. दगडफेकीत दोन पोलिसही जखमी झाले. तीन गाड्यांचे नुकसान झाले. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटांचे सात जण अटकेत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, न्यायालयीन प्रक्रियेत स्टे मिळाल्यामुळे नगरसेवकांच्या एका गटाने वाजवलेल्या फटाक्यांमुळे दोन गटांत … Read more

नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित : खासदार गांधी

अहमदनगर :- मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर भाजप शहर जिल्ह्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे, असे खासदार गांधी म्हणाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या व भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड घालून युवकाचा खून

संगमनेर :- तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारात अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करीत डोक्यात दगड घालून अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या युवकाचा निघृणपणे खून केला. आरोपींनी मृतदेह फरफटत ओढत नेवून दगड खाणीत फेकला व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी दि. १ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खून झालेल्या युवकाची ओळख … Read more

जनतेमध्ये दहशत निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार

अहमदनगर :- अधिकाऱ्याला बूट फेकून मारल्याचा प्रकार व्हीडिओवर मी पाहिला. अधिकारी, तसेच जनतेमध्ये दहशत निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार आहे. यांच्याबरोबर जे लोक राहिले त्यांच्यावर केसेस दाखल होऊन उद्वस्थ झाले आहेत, अशी टीका आ. संग्राम जगताप यांनी गुरूवारी अनिल राठोड यांच्यावर केली. जगताप म्हणाले, अधिकाऱ्याला बूट फेकून मारलेला सर्वांनी पाहिला आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी … Read more

या महिन्यापासून होत आहेत हे पाच महत्वाचे बदल

1. रेल्वेच्या नियमात बदल : रेल्वेचं रिझर्व्हेशन करणाऱ्यांना एक मेपासून नवी सुविधा दिली जाणार आहे. 1 मेपासून रेल्वेचा चार्ट बनवण्याच्या 4 तास आधीपर्यंत प्रवाशी आपलं बोर्डिंग स्टेशन बदलू शकतात. सध्या 24 तास आधी बोर्डिंग स्टेशन बदलता येतं. म्हणजे, रेल्वे रिझर्व्हेशन करताना जे बोर्डिंग स्टेशन तुम्ही निवडता, ते बदलायचे झाल्यास, चार्ट बनवण्याच्या 4 तास आधीपर्यंत बदलू शकता. … Read more

शिर्डी विमानतळावर विमान घसरले

शिर्डी :- दिल्ली ते शिर्डी हे स्पाइस जेट बोइंग विमान शिर्डी येथील साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर लँड झाल्यानंतर टर्मिनल पार्किंगकडे वळवत असताना धावपट्टी सोडून सुमारे पस्तीस ते साठ फूट विमान माती व खडी असलेल्या जमिनीत जाऊन रुतले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी विमानातील १८९ प्रवासी बालंबाल बचावले आहेत. सुमारे साडेतीन तासांनंतर विमानातील प्रवाशांना … Read more

नगर जिल्ह्यात उष्णतेची लाट,दैनंदिन जीवन विस्कळीत

अहमदनगर :- एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात तापमानाने उसळी घेतल्याने पारा ४४ ते ४५ अंशांवर कायम आहे. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी नगरचे ४४.९ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडले आहेत. तापमानाचा पारा चढाच असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे घरातून बाहेर … Read more

छिंदम बंधुंसह १५ टोळ्यांतील एकूण ६७ गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार !

अहमदनगर :- श्रीपाद व श्रीकांत शंकर छिंदम (तोफखाना) यांच्यासह जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या १५ टोळ्यांतील एकूण ६७ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले. पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी हे आदेश काढले, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. भाऊसाहेब लक्ष्मण कराळे, ओंकार भाऊसाहेब कराळे, ऋषिकेश नरेंद्र सिंग परदेशी, मनोज भाऊसाहेब कराळे, रशीद दंडा, चंद्रकांत आनंदा … Read more

पिण्यास पाणी न दिल्याने मुलीचा विनयभंग

राहुरी : पिण्यास पाणी दिले नाही या कारणावरून अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग करणाऱ्या ७ तरुणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. राहुरी फॅक्टरी येथे २७ एप्रिलला ही घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, घरात असताना परिसरातील तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले होते. यावेळी पाणी नसल्याचे सांगितल्याने संबंधित तरुणांनी घरात घुसून लाथाबुक्क्याने … Read more

लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना बूट फेकून मारून विकासाचा जाब विचारा !

अहमदनगर :- अधिकाऱ्यांना बूट फेकून मारण्यात काहीच शूरपणा नाही. त्याऐवजी आपणच पिढ्यानपिढ्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना बूट फेकून मारून विकासाचा जाब विचारण्याचे धाडस नागरिकांनी करावे,’ असा सल्ला जागरूक नागरिक मंचाने दिला. महापालिकेत बोल्हेगाव रस्ता कामावरून झालेल्या आंदोलनात महापालिका अधिकाऱ्यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याच्या घटनेचा निषेध जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे व अन्य सदस्यांनी … Read more

पत्रकारास गुंडांकडून बेदम मारहाण

अहमदनगर :- दुकानासमोर सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेले पत्रकार अन्सार सय्यद यांनाच गुंडांनी बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना कोठला येथील राज चेंबर परिसरात शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अजिम हनिफ शेख व इतर ५-६ जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला. आरोपी अजिम व इतरांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. एकाने त्यांच्या डोक्यात गज … Read more

सेल्फी घेण्याच्या नादात तरुणाचा पाय घसरुन मृत्यु

राहुरी :- लोणावळा येथील हिल स्टेशनवर सेल्फी काढल्यानंतर पाय घसरून राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. रवींद्र काशीनाथ शेटे (वय २३) हा लोणी येथील नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. शनिवारी पहाटे रवींद्र आपल्या काही मित्रांसह लोणावळ्याला फिरण्यासाठी गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास रवींद्र व … Read more

….ती राजकीय आत्महत्याच

शिर्डी :- राष्ट्रवादीकडून आम्ही निवडणूक लढवली असती तर ती राजकीय आत्महत्याच ठरली असती,’ अशा शब्दांत माजी विराेधी पक्षनेते राधाकृ‌ष्ण विखे पाटील यांनी पक्षावर नाराजीचे कारण शनिवारी जाहीरपणे सांगितले. ‘नगरची जागा काँग्रेसला सुटल्यास पक्षाचा एक खासदार वाढेल म्हणून मी जिवाचे रान करीत हाेताे. त्याच वेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी मात्र सुजयने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याचा सल्ला देत होते. … Read more

श्रीगोंद्यात कर्ज फेडण्यास पैसे न दिल्याने मुलाची आई-वडिलांना मारहाण !

श्रीगोंदे :- शहरातील एका निदर्यी मुलाने आपले कर्ज फेडण्यास बापाने पैसे देण्यास नकार दिल्याने चक्क वृद्ध आई-वडिलांना या माथेफिरू मुलाने बेदम मारहाण केली.  याबाबत वृद्ध पित्याने दत्तात्रय सदाशिव दहातोंडे (वय ६०) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीगोंदे शहरातील दत्तात्रय सदाशिव दहातोंडे (बगाडे कॉर्नर, श्रीगोंदे) येथे राहत असून त्यांना २ मुले … Read more