लोकसभेसाठी भाजपकडून आ.शिवाजी कर्डिलेंचे नाव चर्चेत.

पाथर्डी :- नगर दक्षिण लोकसभा निवडणूक काही महिन्यावंर येऊन ठेपली असल्याने भाजपाकडून नेमके कोणाला निवडणूक रिंगणात उतरवले जाणार हे अद्याप ठरलेलं नाही. राहुरी- नगर -पाथर्डीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडून पुढे येऊ लागल्याने मतदारसंघात आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. नगर दक्षिणमधून जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे हे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी … Read more

पत्नीला जाळून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

राहुरी :- पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देऊन जिवे ठार मारल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.जगताप यांनी आरोपी अमोल संभाजी शेलार रा. केसापूर, ता- राहुरी,यास दोषी धरून जन्मठेप व ६,५००रू.दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील केसापूर येथे अमोल संभाजी शेलार व त्याची पत्नी जयश्री हे एकत्र राहत होते. … Read more

कार-बसच्या अपघातात दोन ठार.

कोपरगाव :- डस्टर कार व बसचा समोरासमोर अपघात होऊन त्यात दोन जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर झाले. ही घटना तालुक्यातील येसगाव येथील पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली. चालक प्रमोद भाऊसाहेब भांबरे (२५, रा. कोऱ्हाळे, ता. राहाता) व गणेश नामदेव डांगे (२६, रा. हल्ली मुक्काम पुणे) अशी मृतांची नावे आहे. नितीन रामनाथ डांगे … Read more

नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच होणार सुरुवात.

अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलाबाबत बैठक घेऊन त्यात भुसंपादनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या पुलाचे काम व्हावे यासाठी लक्ष दिले आहे. भुसंपादनाचे काम सुरू होऊन तीन महिन्यात कामाला सुरुवात होऊ शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केली. प्रेस क्लबतर्फे आयोजित ‘मिट द प्रेस’ उपक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी द्विवेदी यांनी पत्रकार, तसेच आवृत्ती प्रमुखांशी … Read more

डॉन बॉस्को शाळेच्या सहल बसला अपघात,दोघांचा मृत्यू

अहमदनगर :- सावेडी परिसरातील डॉन बॉस्को शाळेतील विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणार्‍या खाजगी ट्रॅव्हल बस व पिकअप व्हॅनचा आळेफाट्याजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिकअप चालकाचा होरपळून मृत्यू झाला. तसेच आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. एक शिक्षक अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले. 27 मुले जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.ओतुरमधील आळेफाटा पासून दहा किलोमीटर … Read more

विहिरीत पडून दीड वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू

पाथर्डी :- तालुक्यातील तिसगाव परिसरातील तुकाराम नामदेव कर्पे यांच्या विहिरीत पडून दीड वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज धनविजय यांनी गुरूवारी दिली.पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या रात्री या विहिरीत पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी माहिती देताच सहायक वनसंरक्षक किशोर सोनवणे, वनपाल महेबूब शेख, वनरक्षक मुबारक शेख , वनकर्मचारी के. बी. वांढेकर, गणेश … Read more

शिवाजीराव नागवडेंच्या जयंतीनिमित्त उद्या अभिवादन सभा.

श्रीगोंदा :- राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीदिनानिमित्त नागवडे कारखाना कार्यस्थळावर शनिवारी (१९ जानेवारी) अभिवादन सभा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी गुरुवारी दिली. राज्य साखर संघाचे दिवगंत अध्यक्ष व नागवडे कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचा १९ जानेवारी हा जन्मदिवस. त्यांचा वाढदिवस … Read more

दोन अपघातांमध्ये दोन महिला ठार.

शेवगाव :- तालुक्यात दोन ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला जबर जखमी झाली. सकाळच्या दरम्यान गेवराई रस्त्यावर फिरण्यासाठी गेलेल्या हिराबाई सोमनाथ उदावंत (वय ५०) व सरला शेषराव औटी (वय५५)) यांना अज्ञात वाहनाची पाठीमागून जोराची धडक बसली. त्यात उदावंत यांचा जागीच मृत्यू झाला, तर औटी जबर जखमी झाल्या. त्यांना खासगी रूग्णालयात … Read more

पारनेर तालुक्यात निलेश लंके राजकीय भूकंप करणार !

पारेनर :- विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून पारनेर तालुक्‍यात लवकर राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सेनेतून हकालपट्टी झालेले निलेश लंके माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. सुपा येथील सफलता लॉन्समध्ये सोमवारी निलेश लंके प्रतिष्ठाणचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद गट प्रमुख, गण प्रमुख, शाखा प्रमुखांची गोपणीय बैठक झाली. या … Read more

श्रीगोंद्यात ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांचा मृत्यू.

श्रीगोंदे :- तालुक्यातील मढेवडगाव येथे ऊसवाहक ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना दोन मोटर सायकलींची बुधवारी दुपारी धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. नगर-दौंड महामार्गाचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चौरंगेनाथ विठोबा शिर्के (वय ५५, रा. बाबुर्डी, ता. श्रीगोंदा), त्यांची मुलगी कल्पना संतोष कदम (वय ३०, रा. पिंपळगाव पिसा, … Read more

विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीसह सासऱ्यांवर गुन्हा.

कोपरगाव :- तालुक्यातील खोपडी येथील आरती श्यामहरी त्रिभुवन (२२) या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे. तिचा भाऊ गणेश आनंद पठारे याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरतीचा पती श्यामहरी, दीर शिवहरी व रामहरी, सासरा चांगदेव व सासू अंजनाबाई यांच्याविरुद्ध हुंड्याची मागणी करून मानसिक व शारीरिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. … Read more

खा. गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची लायकीच नाही !

अहमदनगर :- डॉ. सुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खासदार दिलीप गांधी समाजकारण, राजकारण करत आहेत. खासदार दिलीप गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची पात्रताच नसून आमच्या नादाला लागायचे नाही, नाद केलाच तर तो महागात पडेल.असा हल्लाबोल नरेंद्र मोदी आर्मीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पोटघन यांनी केला आहे. डॉ. सुजय विखे हे नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक … Read more

नगर-सोलापूर रस्त्यावर अपघातात २ ठार.

मिरजगाव :- नगर-सोलापूर रस्त्यावर मांदळी शिवारात झालेल्या अपघातात दोन ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाले. जुन्या शिवानी हाॅटेलसमोर मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास मालवाहू ट्रेलर व महिंद्रा टीयुव्हीची धडक झाली. कर्नाटक राज्यातील बाकुट जिल्ह्य़ातील हे भाविक शिर्डीकडे देवदर्शनासाठी निघाले होते. नगरकडून आलेला राजस्थान पासिंगचा ट्रेलर व कर्नाटक पासिंगची महिंद्रा टीयुव्हीची समोरासमोर धडक झाली. संक्रांतीच्या दिवशीच काळाने … Read more

जामखेड मध्ये अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार

जामखेड :- मधील चुंबळी येथील अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असून बालाजी अंबादास डाडर (४० वर्षे) याच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दि. १२ रोजी मुलीचे वडील जामखेडला व आई वीटभट्टीवर कामाला गेले होते. सायंकाळी या नराधमाने मुलीला आपल्या घरी बोलवत मारहाण करुन बलत्कार केला. दुसऱ्या दिवशी … Read more

कोपरगावात फुग्यांच्या गॅस टाकीचा स्फोट, १ ठार ६ जखमी

कोपरगाव- शहरात फुग्यांच्या गॅस टाकीच्या स्फोटात 1 ठार व सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान स्फोटांच्या घटनेचे गांभीर्य ओळखून नगर पालिका प्रशासनाने शहरातील गॅस फुगे विक्रेत्यावर कारवाई केली आहे. गांधी नगरातील आचारी हॉस्पिटल चौकात दुसऱ्या स्फोटात एक जणाचा जागीच मृत्यू झाला.तर इंदिरा नगर भागातील मावळ ग्रुप चौकात पहिला स्फोट झाला. त्यात सहा जण … Read more

खा.दिलीप गांधींची सटकली,शेतकऱ्यास भर सभेत दमबाजी !

अहमदनगर :- महागाई वाढल्याबाबत प्रश्न विचारल्यामुळे भाजप खासदार दिलीप गांधी वृद्ध व्यक्तीवर भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राहुरी तालुक्यातील केंदळ येथे एक भूमीपूजन समारंभ खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. गावातील एका मंदिराजवळ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.खा. दिलीप गांधी यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी केंद्राच्या विविध योजना … Read more

घनश्याम शेलार शिवसेनेकडून लोकसभा लढविणार

अहमदनगर :- लोकसभेच्या निवडणुकीत आता घराणेशाही सुरू झाली आहे. स्वयंभू नेते तयार होऊन ते उमेदवारीबाबत स्वतःच घोषणा करू लागले आहेत. आतापर्यंत जे लोकसभेत निवडून गेले, त्यांनी विकास केला नाही, तसेच कोणतीही योजना पूर्णत्वाला नेली नाही. आता तर दिवाळीला मिठाई देण्याची नवी परंपराही सुरू झाली आहे, अशी टीका शिवसेनेचे समन्वयक घनश्याम शेलार यांनी काँग्रेसचे युवा नेते … Read more

त्या महिलेची आत्महत्या कि घातपात ?

कोपरगाव :- तालुक्या-तील खोपडी येथील आरती शामहरी त्रिभूवन (वय 22) या बेपत्ता महिलेचा मृतदेह शेजारील विहिरीत आढळून आल्याने तिच्या माहेरच्या मंडळींनी आरतीचा घातपात झाला असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. याबाबतची गौतम पठारे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, येवला तालुक्यातील सायगाव येथील आरती आनंदा पठारे हिचा विवाह गेल्या 30 एप्रिल 2018 रोजी खोपडी … Read more