राहुरी :- तालुक्यातील बांबोरी येथे पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केली. भारत मोरे असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी संध्या मोरे आणि मुलगा साई मोरे याची केली हत्या केली.

वांबोरी परिसरात मोरेवाडी आज दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास भारत ज्ञानदेव मोरे(वय-30) याने पत्नी संध्या मोरे ( वय-28) मुलगा साई मोरे (वय-5) या दोघांची धारदास शस्त्र बॅटने हत्या केली.

दुपारी पत्नी-पतीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर भारत मोरे याने पत्नी व मुलाचा खून केला. घरातील अन्य सदस्य लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते.

राहुरी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे घटनास्थळी दाखल झाले आहेत. राहुरी पोलीसांनी आरोपीला अटक केली.