सुजय विखेंची दादागिरी सहन करणार नाही !

अहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे. भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा व लोणीकरांची दादागिरी आता युवक सहन करणार नाही, असा इशारा केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिला. तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी गावातील नागरिकांशी … Read more

अच्छे दिन कब आएंगे ? मोदींच्या सभेत महिलेचा प्रश्न

अहमदनगर :- युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी प्रचारसभा घेतली. या सभेवेळी एका महिलेने झळकावलेल्या पोस्टर्सची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे. ‘शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? शेतमालाला हमीभाव कधी मिळणार?’ असे प्रश्न विचारणारे पोस्टर्स या महिलेने झळकावले. त्यामुळे पंतप्रधान मोदींची नगरमधील सभा चर्चेत आली आहे. मोदींच्या या सभेत काळे कपडे … Read more

…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये प्रवेश

अहमदनगर :- राजकारणात केव्हा काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्या गोष्टींमध्ये फायदा असेल तो निर्णय त्या वेळी घेतला जातो. त्यामुळे चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा राज्यात युतीला होऊ शकतो. केंद्रात … Read more

मोदी नगरकरांना घाबरले ?सभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी !

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा झाली. मात्र या सभेआधी काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जो कोणी सभेला काळे कपडे घालून येत होता, त्याला सभास्थळी प्रवेश दिला जात नव्हता. इतकंच नाही तर खिशात काळ्या रंगाचा … Read more

2 मिनिटं बोलू द्या मला ; भाषण रोखल्याने मोदींच्या सभेत खा. गांधी भडकले !

अहमदनगर :- मला किमान दोन मिनिटे तरी बोलू द्या. मी विकास केला नाही असं बोललं जात पण मी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे. यात सगळं काही आहे. असं म्हणत खासदार गाधी संतापले. मोदींच्या सभेत व्यासपीठावर मोदींचं आगमन होण्याआधी खासदार दिलीप गांधी यांचं भाषण सुरु झालं. परंतु अचानक जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी गांधींना … Read more

Live : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : नरेंद्र मोदी.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे आणि अजित पवारांचे लाज वाटणारे वक्तव्य, ही विरोधकांची ओळख – मोदी इतिहास साक्षी आहे, भारतात स्वराजाची संकल्पना सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवली – मोदी जो पैसा मध्य प्रदेश सरकारला कुपोषण निर्मुलनासाठी दिला, तोच पैसा काँग्रेस निवडणुकीसाठी वापरत आहे – मोदी काँग्रेस हटाव, तरच देश पुढे जाईल – मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर … Read more

Live Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगरला प्रचार सभा होत आहे. Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा शरद पवार, तुम्हाला देशात दोन पंतप्रधानांचा मुद्दा मान्य आहे? काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल? – मोदी जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं करु, असे म्हणणाऱ्यांच्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी उभे आहेत … Read more

सुनेच्या भावानेच केला महिलेचा विनयभंग.

अहमदनगर :- सुनेच्या भावानेच महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार दिल्लीगेटच्या मोहनबागेत घडला. रविवारी घडलेल्या या घटनेचा गुन्हा सोमवारी दाखल झाला आहे. भूतकरवाडीमधील नातेवाईक असलेल्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पिडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पिडित महिलेच्या बहिणीला त्रास का देता असे म्हणून शिवीगाळ करत थोबाडीत मारली. तसेच साडी, … Read more

प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा मृत्यू

नेवासे :- लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील मतदान कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या पहिल्याच प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक कर्मचारी अर्जुन रघुनाथ शिंदे (राहणार भेंडे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेने नेवासे तालुक्यात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यात २६९ मतदान केंद्र आहेत. त्यासाठी नियुक्त १४९९ कर्मचाऱ्यांना गुरूवारी पहिले प्रशिक्षण देण्यात आले. नेवासे शहराबाहेर असलेल्या रामलीला मंगल कार्यालयात हे … Read more

छगन भुजबळ यांची श्रीगोंद्यात सभा.

श्रीगोंदे :- माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांची सभा १५ ला श्रीगोंद्यात होणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनशक्ती विकास आघाडी, आरपीआय कवाडे गट व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ दुपारी ३ वाजता संत शेख महंमद महाराज पटांगणात ही सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष … Read more

डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरमध्ये !

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगरला प्रचार सभा होणार आहे. सावेडीतील निरंकारी भवनाच्या पाठीमागे असलेल्या मैदानावर सभेसाठी व्यासपीठ, सभेला येणार्‍या नागरिकांसाठी सुमारे साडेतीन लाख चौरस फुटांवर मंडप उभारणी करण्यात येत आहे. सभेच्या ठिकाणी सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन आहे. जिल्ह्याबाहेरील पोलिसांचा … Read more

विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी.

अहमदनगर :- प्रवरा साखर कारखान्यात अभियंता पदावर काम करणाऱ्या केशव कुलकर्णी यांचा संगनमत करुन खून केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर करण्यात आला आहे.  अभियंता केशव कुलकर्णी यांच्या मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील यांच्यासह इतर तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात … Read more

पोलिसाला धक्काबुक्की करणे तरुणाला पडले महागात !

संगमनेर :- बसस्थानकावर प्रवासी महिलेशी वाद घालताना हटकले म्हणून पोलिसालाच धक्काबुक्की करणाऱ्या मुजाहिद हबीबसाहब शेख (२६ वर्षे, राजापूर) बसस्थानकावर प्रवासी महिलेशी वाद घालताना हटकले म्हणून पोलिसालाच धक्काबुक्की करणाऱ्या मुजाहिद हबीबसाहब शेख (२६ वर्षे, राजापूर) या तरुणाला न्यायालयाने दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. वर्षभराच्या आतच न्यायालयाने या खटल्याचा निकाल दिला. १९ जुलै २०१८ रोजी दुपारी … Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता !

अहमदनगर :- राधाकृष्ण विखे पाटील जेव्हापासून विरोधीपक्षनेते झाले तेव्हा पासून त्यांचे भाजपाशी साटंलोटं असल्याचा आरोप त्यांचे बंधू अशोक विखे पाटील यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत या ट्रस्ट ला २०१३-१४ मध्ये दोन कोटी रुपये डोनेशन मिळाले. हे डोनेशन त्यांना झाकीर नाईक नावाच्या अतिरेक्याकडून मिळाल्याचा गौप्य स्फोट राधाकृष्ण् विखे पाटील … Read more

विखे पाटील भाजपात जातील असे वाटत नाही !

संगमनेर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येत असल्या,  तरी राज्यातील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने ते वेगळे वागतील असे मला वाटत नाही, अशी अपेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी व्यक्त केली. थोरात म्हणाले, विखे भाजपत जाणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांत सुरू आहे. तथापि, राज्यातील महत्त्वाची जबाबदारी … Read more

…त्या महिलेचा खून प्रेमप्रकरणातून,बारा तासांच्या आत खुनाच्या गुन्ह्याचा पोलिसांकडून पर्दाफाश !

संगमनेर :- तालुक्यातील कोकणगाव परिसरातील निझर्णेश्वर मंदिराच्या परिसरातील जंगलात महिलेचा संशयास्पद मृतदेह मंगळवारी आढळून आला.  आरोपींनी दुसऱ्या एका तरुणालादेखील लस्सीतून विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. दरम्यान पोलिसांनी बारकाईने तपास करत अवघ्या बारा तासांच्या आत खरा गुन्हेगार शोधून काढला. मंदाबाई लहानू जोंधळे (वय ४५, कोकणगाव) ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार सोमवारी रात्री पोलिसांत … Read more

पालकमंत्री राम शिंदेंच्या मतदारसंघातच सबसे बुरे दिन !

कर्जत :- भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांना अच्छे दिन’चे गाजर दाखवून देशाची व राज्याची सत्ता काबीज केली.  पण सामान्य माणूस, शेतकरी, व्यावसायिक मेटाकुटीला आला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातत मूलभूत सुविधांची समस्या आहे. सीतपूर गावात तीन महिन्यांपासून अंधार आहे. वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा टँकर पोहोचत नाही. हे अच्छे दिन नसून आतापर्यंतचे सबसे बुरे दिन’ आहेत, अशी … Read more

ब्रेकिंग : महिलेला पळवून नेवून केला खून,आणि नंतर मृतदेहासोबत केले असे काही….

संगमनेर : तालुक्यातील एका महिलेसह तिच्या मित्राला पळवून नेवून महिलेचा खून करून तिच्या मित्राला विषारी औषध पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,गाडी खराब झाली तू दावे घेवून ये, असा निरोप देवून महिलेला घराबाहेर बोलवून तिघाजणांनी तिला कारमधून पळवून नेले. ही घटना रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर सदर महिलेचा खून … Read more