Post Office Scheme:- पैशांची बचत आणि गुंतवणूक या गोष्टी खूप महत्त्वाच्या असून आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील खूप महत्त्व आहे. बहुतेक गुंतवणूक करणारे व्यक्ती हे गुंतवणुकीचे सुरक्षितता आणि परताव्याचे हमी या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करतात.
त्यामुळे जास्त करून प्राधान्य हे बँकेच्या विविध मुदत ठेव योजना, सरकारच्या अल्पबचत योजना आणि अलीकडच्या काळात पोस्ट ऑफिसच्या योजना देखील आता गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील अनेक आकर्षक अशा योजना राबविण्यात येतात व यामध्ये लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर देखील दिला जातो.
गुंतवणूक सुरक्षितता आणि परताव्याच्या अनुषंगाने देखील पोस्ट ऑफिसच्या योजनावर लोकांचा विश्वास जास्त आहे. अशाप्रकारे जर पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांपैकी जर आपण पोस्ट ऑफिस मंथली सेविंग स्कीमविषयी माहिती घेतली तर ही एक महत्त्वाची गुंतवणूक योजना असून यात तुम्ही एक रकमी गुंतवणूक करून महिन्याला परतावा मिळवू शकतात व गुंतवणूक देखील सुरक्षित ठेवू शकता.
कसे आहे पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमचे स्वरूप?
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूकदार एका खात्यामध्ये नऊ लाख रुपये आणि जर जॉईंट खाते असेल तर यामध्ये 15 लाख रुपये एकावेळी जमा करू शकतात. या योजनेत तुम्हाला तुमची मूळ रक्कम पाच वर्षाच्या परिपक्वता कालावधीनंतर परत केली जाईल.
तुम्हाला जर यामध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही 5-5 वर्षांनी यामध्ये वाढ करू शकतात. या योजनेत तुम्हाला प्रत्येक पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर मूळ रक्कम काढता येऊ शकते किंवा योजनेला मुदतवाढ देता येऊ शकते. तसेच या योजनेच्या खात्यात जे काही व्याज मिळते ते प्रत्येक महिन्याला पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये भरले जाते.
या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर टीडीएस कापला जात नाही. मात्र मिळणारे व्याज हे करपात्र असते. तसेच या योजनेची मुदत पूर्ण होण्याआधी जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर ते काढता येतात. या योजनेत खाते सुरू व्हायला एक वर्ष पूर्ण होणे गरजेचे असते. त्या अगोदर तुम्हाला या खात्यातून रक्कम काढता येत नाही.
या योजनेत प्री मॅच्युअर क्लोजर च्या बाबतीत देखील दंड भरावा लागतो. जर तुम्ही एक ते तीन वर्षाच्या दरम्यान पैसे काढले तर तुमच्या एकूण ठेवलेल्या रकमेमध्ये दोन टक्के कपात केली जाते आणि पैसे परत केले जातात.
या योजनेमध्ये तुम्ही जर नऊ लाख रुपयाचे गुंतवणूक पाच वर्षांकरिता केली तर तुम्हाला यावर 7.4% वार्षिक व्याज मिळते. या माध्यमातून तुम्हाला व्याजातून पाच वर्षात तीन लाख 33 हजार रुपयांची कमाई होते व नऊ लाख रुपये गुंतवणुकीतून तुम्हाला प्रत्येक महिन्याला मासिक उत्पन्न 5550 रुपये मिळते.