धक्कादायक : पोलिस कर्मचाऱ्याने युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी

अहमदनगर :- पोलिस कर्मचाऱ्यानेच युवतीला घरात कोंडून मारहाण करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी पोलिस कर्मचारी योगेश धाईंजे व त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यानेच हा प्रकार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. धाईंजे हा एका महिन्यापासून पीडित युवतीचा पाठपुरावा करत … Read more

७६० लिटर बनावट ताडी जप्त

जामखेड: नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात तपनेश्वर गल्ली महादेव मंदिराजवळ नेवाळवाडी येथे राहणा-या आरोपीच्या घरात व गाडीमध्ये १०- २०लिटर नव्हे तर तब्बल ७६० लिटर मेसळीची ताडी पोलिसांनी पकडली. या  ठिकाणाहून पोलिसांनी एक व्हॅगनर गाडी नं. एमएच ०४,  बीएस २४५३ हिच्यातही ताडी  पकडली. याप्रकरणी पोको शाम सुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विरेशम अजुन कोरकोपला, वय ५०, रा. … Read more

चापट का मारली? विचारणाऱ्या वर कोयता, चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न

नगर: नगर शहरात कबाड गल्लीत पंचपीर चावडी, माळीवाडा परिसर येथे राहणारे वाहिद मेहबुब शेख उर्फ लाला कुरेशी, वय ३६ यांचा पुतण्या अम्मार याला आरोपींनी लहान मुलाच्या भांडणावरुन चापट मारली. तेव्हा वाहिद शेख उर्फ कुरेशी हे आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले. चापट का मारली? असे विचारल्यावरुन पाच आरोपींनी याचा विषय संपून टाकू, असे म्हणत धारदार चाकू व … Read more

बायकोने नवऱ्याच्या डोक्यात दगड घालून केला खून

श्रीरामपूर : तालुक्यातील गोंडेगाव येथील नवनाथ म्हसे यांच्या खून प्रकरणी त्यांच्याच पत्नीला अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी नवनाथ यांच्या वडिलांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, दि. १४ जुलै रोजीच्या रात्री नवनाथ म्हसे हे आपल्या कुटुंबासमवेत आपल्या शेतातील घरामध्ये झोपलेले असताना दोन … Read more

झोपलेल्या मुलीस पळविले

पाथर्डी : नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातील सुरसे भागात राहणारी एक १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी घरासमोरील पटांगणात झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात आरोपीने या अल्पवयीन मुलीला झोपेतच उचलून नेवून पळविले. या घटनेने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली असून मुलीच्या वडिलांनी पाथर्डी पोलिसांत तक्रार दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोना म्हस्के … Read more

शरद पवार, बाळासाहेब विखे यांच्या नातवांची चर्चा होते, मग आपल्या नातवांची का नको?

अहमदनगर :- बारा बलुतेदार महासंघाच्या माध्यमातून १२ जाती एकत्रित करून लढा उभारणीला राज्यात यश मिळत आहे. शरद पवार, बाळासाहेब विखे यांच्या नातवांची चर्चा होते, मग आपल्या नातवांची का नको? ओबीसीमधील ३४६ जातीपैकी फक्त ५-६ जाती राजकारणात प्रवेश करतात. १२ बलुतेदारांच्या माध्यमातून या १२ जाती एकत्रित आल्याचे पाहून राजकारणी आता जागे झाले. तेव्हा आपले अस्तित्व सिद्ध … Read more

आजारपणाला कंटाळून युवकाची आत्महत्या

अकोले :- रुंभोडी येथील एका तरुणाने आजारपणाला कंटाळून गुरूवारी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. हौशीराम गंगाधर मधे (वय २५) असे त्याचे नाव आहे. तो अनेक दिवसांपासून आजारी होता. औषधोपचार सुरू होते. मात्र, दीर्घ आजारपणामुळे त्याला नैराश्य आले. त्यातूनच त्याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. हौशीरामचा भाऊ पंढरीने दिलेल्या खबरीवरून पोलिस ठाण्यात … Read more

ब्लू डायमंड मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा

नगर – पुणे महामार्गावर स्वस्तिक चौक परिसरात असलेल्या ब्लू डायमंड मसाज सेंटरवर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या मसाज सेंटरवर छापा टाकून एका महिला व पुरुषाला ताब्यात घेतले. या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक मिटके यांना मिळाली होती. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आता होणार पाईपद्वारे गॅस पुरवठा !

अहमदनगर :- पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. नगरसह महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्यरत पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांसह देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. … Read more

शेतकऱ्यांना चार कोटींचा डाळिंब पीकविमा मंजूर

कर्जत :- तालुक्यातील ४३४ बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ कोटींचा व नगर जिल्ह्यातील ८ हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४२ कोटींचा पीकविमा एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीकडून मंजूर झाली असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलासराव शेवाळे यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे दिली. २०१७-१८ या वर्षात बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेमार्फत डाळिंब पिकासाठी पंतप्रधान फळपीक हवामान आधारित विम्याची रक्कम भरली होती. … Read more

श्रीगोंदा तालुक्यात दारुड्यांची पोलिसाला बेदम मारहाण

श्रीगोंदा :- तालुक्यातील खाकी बाबा देवस्थान जवळ बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसाला मद्यपी तरुणांनी बेदम मारहाण केल्याने पोलीस कर्मचारी संजय कोतकर हे जखमी झाले आहेत. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसावरच दारुड्याने हात उचलल्याने कायद्याचा धाक आहे की नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पिसोरे खांड, येथील आषाढ महिन्यात भरणाऱ्या खाकी बाबांच्या यात्रा उस्तवात … Read more

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाख यांच्यावर गुन्हा दाखल

नेवासे : तालुक्यातील सोनई-करजगावसह १८ गावांच्या पाणी योजनेवरून करण्यात आलेल्या रास्ता रोकोप्रकरणी चार दिवसांनंतर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सात जणांवर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राजकीय वचपा काढण्यासाठी, तसेच राजकीय कोंडी करून गडाखांना चौकशीच्या फेऱ्यात गुंतवण्यासाठी राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. सोनई पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल काकासाहेब देविदास मोरे यांच्या … Read more

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला

अहमदनगर :- शहराच्या विकासाठी निधी देण्यात यावा, तसेच एमआयडीसीत नवीन कंपन्या उभारण्यात याव्यात या मागणीसाठी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन शहर विकासासाठी निधी व नवीन कंपन्या उभारण्यात येतील, असे आश्वासन दिले. नगर शहर हे राज्यात मध्यवर्ती ठिकाणी असूनही शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही. … Read more

सीना नदीकाठी बकर्‍या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर :- सीना नदीकाठी बकर्‍या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी ही घटना घडली असून या प्रकरणी भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित मुलगी ही वाकोडी शिवारातील सीना नदीकडेला बकर्‍या चारायला घेऊन गेली होती. बंड्या निमसे तेथे आला. त्याने पिडितेला उचलून शेवग्याच्या झाडांमध्ये नेले. त्याने पिडितेचे कपडे … Read more

विधानसभा निवडणुकीआधी अहमदनगर जिल्हा विभाजन करा अन्यथा….

राहुरी : ४० वर्षांच्या सामाजिक प्रश्­नाची सुवर्णसंधी समजून शासनाने आजतागायत जिल्हा विभाजन केले नाही. अद्यापपावेतो स्पष्ट भूमिका न घेतल्याने जिल्हा विभाजन होणार किंवा नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी तरी जिल्हा विभाजन करा. अन्यथा आगामी प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभे करून थेट सहभाग नोंदवू, असा इशारा श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे उपाध्यक्ष … Read more

नवऱ्याला सोडून लग्न करण्यासाठी आरोपीकडून महिलेच्या पती व मुलांना ठार मारण्याची धमकी !

अहमदनगर : जामखेडमध्ये अजब प्रकार घडला. चक्क आरोपीने विवाहीत महिलेला लग्न करण्याचा आग्रह धरला. नवऱ्याला सोडून दे अन् माझ्याशी लग्न कर अशी अजब मागणी करत आरोपीने त्या महिलेच्या पती व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मायकल शेळके (रा. लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) याच्या विरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात १६ जुलैला गुन्हा दाखल झाला … Read more

त्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मीच दिसतो …

अहमदनगर : सोशल मिडीयाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र या चर्चा केवळ वावड्या असून अशा अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असेही स्पष्टीकरण आ. संग्राम जगताप यांनी दिले आहे. सन २०१४ ची विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढविली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा … Read more

धनगर समाजासाठी एक हजार कोटी :- महादेव जानकर

पारनेर :- राज्यातील धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या योजना लागू करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, या योजना येत्या ऑगस्ट पासून लागू होणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ना. जानकर हे पारनेर तालुक्यातील टाकळीहाज़ी येथे आले असता, पत्रकारांशी ते बोलत होते. याबाबत अधिक … Read more