शिवसेना नगरसेवकांचे सेल्फी विथ ‘सुजय’ !

अहमदनगर :- डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी मुंबईहून नगरला आल्यानंतर आधी शिवसेनेचे शहराचे माजी आमदार अनिल राठोड यांची भेट घेतली. राठोड यांचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला असल्याने त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो, असे विखेंकडून स्पष्ट करण्यात आले व त्याला राठोडांनीही दुजोरा दिला.  राठोडांच्या घरी गेल्यानंतर डॉ. विखेंना घेऊन राठोड गांधी मैदानाजवळील लक्ष्मीबाई चौकात … Read more

फेक फेसबूक अकाउंट बनवून मुलीचे लग्न मोडले !

अहमदनगर :- लग्न जमलेल्या तरुणीचे फेसबूकवर बनावट अकाउंट तयार करून लग्न जमलेल्या तरुणाशी संवाद साधून लग्न मोडल्याचा प्रकार घडला आहे.  याप्रकरणी बीड जिल्ह्यातील निमगावदेवी येथील तरुण वैभव गहिनीनाथ फाळकेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार नगरच्या सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी भिंगारमधील तरुणीने फिर्याद नोंदविली आहे. २१ वर्षीय तरुणीचे भिंगारमधील एका तरुणाशी लग्न जमले होते. परंतु, … Read more

….तर सुजय विखे VS संग्राम जगताप फाईट होणार !

अहमदनगर :- काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नगरचं राजकारणच पालटलं आहे.  सुजय विखे पाटील यांना दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर होताच, सुजय विखेंविरोधात निवडणूक कोण लढवणार याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान विद्यमान विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप आणि त्यांचे सुपुत्र संग्राम जगताप. या दोघांपैकी … Read more

LIVE : सुजय विखेंच्या विरोधात राधाकृष्ण विखे प्रचार करणार नाहीत !

मुंबई :- सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर आज विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमासमोर येत त्यांची भूमिका स्पष्ट केली. सुजयच्या विरोधात प्रचार करणार नाही, मी नगरला प्रचाराला जाणार नाही, माझ्याबद्दल जर राष्ट्रवादीला संशय असेल तर मी प्रचार कसा करु? – राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसशी माझी बांधिलकी, ते सांगतील ते मी करेन, तोच निर्णय मान्य – … Read more

प्रशांत गडाखांची लोकसभा निवडणुकीतून एक्झीट !

अहमदनगर :- ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट  केली.  ‘लोकसभेची निवडणूक लढविण्याचा अनेकांनी आपल्याला आग्रह केला असला तरी आपण ही निवडणूक लढवणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित असून, त्यांच्याविरोधात प्रशांत गडाख उमेदवारी करणार असल्याची जोरदार चर्चा होती.  … Read more

अहमदनगर मध्ये पुन्हा १९९१ ची पुनरावृत्ती होणार !

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांनी भाजपच्या माध्यमातून एन्ट्री केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर लोकसभा मतदारसंघात पूर्वीसारखीच संघर्षाची स्थिती असून १९९१ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल, असे भाकीत वर्तवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी बुधवारी नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लक्ष्मीनारायण मंगल … Read more

भाजप प्रवेश झाला आता सुजय विखेंसमोर आहे ‘हे’ आव्हान.

अहमदनगर :- दक्षिण लोकसभा मतदार संघात डॉ. विखेंना उमेदवारी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी शहर भाजपमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातून मोठे मताधिक्य मिळवण्याचे आव्हान डॉ. विखेंसमोर असणार आहे. पण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधून डॉ. विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत अद्याप उघड नाराजी व्यक्त केली जात नाही. उलट युवा नेतृत्व असलेल्या सुजय … Read more

जिल्ह्याच्या राजकारणात आमदार शिवाजी कर्डिले ‘किंगमेकर’

राहुरी :- डाॅ. सुजय विखे यांना भाजपत घेण्यात किंगमेकर ठरले ते आमदार शिवाजी कर्डिले. तनपुरे कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभप्रसंगी डाॅ. विखे यांना भाजपत येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले होते.  तुम्ही भाजपत आलात, तर खासदार झालात म्हणून समजा, घाटावर रहायला या असे ते म्हणाले होते. सुरुवातीला डाॅ. विखे आपण अपक्ष उमेदवार आहोत, असे सांगत होते.  मात्र, राहुरीत … Read more

लष्करी अधिकाऱ्याकडून विनयभंग.

अहमदनगर :- लष्करी भागातील अधिकाऱ्यांचे निवासस्थान येथे लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीला अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी कॅप्टन जे. सुरेश यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  लष्करातील अधिकाऱ्याच्या पत्नीने याबाबत फिर्याद दिली आहे. अधिकारी निवास असलेल्या ऑफिसर एन्क्लेव्ह, जे. के. रोड येथे हा प्रकार घडला. फिर्याद देणारी महिला सोमवारी सांयकाळी आपल्या घरातील बाल्कनीमध्ये बसली होती. … Read more

कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत डॉ सुजय विखे यांचा निषेध !

पाथर्डी : डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाचे मंगळवारी शहरात पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत डॉ. विखे यांचा निषेध केला.  मंगळवारी (१२ मार्च) डॉ. सुजय विखे यांनी भाजपत प्रवेश करताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी विखे यांच्या निषेधाच्या घोषणा देत फटाके फोडले. या वेळी बोलताना नगरसेवक बंडू बोरुडे म्हणाले की, ‘विखे कुटुंबाने … Read more

सुजय विखेंच्या प्रवेशानंतर खा.दिलीप गांधी म्हणतात ….

अहमदनगर :- ‘डॉ. सुजय विखे यांचे भाजपमध्ये मी स्वागत करतो. त्यांच्या येण्याने पक्ष संघटन वाढू शकते. पक्षाच्या धोरणानुसार पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, नगरच्या जनतेने तीन वेळा खासदार व एकदा मंत्री केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘नगरच्या जनतेच्या प्रेमाच्या ऋणातच मी … Read more

वाचा काय म्हणाले सुजय विखे भाजप प्रवेश करताना….

मोदी साहेब, शाह साहेब आणि फडणवीस साहेब यांचे आभार, कारण त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून संधी दिली – सुजय विखे पाटील मला भाजपमध्ये प्रवेश दिला त्याबदल्ल सर्व नेत्यांचे आभार – सुजय विखे पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेले निर्णय पाहता, मोदींच्या प्रभावातून माझ्यासह युवकांनी भाजपमध्ये प्रवेश – सुजय विखे पाटील माझ्या वडिलांच्या विरुद्ध निर्णय … Read more

LIVE UPDATE : सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश.

मुंबई :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. माझ्या वडीलांच्या इच्छेविरोधात जाऊन मला हा निर्णय घ्यावा लागला. भाजपात येण्याची ही भूमिका ही सुजय विखे पाटील याची वैयक्तिक भूमिका आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी … Read more

केडगावची पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत होणार ?

अहमदनगर :- महापालिका निवडणुकीत झालेल्या केडगावची पुनरावृत्ती आता लोकसभा निवडणुकीत होणार आहे. सत्ता नसताना वर्षानुवर्षे काँग्रेसबरोबर संघर्ष करणारे भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ. सुजय विखे यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसबरोबर मांडीला मांडी लावून बसणार आहेत. हे दिवस पाहण्यासाठीच आम्ही संघर्ष केला का? असा प्रश्न भाजपमधील जुने निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते आता करत आहेत.

डॉ . सुजय विखेंना भाजपचे ‘ टेन्शन ‘

अहमदनगर :- डॉ . सुजय विखे यांना भाजप प्रवेशाच्या आदल्या दिवशीच टेन्शन मध्ये असल्याचे दिसून आले . विखे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून जोरदार विरोध सुरू झाला आहे.  त्याचवेळी विखे यांचे समर्थकही भाजपमधील प्रवेशाबाबत चिंताजनक आहे . विखेसमोरच काही कार्यकर्त्यांनी नव्या पक्षात गेल्यानंतर पुढील वाटचालीबाबत काळजी व्यक्त केली.  नगरजवळील विळद घाट येथील विखे यांच्या कार्यालयात डॉ … Read more

डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी नकोच !

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय यांना भाजपमधून उमेदवारी देण्यास शहर व जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध कायम आहे.  सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विखेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.  त्यानंतर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी नगर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर तब्बल चार वेळा चर्चा केली. चर्चेत … Read more

खा.गांधी समर्थकांच्या घोषणाबाजीकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष !

अहमदनगर :- दिलीप गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’…’दिलीप गांधी झिंदाबाद’…अशा जोरजोरात सुरू असलेल्या घोषणांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुर्लक्ष केले.  यामुळे नगरचे भाजपचे खासदार गांधी यांचे समर्थक अस्वस्थ झाले. पण मुंबईत गांधी समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे मात्र राज्यभरात हा चर्चेचा विषय झाला.  दरम्यान, दुपारी फडणवीस यांनी घोषणाबाजांची भेट घेऊन नगरच्या उमेदवारीबाबत सारे … Read more

मामाच्या मुलीवरून दोघा सख्या भावांमध्ये मारहाण !

अहमदनगर :- मामाच्या मुलीवरून दोघा सख्या भावांमध्ये मारहाण झाली. एका भावाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केले.  नगर शहरातील सिद्धार्थनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला मारहाण करणे, शिवीगाळ करून दमदाटी करणे या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  यात बाळू राजू कांबळे जखमी झाला असून, त्याच्या फिर्यादीवरून गणेश राजू कांबळे याच्याविरुद्ध … Read more