माजीमंत्री पाचपुते आणि आमदार कर्डिलेंकडून खासदार गांधींना टोमणे

अहमदनगर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत माजीमंत्री बबनराव पाचपुते व आमदार शिवाजी कर्डिले यांनी खा.दिलीप गांधीना टोमणे मारले. माजी मंत्री पाचपुते यांनी साकळाईसाठी आपण कसे प्रयत्न केले, याचा पाढा वाचला. मागील सभेत खासदार गांधी यांनी डॉ. विखेंना मतदान करा एवढे म्हटले असते, तरी लोकांनी डोक्यावर घेतले … Read more

महिलेसह तिघांना तलवारीचा धाक दाखवून मारहाण

अहमदनगर :- भांडण झालेल्या तरुणास घरात लपवून ठेवल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी एका महिलेसह तिघांना तलवारीचा धाक दाखवत मारहाण केली. केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सुप्रिया महेश गाडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. फिर्यादीच्या घरासमोर मोठ्याने आरडाओरड सुरू होती. ते … Read more

मोठ्या भावालाही ज्यांनी सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार ?

अहमदनगर :- कुटुंबातील मी थोरला मुलगा असूनही वडील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांना अग्नी देऊ दिला नाही, असा आरोप राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी मंगळवारी केला. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत विखे बोलत होते. नगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली नाही, याबद्दलही त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले. मोठ्या भावालाही … Read more

‘सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे यांना काँग्रेस पक्षाने काय दिले नाही ?

पारनेर :- सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे परिवाराला काँग्रेस पक्षाने काय दिले नाही.असा सवाल साधत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर निशाना साधला. दिवंगत बाळासाहेब विखे पाटील हे ३५ वर्षे खासदार होते. परंतू त्यांनी आपला सुसंस्कृतपणा कधी सोडला नाही. काल परवा आलेले तुझा बंदोबस्त करतो, अशी भाषा वापरत आहेत. उमेदवारांना अशी भाषा शोभत नाही. ज्या भाजपवर … Read more

वीजचोरी प्रकरणी ‘त्या’ उपनगराध्याक्षांना कोठडी

कोपरगाव :- वीजचोरीप्रकरणी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांना सोमवारी १७ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. वाजे यांच्या समर्थ बर्फ कारखान्यात वीजचोरी होत असल्याचे आढळल्याने २१ लाख ६३ हजार रुपयांच्या बिलाची आकारणी करून त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या या कारखान्यावर मुंबईच्या वीज कंपनीच्या भरारी पथकाने छापा टाकला. मीटरची तपासणी केली असता त्यात फेरफार … Read more

सुजय विखे दमबाजीची भाषा करतात,आजोबांसारखीच परिस्थिती त्यांचीही होईल !

श्रीगोंदे :- भाजपला पाच वर्षांत स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाहीत, ते विकासावर काय बोलणार? सुजय विखेंना राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याचे ठरवूनही ते भाजपमध्ये का गेले? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते. विखे घराण्याला सर्व पक्षांची चाचपणी करण्याचा इतिहास आहे, … Read more

डॉ. सुजय विखे,आ.संग्राम जगताप यांच्यासह १२ जणांना नोटिसा

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे, ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यासह एकूण १२ उमेदवारांच्या खर्च तपासणीत त्रुटी आढळल्या. त्यामुळे त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर ४८ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश आहेत. १ ते १० एप्रिल या कालावधीत उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी शनिवारी झाली. प्रत्येक उमेदवाराला … Read more

लावणीसम्राज्ञी राजश्री काळे यांचा मुलगा जिद्दीच्या जोरावर झाला कलेक्टर !

अहमदनगर :- शिक्षणापासून कोसो दूर राहिलेल्या कोल्हाटी समाजातील अमित मारुतराव काळे हा गेल्या वर्षीच यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. गेल्या आठवड्यातच अमित कलेक्टर झाला असून, अमित या समाजातील पहिला मुलगा आहे जो कलेक्टर झाला आहे. नगर शहरातील बुरूडगाव रस्ता येथील काळे गल्ली येथे राहणाऱ्या अमितने जिद्द, चिकाटीच्या जोरावर ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तमाशासाठी गावोगाव … Read more

…म्हणून राष्ट्रवादीने सुजयला उमेदवारी नाकारली

श्रीगोंदे :- पुणेकर पाण्याच्या बाबतीत अन्याय करतात. त्यांचे ऐकेल अशांनाच ते उमेदवारी देतात. यापूर्वी बाळासाहेब विखे यांनी पाण्यासाठी पुणेकरांशी संघर्ष केला. उद्या सुजय विखे शेतकऱ्यांसाठी पुणेकरांशी दोन हात करेल. म्हणूनच मी राज्याचा विरोधी पक्षनेता असूनही सुजयला त्यांनी उमेदवारी नाकारली. असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. कुकडी आणि घोड धरणासह भीमा नदीला पाण्यासाठी … Read more

डॉ.सुजय विखे यांची व्हॉट्सॲप वरुन बदनामी करणा-यां विरोधात तक्रार.

अहमदनगर :- लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील याच्या विरोधात समाज माध्यमांमध्ये ‘अहमदनगर दक्षिण मुन्ना भाई एम.बी.बी.एस’ या शिर्षकाखाली व्यगंचित्र काढुन प्रसिध्द केल्याचे कारणाने गुड्डु खताळ अथवा मुळ प्रसारक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार निवडणुक निर्णय आधिका-यांकडे करण्यात आली आहे. सदरचे व्यंगचित्र प्रसारीत करणा-याला डॉ.सुजय विखे पाटील यांची वैद्यकीय क्षेत्रातील पदवी व … Read more

खा.दिलीप गांधींना बोलू दिले नाही, यामागे कोणाचा हात होता, याचा सोक्षमोक्ष लावा !

अहमदनगर :- भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत खा. दिलीप गांधी यांना भाषण करण्यापासून रोखणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचा बेरकीपणा याची देही याची डोळा ‘सर्वांनीच अनुभवला. प्रा. बेरड यांच्या या बेरकीपणामुळे खा. गांधी समर्थक चांगलेच भडकले आहेत. बेरडने गांधींना बोलू दिले नाही, यामागे कोणाचा हात होता, याचा सोक्षमोक्ष … Read more

मोदींसारख्या नेतृत्वामुळे जगात देशाची मान उंचावली !

अहमदनगर : युती सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी चांगले नर्णिय घेतले असून मोदींसारखे खमके नेतृत्व देशाला लाभल्याने देशाची मान जागतिक स्तरावर अभिमानाने उंचावली आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणुक महत्वपुर्ण आहे. नगरमध्ये दहशत नर्मिाण करणाऱ्यांच्या व विकासकामांना खो घालणाऱ्यांच्या पाठीशी जनता कदापी उभी राहणार नाही. डॉ. सुजय विखे हे राज्यातील मोजक्या … Read more

जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपकडून ‘साकळाई’चे गाजर.

अहमदनगर :गेल्या साडेचार वर्षात पोकळ घोषणा आणि खोटी आश्वासने देवून जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी पट्टयातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी साकळाई योजनेचे गाजर दाखवण्यिाची योजना आखली आहे. हे गाजर घेवून खुद्द मुख्यमंत्री वाळकीत येणार आहेत. पण त्यांच्याकडून ही योजना पूर्ण होवू शकत नाही. या दुष्काळी भागाला केवळ राष्ट्रवादी … Read more

अतक्रिमण करण्याची सवय कोणाची आहे हे नगरकर चांगलेच जाणुन – डॉ.सुजय विखे.

अहमदनगर : आज उत्तरेचे अतक्रिमण म्हणून आमच्यावर निरर्थक टिका केली जाते पण अतक्रिमण करण्याची सवय कोणाची आहे हे नगरकर चांगलेच जाणुन आहेत. समोरचा उमेदवार मी तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध असल्याचे गुणगान गात आहे पण तुम्ही त्याला तुमच्या कामाचा अर्ज देवू शकता का? असा सवाल डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. नुसते उपलब्ध असुन चालत नाही … Read more

प्रेमप्रकरणातून कुमारी मातेने दिला बाळाला जन्म; तरुणाविरुद्ध गुन्हा.

श्रीगोंदे :- तालुक्यातील अजूनज परिसरात युवती व गार येथील विनायक पांडुरंग मगर यांच्या प्रेमप्रकरणात प्रियकराने लग्न न करताच शारीरिक संबंध ठेवल्याने प्रेयसीने एका बाळाला जन्म दिला. मात्र या बाळाला विनायक मगरने स्वीकारण्यास तयार नसल्याने पीडित कुमारी मातेने याबाबत श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल केला. ही घटना दौंड परिसरात घडली असल्याने गुन्हा दौंड पोलिसात वर्ग करण्यात आला, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे पुन्हा डोके वर.

अहमदनगर :- जिल्ह्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा ज्वर वाढू लागला आहे. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे ३३ संशयीत स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून संशयित रुग्णांवर तातडीने उपाय करण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठ ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती … Read more

दोन युवकांना तरी नोकरी दिली का?

पाथर्डी :- शेती आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात काहीच बोलत नाही. फक्त कागदावरच कर्जमाफी, दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार, प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख आदी फसव्या घोषणांची गाजरं दाखविण्याचे काम केले. दोन कोटीऐवजी दोन युवकांना तरी या सरकारने नोकरी दिली का, किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला, असा खोचक सवाल आमदार संग्राम जगताप यांनी … Read more

सात महिन्यांपासून शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्याला अटक.

पारनेर | गेल्या सात महिन्यांपासून अल्पवयीन शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्यास पोलिसांनी अटक करत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पारनेर शहराजवळील उपनगरात ही घटना घडली. सतीश बन्सी उमाप (३५, राहुलनगर) असे आरोपीचे नाव आहे. अत्याचारीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, १२ सप्टेंबर २०१८ रोजी लहान मुलांच्या मंडळाची गणपती बसवण्याची तयारी करत असताना सतीशने … Read more