पारनेर :- या सत्ताधारी नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सत्ताधाऱ्यावर घणाघात केला आहे.
राज ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अहमदनगर येथील राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली.
अहमदनगर :- जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १२८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये २८ कोटींचा निधी जामखेड तालुक्यासाठी दिला असुन, अनेक वर्षांपासुन रखडलेल्या खर्डा येथील अमृतलींग जोड तलावासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खर्डा येथे आज केले. खर्डा (ता. जामखेड) येथील विविध विकास कामांच्या भुमिपूजनाप्रसंगी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे … Read more
अहमदनगर :- जिल्ह्याला ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून भरीव निधी दिल्याचे सांगताना दुष्काळी स्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे महिला व बाल विकास आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले. नेवासा तालुक्यातील सोनई येथे विविध विकास कामाचे भुमिपूजन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे उपस्थित होते. ग्रामविकासमंत्री मुंडे म्हणाल्या, केंद्र … Read more
पारनेर :- या सत्ताधारी नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सत्ताधाऱ्यावर घणाघात केला आहे.
राज ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अहमदनगर येथील राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली.
श्रीरामपूर – मोटारसायकलला ट्रकने मागून जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी पावनेसात वाजेच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील महात्मा गांधी चौकात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी सागितलेली माहिती अशी, की सोहेल इमाम शेख (रा. काझीबाबा रोड, वॉर्ड क्रमांक २, श्रीरामपूर) व महेमूद हुसेन शेख (रा. गोंधवणी, वार्ड क्रमांक १) हे श्रीरामपूर बसस्थानकावरून संगमनेर … Read more
पारनेर :- अतिक्रमण काढण्यासाठी तब्बल ९५ लाख मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पोपट माळी यांच्याविरोधात खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ, तसेच गावठी कट्ट्याचा धाक दाखवल्याचा गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. यासंदर्भात संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील रोहिदास भास्कर देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. देशमुख यांची वनकुटे येथे गट क्रमांक ८५ मध्ये … Read more
श्रीरामपूर :- दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे दीड लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबवले. डाकले इमारतीनजीक छाया विजय सोनी या मोटारीतून उतरून घराकडे येत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ७० हजारांचे दागिने लांबवले. दुसरी घटना जुन्या वसंत चित्रपटगृहानजीक घडली. सुशीला अशोकचंद पांडे या रिक्षातून उतरून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील लाखाचे गंठण लंपास केले.
अहमदनगर :- अंदाजपत्रक तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. काेणतीही करवाढ करायची असेल, तर १९ फेब्रुवारीपर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर करणे बंधनकारक असते. मात्र, अद्याप स्थायी समितीच अस्तित्वात नसल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. स्थायी समिती सदस्य निवडीला होणारा विलंब सर्वसामान्य नगरकरांच्या पथ्यावर पडणार आहे.स्थायी समितीबरोबरच स्वीकृत सदस्य निवडीचाही विषय प्रलंबित आहे. पहिल्या महासभेतच … Read more
पारनेर :- लाेकायुक्त, लाेकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या ५ दिवसांपासून राळेगण सिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपाेषण सुरू आहे. …केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही ! जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली व उपाेषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही, जाेपर्यंत निर्णय हाेत नाही ताेपर्यंत … Read more
श्रीगोंदा :- तालुक्यातील मुंगुसगावचे सरपंच रामदास कानगुडे यांच्यावर दि.२७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गावातील ५-६ इसमांनी जबर मारहाण केली. दि.२७ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता कानगुडे हे मुंगुसगाव शिवारातील हॉटेल मातोश्री येथे जेवणासाठी गेले होते. यावेळी गावातील सुजित सुनील इथापे, अजिंक्य विशाल धुमाळ, किरण अनिल कानगुडे, संकेत बबन कानगुडे, दीपक बोरुडे हे तरुण … Read more
अहमदनगर :- वैयक्तिक आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वैयक्तिक बदनामी करणे, यासह पोलिसांप्रती अप्रतिची भावना चिथावणे, पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिस प्रशासनावर टीका केली होती. … Read more
अहमदनगर :- घराच्या छताला ओढणीने गळफास घेवून २८ वर्षीय वर्षा गुलाब बाबर (रा. बाबरमळा, बुरुडगावरोड, बुरुडगाव) हिने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. ३१) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत वर्षा ही न्यू आर्टस कॉमर्स कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत शिकत होती. वर्षाचा स्वभाव शांत व प्रेमळ होता. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या … Read more
श्रीगोंदे :- ‘ज्यांना तुम्ही निवडून दिले, त्यांनी चार वर्षांत तालुक्यात काय कामे केली? भाजपच्या विकासकामांचे श्रेय घेऊन राष्ट्रवादी स्वत: कार्यसम्राट म्हणून घेत आहे, हे जनता ओळखून आहे.’ ‘सध्या आमदार नसलो तरी जनतेच्या जोरावर चाळीस वर्षे राजकारणातील संपर्क कामाला येत आहेत. त्यातून तालुक्यात विकासकामे करता येत आहेत. सध्या तर राज्यात व केंद्रात आपलेच सरकार असल्याने तालुक्यासाठी … Read more
शेवगाव :- कर्जाला कंटाळून तालुक्यातील सुकळी येथील बबन आसराजी भवर (वय ५८) या शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा मच्छिंद्र बबन भवर याने दीड वर्षापूर्वी याच कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एकाच कुटुंबात कर्जामुळे दोघांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. भवर यांचा मुलगा हरिदास याच्याकडे सेंट्रल बँकेचे दीड लाख रुपये, तर … Read more
अहमदनगर :- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादयांच्या विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणेबाबत निर्देशित केले होते. त्यानुसार अहमदनगर जिल्हयातील 216 अकोले (अ.ज.), 217 संगमनेर, 218 शिर्ड, 219 कोपरगाव, 220 श्रीरामपूर (अ.जा.),221 नेवासा, 222 शेवगाव, 223 राहुरी, 224 पारनेर, … Read more
पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पारनेर मध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शिवसेनेतून बडतर्फ झालेले निलेश लंके हे आपल्या हजारो कार्यकर्त्यासह अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याने निलेश लंके यांनी ऐन सभेच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी … Read more
अहमदनगर :- वृद्ध असलेल्या आईला न सांभाळता उलट किरकोळ कारणातून मुलगा व सुनेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत वृद्धेने नगर तालुका पोलिस ठाण्यात मुलगा व सुनेविरुद्ध फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे राहणाऱ्या बबई कचरु डोखे (वय ६५) या घरासमोर बसल्या होत्या. त्याचवेळी बबई यांच्या कोंबड्या मुलाच्या घरासमोर गेल्या. … Read more
भंडारदरा :- अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाजवळ गार्डनच्या अरुंद पुलावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस व टाटा विंगर या खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या गाडीची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांमधील ४६ प्रवाशी कोणत्याही प्रकारची ईजा न होता बालंबाल बचावले. या अगोदरही काही वर्षापुर्वी बस ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे ६० प्रवाशी बचावले होते. सविस्तर वृत्त असे की, अकोले आगाराची … Read more
अहमदनगर :- एका कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला नगरमधील मयुर राऊत, पांडुरंग कोतकरसह इतर ८ते १० जणांनी अडवून खंडणीसाठी मारहाण केली. ही घटना अकोळनेर,ता. नगर येथे घडली. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की,अकोळनेर येथील महेश अशोकराव देशमुख (वय ४४) हे एका कंपनीत काम करतात. … Read more