पालकमंत्र्यांच्या गावात अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.

जामखेड :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यातील चौंडी गावात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. आरती पांडुरंग सायगुडे(वय-१७) असे मृत मुलीचे नाव असून. मृतदेह जळालेल्या अवस्थेत आहे. जलसंधारण मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचे हे गाव आहे. आरती चापडगाव येथील महाविद्यालयात शिकत होती. तेथूनच ती आठ दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर … Read more

#लोकसभा 2019 : पहिल्याच दिवशी २१ जणांनी नेले ३९ अर्ज !

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. पहिल्याच दिवशी एकूण २१ जणांनी ३९ अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना आज जारी झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली. या लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी, विनिर्दिष्ट सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी निवडणूक यंत्रणेचे १७ अधिकारी- कर्मचारी या प्रक्रियेसाठी … Read more

सुजय विखेंविरोधात सुवेंद्र गांधी ‘सुपरफास्ट’ !

अहमदनगर :- खा.दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करण्याची घोषणा केल्यानंतर मतदारसंघातील गावागावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काही झाले तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर सुवेंद्र आजही ठाम आहेत. उमेदवारी अर्ज भरताना मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाच्या विखेंचे काम कसे करायचे अशा शब्दांत ते मतदारसंघातील … Read more

सत्यजित तांबे म्हणतात ज्यानं निवडणुकीत पाडलं,आता त्याचाच प्रचार करण्याची वेळ आली !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत मला ज्या उमेदवाराने पाडले त्या उमेदवाराचाच आता लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्याची वेळ आली आहे. हे आता जिवावर आले आहे. मात्र, मी आघाडीचा धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काहीही झाले तरी आघाडीचा उमेदवार नगरमधून प्रचंड मतांनी निवडून आणणार आहे, अशा शब्दांत सत्यजित तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या … Read more

माजी महिला क्रिकेटपटू अ‍ॅड.कमल सावंत लोकसभेच्या मैदानात.

अहमदनगर :- महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील माजी खेळाडू कमल सावंत या अहमदनगर लोकसभा मतदार संघातून आपले भाग्य आजमावणार आहेत. ही माहिती त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. सावंत म्हणाल्या की, घराणेशाहीच्या विरोधात मी लोकसभा अपक्ष लढविणार आहे. सध्याच्या राजकारण्यांना शेतक-यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. शेतक-यांना वापरुन घेण्याचे काम राजकारण्यांकडून सातत्याने होत आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी असून, … Read more

जनसामान्यांसाठी माझे घर नेहमी उघडे – आ.संग्राम जगताप.

अहमदनगर :- बोधेगाव माझे काम करा, नाहीतर पाहून घेऊ असा दम कोणी देत असेल, तर काळजी करू नका, ते मी पाहतो. दक्षिणेत इथला उमेदवार आवश्यक असताना बाहेरील उमेदवार का? मागील वेळी झालेल्या चुकांचा त्रास सर्वांनी भोगला. यंदा तशी चूक न करता सेवेची संधी दिल्यास परिसरातील ३५ गावांचा विकास मी करेन, असे आश्वासन दिले. जनसामान्यांसाठी माझे … Read more

पुत्रप्रेमापोटी राधाकुष्ण विखे खा.दिलीप गांधींच्या भेटीला !

अहमदनगर :- काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. ही भेट कशासाठी होती हे समजलं नसलं तरी नगरमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विखेंचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार आहेत. तिकीट कापल्यामुळे नाराज असेलेल्या दिलीप गांधींची राधाकृष्ण विखेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. खासदार दिलीप … Read more

किरकोळ कारणातून झालेल्या वादातून पत्नीला दुसर्‍या मजल्यावरून फेकले !

अहमदनगर :- किरकोळ कारणातून झालेल्या वादातून पत्नीला पतीने इमारतीच्या दुसर्‍या मजल्याच्या गॅलरीतून फेकल्याची घटना नगरमध्ये घडली आहे. पती योगेश पोपटराव ओव्हळ ऊर्फ सावन (रा. केडगाव, नगर) याच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पत्नी प्रियंका (वय 24) यात गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, केडगाव येथील … Read more

सुजय विखेंच्या पराभवासाठी नगरमध्ये अजित पवारांनी पाठवली २०० तरुणांची टीम !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विखेंची जिरविण्यासाठी व राष्ट्रवादीचा विजय खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची २०० युवकांची फौज राष्ट्रवादीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी दक्षिणेत दाखल झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी आपले चिरंजीव डॉ . सुजय विखे यांना अहमदनगर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी … Read more

लोकसभा निवडणूक लढवली, तरच माझा प्रपंच चालेल असे नाही – सुजय विखे

अहमदनगर :- तुमच्याकडे गाड्या किती आहेत, हे कोणालाही ऐकायचं नाही. गाड्या कशा आल्या, पैसे कुठून आले हे मी आता सांगणार नाही.  गाड्या हे जर लोकसभेसाठी निकष असतील, तर मीही दहा गाड्या घेतो अशी फिरकी घेत डॉ.सुजय विखे यांनी आ.संग्राम जगताप यांची फिरकी घेतली. लोकसभा निवडणूक लढवली, तरच माझा प्रपंच चालेल असे नाही. ते म्हणतात, धनशक्ती … Read more

राष्ट्रवादीने माझी राजकीय कारकीर्द संपवली होती – आ.शिवाजी कर्डिले .

अहमदनगर : नगर जिल्ह्यात किंगमेकरच्या भूमिकेत राहणारे शिवाजी कर्डिले लोकसभा निवडणुकीत कुणाला मदत करणार याविषयी चर्चा होती. पण सुजय विखेंच्याच मागे राहणार असल्याचं शिवाजी कर्डिलेंनी स्पष्ट केलं आहे. नगर दक्षिणसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना तर भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आ.संग्राम जगताप हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे … Read more

पालकमंत्री शिंदे म्हणतात खा. दिलीप गांधी यांची चिंता तुम्ही करू नका

अहमदनगर :- खासदार दिलीप गांधी यांची चिंता तुम्ही करू नका, दोन दिवसांत मी पाहून घेतो, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंना आश्वस्त केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नगर येथे मंगळवारी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात … Read more

मुलगी पळून गेल्यामुळे तणावाखाली असलेल्या पित्याची आत्महत्या.

जळगाव : साखरपुडा झालेला असतांना मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने तणावाखाली असलेल्या पित्याने राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला असता नातेवाइकांनी एकच टाहो फोडला. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार कुसुंबा येथील आईस्क्रीम फॅक्टरीजवळील रहिवासी दत्तु गणपत बगळे (वय ५०) हे पत्नी आशा, दोन मुली, एक मुलगा यांच्यासह … Read more

भाजपा कार्यकर्त्यांचा लोकसभा प्रचारावर बहिष्कार !

कोपरगाव :- जोपर्यंत भाजपाच्या निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या (नरेंद्र मोदी विचार मंच) भावना समजावून घेत नाहीत, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेणार नसल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकाद्वारे दिली. कोपरगाव शहर व तालुक्‍यातील नरेंद्र मोदी विचार मंच व निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रहितासाठी नरेंद्र मोदींना … Read more

दोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू शकत नाही…

अहमदनगर :- आमचे दोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू शकत नाही. मागच्या साडेचार वर्षात ‘त्यांच्या’मुळेच नगरचे नाव देशात खराब झाले आहे. ते स्वतःला डॉक्टरही समजतात व उपचार करताना आणि मुळापासून आजार काढताना माणसांना मारूनच टाकता’, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांनी आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता केली भाजपचे उमेदवार डॉ. … Read more

…आणि शरद पवारांनी नगरमध्ये मुक्काम टाळला !

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश करून नगर मतदारसंघातून उमेदवारी केल्याने शरद पवार यांनी नगरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नगरला मुक्कामी थांबून दोन्ही निवडणुकांतील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची रणनीती शरद पवार निश्चित करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, केवळ चार ते पाच तास येथे थांबून व … Read more

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? असे करा चेक…

मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. 11 एप्रिलपासून सात टप्प्यात मतदान होणार आहे. 23 मे रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगानेही सर्व तयारी पूर्ण केली आहे.  मात्र, मतदार म्हणून आपलीही जबाबदारी आहे की, आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही, हे आताच तपासून घेणं. याचं कारण मतदान करणं आपला हक्क आहे. त्यामुळे मतदार … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 17 वर्षे सक्तमजुरी !

श्रीरामपूर :- तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या शिवाजी विठ्ठल शाख याला 17 वर्षे सक्तमजुरी व 60 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी शिवाजी शाख याने 3 जून 2017 रोजी पीडित मुलीस तिच्या मामाच्या घरून आईकडे नेवून सोडतो, असे सांगून घरी न सोडता गावाजवळील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व दुसर्‍या दिवशी … Read more