अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना त्रास,आ.संग्राम जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अहमदनगर :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना नाहक त्रास दिला जातो. खोट्या तक्रारी करून त्या मिटवून घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते. याप्रकरणी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी पाटील हे ठरावीक तक्रारदारांना हाताशी धरून … Read more

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवून नेले

कोपरगाव | येथील संजीवनी कारखाना परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस आकाश सुदाम वाघ (सांगवी, जि. औरंगाबाद) याने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

नगरचे तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसवर

अहमदनगर :- नगरचे तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने वातावरणात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे नगरकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी नगर शहराचे तापमान ४५ अंशांवर गेले होते. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरणामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पारा वाढला आहे. गुरुवारी नगरचे तापमान ४० अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी … Read more

व्हायरल झालेल्या त्या बोल्ड महिलेची नाव आणि ओळख पटली !

दिल्ली :- लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक पिवळ्या साडीतील मतदान अधिकारी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.अखेर आता तिचे खरे नाव आणि ओळख पटली आहे. या महिलेचे नाव रीना द्विदेवी असून त्या लखनऊ येथील पीडब्ल्युडी विभागात कार्यरत आहेत. लखनऊपासून ४० किमी अंतरावर असलेल्या नगराम मतदान केंद्र १७३ येथे त्यांची नियुक्ती झाली होती. … Read more

विखे कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवले !

पारनेर :- विखे साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे एफआरपीप्रमाणे सत्तर कोटी थकवले असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे यांचे बंधू व प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष अशोक विखे यांनी केला. राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखालील संस्थांत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात डॉ. अशोक विखे साेमवारपासून लोणी येथे उपोषणास करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अर्धा … Read more

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या चुलतभावाचा खून करणाऱ्यास जन्मठेप

नेवासे :- चुलत भावजयीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सख्या चुलतभावाचा खून करून विजेचा शॉक बसल्याचा बनाव करणाऱ्या बाळासाहेब बाबासाहेब भगत (धेडगे) याला शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. देवगाव येथे २ एप्रिल १७ रोजी ही घटना घडली. आरोपी बाळासाहेबचे चुलतभाऊ शंकर भानुदास भगत (धेडगे) (वय ३०) याच्या पत्नीशी अनैतिक संबध होते. हे समजल्याने शंकर पत्नीला मारहान … Read more

विकृतीचा कळस! प्रेयसीसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे निर्दयी पतीने महिलेच्या गुप्तांगात टाकले दुचाकीचे हँडल !

मध्य प्रदेश :- पत्नीने प्रेयसीसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे स्वताच्या पत्नीच्या गुप्तांगामध्ये नराधम आणि निर्दयी पतीनं गुप्तांगात दुचाकीचा हँडलं घातल्याचं समोर आलं आहे.  हे वाचल्यानंतर तुमचे विचार बंद होतील पण हा मन हेलावून टाकणारा प्रकार इंदौरमध्ये घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि दोन वर्षांपूर्वी येथील एका व्यक्तीने परस्त्रीसोबतच्या अफेअरमुळे पत्नीला मारहाण केल्यानंतर तिच्या गुप्तांगात … Read more

उदयोजक नरेंद्र फिरोदिया यांना मसाप कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

अहमदनगर: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना तर वाडमयीन चळवळीसाठीच्या योगदानाबद्दल डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार, नोहा मस्सील (इस्राईल) यांना जाहीर झाला आहे. प्रथमच भारताबाहेरील व्यक्तीस हा कार्यकर्ता पुरस्कार दिला जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता … Read more

विवाहित तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ‘त्या’ महिलेला अटक !

अहमदनगर :- सागर विलास कानडे या विवाहित तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गौरी जगताप या महिलेला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गौरीच्या जाचाला कंटाळून सागरने २ मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचे वडील विलास कानडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गौरी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. … Read more

गळफास घेऊन शिक्षिकेची आत्महत्या

जामखेड :- येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील शिक्षिका विजया नितीन वराट (वय ४०, माहेरचे नाव विजया सीताराम गुजर) यांनी बुधवारी मध्यरात्री तपनेश्वर भागातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शिक्षण विभागात व परिसरात खळबळ उडाली. अंत्यविधी गुरूवारी सकाळी झाला. त्यांच्यामागे पती, मुलगी, मुलगा, सासू-सासरे, आई-वडील,भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले … Read more

नगरसेवकांसह ४० समर्थकांविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर :- बसपचे नगरसेवक मुदस्सर शेख व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अरिफ शेख यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी रात्री हाणामारी झाली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी दोन्ही आजी- माजी नगरसेवकांसह ४० समर्थकांविरूध्द गुन्हा दाखल केला. दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाले. सर्जेपुरा परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अरिफ शेख व मुदस्सर शेख यांच्या समर्थकांत राडा झाला. दगडफेेक झाल्याने परिसरात … Read more

विहिरीत पडून एकाचा मृत्यू

कोपरगाव | खिर्डी गणेश शिवारात शेत गट नंबर ५४ मधील विहिरीत बाळासाहेब विठ्ठल शेटे (४५, बोलकी) यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसटी बसचालकास मारहाण

कोपरगाव :- पुणे-धुळे एसटी बस (एमएच १४ बीटी ३२९०) धुळ्याकडे जात असताना एकाने स्वीफ्ट डिझायर कार (एमएच १७ बीव्ही ९६९१) आडवी लावून माझ्या मावस बहिणीला सावळविहीर येथे का उतरवले नाही? असे म्हणत बसचालकास मारहाण व शिवीगाळ केली. नगर-मनमाड महामार्गावर तीनचारी येथे गुरूवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे…

अवीट गोडी असणारं जांभूळ हे फळ खाण्यातली मजा काही न्यारीच आहे. त्याचवेळी आरोग्यासाठीही हे फळ अतिशय उपयुक्त आहे. जांभळामुळे पित्त कमी होते. थकवा दूर होतो. शिवाय तहानही भागते.आज आपण पहाणार आहोत जांभळाचे आरोग्यदायी फायदे… जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो जांभळामध्ये … Read more

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

संगमनेर : तालुक्यातील पेमगिरी येथील रामदास बबन जेडगुले (वय ३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १४) सकाळी साडेसात वाजेच्या पूर्वी घडली. याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पेमगिरी याठिकाणी रामदास जेडगुले हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या पूर्वी त्यांनी आपल्या राहत्या घरात … Read more

पाणी भरण्याच्या वादातून बेदम मारहाण

नेवासा : नेवासा खुर्द परिसरात रहाणारे शेतकरी गोरख आजीनाथ जाधव (वय २७) या तरुणाचे दि. १२ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाणी भरण्यावरून झालेल्या वादाच्या कारणातून जमाव जमवून गज व काठ्यानेबेदम मारहाण करून डोके फोडले. हातावर मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी गोरख जाधव या शेतकऱ्यांने नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरून दामू पिराजी जाधव, … Read more

शिवीगाळ, दमदाटी करत चाकु दाखवत मारुन टाकण्याची धमकी

अहमदनगर : गंगा उद्यान परिसरातील मिस्किन मळा येथे पायी चालणाऱ्या निखिल राजेंद्र सोनवणे (वय १७, रा. चव्हाणवाडी, गेवराई, बीड) यास चार अनोळखी इसमांनी काही एक कारण नसताना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारून चाकुने मारुन टाकण्याची धमकी दिली. या मारहाणीत निखिल सोनवणे गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि.११) रात्री ११ च्या सुमारास येथे घडली. याप्रकरणी … Read more

पोलीस बंदोबस्त असून यात्रेत गोंधळ, तलवारी घेऊन माजवली दहशत !

श्रीरामपूर :- तालुक्यातील टाकळीभान येथील ग्रामदैवत श्री महादेव यांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत झाला; मात्र यात्रेत पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही मोठ्या प्रमाणावर भुरट्या चो‍ऱ्या झाल्या, तसेच खुलेआम तलवारी घेऊन दहशत निर्माण करण्याचे प्रकार झाल्याने भाविक व ग्रामस्थांमधून पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. सोरट, चिवचिव याची एक सामाजिक कार्यकर्ता पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यासाठी मोबाइलमध्ये व्हिडिओ … Read more