अहमदनगर :- कुटुंबातील मी थोरला मुलगा असूनही वडील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांना अग्नी देऊ दिला नाही, असा आरोप राधाकृष्ण विखे यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी मंगळवारी केला.
राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत विखे बोलत होते. नगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली नाही, याबद्दलही त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले.
मोठ्या भावालाही ज्यांनी सोडले नाही, ते लोकांना काय सोडणार? असा सवालही विखे यांनी केला. शरद पवार हे व्यासपीठावर असतानाच विखे यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर आरोप केले हे विशेष.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांचे काका अशोक विखे यांना राष्ट्रवादीने व्यासपीठावर बोलावून एकच खळबळ उडवून दिली.
- RBI Decision: आरबीआयने लगावली बँकांना चपराक! ग्राहकांना ‘ते’ व्याज परत करण्याच्या सूचना, ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा
- Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा आणि महिन्याला मिळवा 5550 रुपये उत्पन्न! जाणून घ्या माहिती
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारने कर्मचाऱ्यांच्या ‘या’ दोन भत्त्यात केली वाढ, त्यामुळे पगारात देखील होणार वाढ
- कार खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! Mahindra XUV 3XO लाँच झाली, मायलेज अन सेफ्टी फीचर्स आहेत दमदार, किंमत किती ?
- DY Patil Vidyapeeth Pune : पुण्यातील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठात नोकरी करण्याची उत्तम संधी, वाचा सविस्तर…