‘मातोश्री’वर होणाऱ्या बैठकींमध्ये वाढ ! काय असेल उद्धव ठाकरेंचा पुढचा प्लॅन ?

१८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : शिवसेनेला (ठाकरे) लागलेली गळती रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रिय झाले असून त्यांनी पक्षाच्या खासदारांची २०, तर आमदारांची २५ फेब्रुवारीला बैठक बोलावली आहे.पक्षातील कमकुवत बाबींवर आणि विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गटनेते पदाबाबत तेव्हा चर्चा केली जाणार असल्याचे समजते. शिवसैनिक पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने ठाकरे यांचे टेंशन वाढले आहे.खासदार देखील सेनेची … Read more

तब्ब्ल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा डंका ! कोण होणार नवा मुख्यमंत्री ?

१८ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून येत्या गुरुवारी २० तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो.रामलीला मैदानावर शपथ सोहळा पार पडेल.पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री या शपथ सोहळ्याला उपस्थित असतील. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बुधवारी बैठक होणार आहे.या बैठकीत विधीमंडळ गटनेत्याची निवड केली जाईल.भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने … Read more

पुण्यात तयार झालेला देशातील पहिला थ्रीडी प्रिंटेड बंगला नेमका आहे तरी कसा ?

१८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : देशातील पहिला थ्रीडी प्रिंटेड बंगला उभा राहिला आहे तोही पुण्यात.मद्रास आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या डीप-टेक स्टार्टअप ट्वास्टाने हा थ्रीडी प्रिंटेड बांधकाम प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.पुण्यातील गोदरेज ईडन इस्टेट्स येथे चार महिन्यांच्या कालावधीत हा जी प्लस १ असा २,२०० चौरस फुटांचा बंगला पूर्णपणे जागेवरच बांधण्यात आला आहे. २०१६ मध्ये आयआयटी … Read more

त्या ‘धार्मिक’ यात्रेवर येणार संकट ! काय म्हणाले केंद्रीय आयुषमंत्री ?

१८ फेब्रुवारी २०२५ बुलढाणा : राज्यात ‘जीबीएस’चा धोका वाढत चालला आहे.या पार्श्वभूमीवर यात्रांवर निर्बंध घालण्याचे संकेत केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत. केंद्र व राज्य शासन ‘जीबीएस’वर मात करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मार्च महिन्यामध्ये बुलढाणा येथे सैलानी बाबांची मोठी यात्रा भरते. देशाच्या कानाकापेऱ्यातून भाविक येथे येतात.कोरोना काळात यात्रा,महोत्सवांना … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवणे बंधनकारक

१८ फेब्रुवारी २०२५ पुणे : राज्यात सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक करण्यात आले आहे.राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी २०१९च्या पूर्वीच्या वाहनांना नंबरप्लेट बसवण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे आदेश सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत.त्यामुळे वाहन चालकांना आता ३० एप्रिलपर्यंत ही नंबरप्लेट बसवता येणार आहे. पुणे शहरात … Read more

जिओ फायनान्शिअल शेअर्सची किंमत पुन्हा घसरली, स्टॉक होल्ड करावा की सेल ? तज्ञांनी दिली मोठी माहिती

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price : काल, 17 फेब्रुवारी 2025 रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात नरमाई दिसून आली. खरंतर गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहे आणि यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. शेअर बाजारातील घसरणीमुळे आत्तापर्यंत गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. दरम्यान, या घसरणीच्या काळातच जिओ फायनान्शिअल शेअर्स बाबत एक … Read more

आता अवैध वैद्यकीय व्यावसायिकांची खैर नाही: आरोग्य उपसंचालकांची जिल्हा रुग्णाालयास दिली अचानक भेट दिल्या ‘या’ सूचना

Ahilyanagar News: जिल्ह्यातील मुला-मुलींच्या लिंग गुणोत्तरातील दरी कमी होण्यासाठी जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करा. त्याचसोबत अवैध वैद्यकीय व्यावसायिकांची शोध मोहिम प्रभावीपणे राबवत त्यांच्यावर कारवाई करा असे निर्देश आरोग्य उपसंचालक रेखा गायकवाड यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले. आरोग्य उपसंचालक रेखा गायकवाड यांनी जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत विविध वॉर्डना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी … Read more

‘त्या’ नागरिकांची वणवण थांबणार: जल जीवन मिशन अंतर्गत अवघे ‘इतकी’ गावे झाली टँकरमुक्त…!

Ahilyanagar News : जिल्हयात मागील वर्षी एकूण ३४३ गावांना टंचाई कालावधीत टँकरने पिण्याचे पाणी पुरवठा सुरु होता. जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन योजनेच्या आराखड्यात १०८ गावे व २३५ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील गावांना टॅंकरने पाणी पुरवठा सुरु होता. सदर १०८ गावांपैकी आजमीतीस सुमारे ५९ गावांना टँकरमुक्त करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. तसेच मार्च अखेर … Read more

राज्याचा अर्थसंकल्प १० मार्चला सादर होणार ; ३ ते २१ मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन

१८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्याचा सन २०२५ – २६ चा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळात सादर केला जाईल.अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेसाठी दोन ; तर विभागवार मागण्यांवरील चर्चेसाठी पाच दिवस ठेवण्यात आले आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील. या पुरवणी मागण्या दोन दिवसांच्या चर्चेनंतर मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवल्या जातील.अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन आठवडे,म्हणजेच ३ ते २१ … Read more

खर्डा गावातील मदारी वसाहतींच्या कामाबाबत विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे दिले ‘हे ‘महत्वाचे आदेश)

Ahilyanagar News : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात २० मुस्लीम मदारी कुटुंबियांच्या वसाहतीसाठी निधीस मंजूरी देण्यात आली. ३१ मार्च पर्यंत या कामाला गती देऊन वसाहतीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. विधानपरिषद येथे मौजे खर्डा (ता. जामखेड) अहिल्यानगर जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत मदारी … Read more

SBI ने लाँच केली नवीन SIP ; किमान 250 रुपयांपासून सुरू करता येणार गुंतवणूक ! 250 रुपयांची SIP केल्यास किती रिटर्न मिळणार ?

SBI New SIP

SBI New SIP : तुम्हीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? अहो मग आजची ही बातमी खास तुमच्यासाठी. खरंतर अलीकडे बँकेच्या एफडी योजना आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याला अधिक पसंती दाखवली जात आहे. याचे कारण म्हणजे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकदारांना अधिकचा परतावा … Read more

जनतेच्या भावनांशी खेळू नका अन्यथा संगमनेर तालुका पेटून उठेल !

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गौरवशील संगमनेर तालुक्याचा विकास रोखण्यासाठी व तालुक्याची तोडफोड करण्यासाठी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी कुटील डाव करत आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय नियोजित केले आहे. हा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा तालुका पेटून उठेल असा आक्रमक इशारा कृती समितीने निवेदन देत प्रशासनाला दिला आहे. तहसीलदार कार्यालय येथे नव्याने आश्वी बुद्रुक अपर … Read more

11 Airbags आणि 567 KM रेंजसह भारतात लॉन्च झाली ही नवी Electric Car

BYD ने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक SUV Sealion 7 लाँच केली आहे, जी उच्च-कार्यक्षमता आणि प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. ही SUV Auto Expo 2025 मध्ये प्रथमच सादर करण्यात आली होती आणि त्याच दिवसापासून या वाहनाचे बुकिंग सुरू झाले आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक कार ₹48.9 लाख (एक्स-शोरूम) किंमतीत सादर केली असून, टॉप-स्पेक वेरिएंटची किंमत ₹54.9 लाख … Read more

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ कंपनी 1 शेअरवर 5 शेअर्स फ्री देणार, रेकॉर्ड डेट नोट करा

Bonus Share 2025

Bonus Share 2025 : शेअर बाजारात लहान कंपन्यांच्या हालचालींकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असते. अशातच, गुजरात टूलरूम लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सला 5:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच, प्रत्येक 1 शेअरसाठी गुंतवणूकदारांना 5 बोनस शेअर्स मिळणार आहेत. बोनस शेअर्ससाठी महत्त्वाची तारीख गुजरात टूलरूमचे शेअर्स 18 फेब्रुवारी 2025 रोजी बोनस … Read more

भारतातील सर्वात स्वस्त 7-सीटर कार झाली अपडेट ! आता मिळणार नवे सेफ्टी फीचर्स आणि स्टायलिश डिझाईन

Renault ने आपल्या लोकप्रिय SUV आणि MPV साठी नवीन MY25 अपडेटेड मॉडेल्स सादर केले आहेत. भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त 7-सीटर MPV आणि बजेट-फ्रेंडली SUV म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Kiger आणि Triber मध्ये आता अधिक आधुनिक फीचर्स आणि अपग्रेड्स मिळणार आहेत. या अपडेट्समुळे कार अधिक स्मार्ट आणि सुरक्षित बनली आहे. Renault ने Kiger च्या RXT(O) प्रकारात CVT … Read more

Maruti Ertiga खरेदी करायची आहे? किंमतीत मोठी वाढ – आता किती पैसे मोजावे लागतील?

भारतातील सर्वात लोकप्रिय आणि बजेट-फ्रेंडली 7-सीटर MPV असलेल्या Maruti Ertiga च्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. Maruti Suzuki ने काही महिन्यांपूर्वीच आपल्या इतर मॉडेल्सच्या किमतीत वाढ जाहीर केली होती आणि आता Ertiga च्या निवडक व्हेरिएंटच्या किंमती 10,000 ते 15,000 रुपयांनी वाढल्या आहेत. जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या बदललेल्या किंमती … Read more

झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमधील ‘या’ कंपनीचा स्टॉक 2 दिवसात 30 टक्क्यांनी घसरला, 1600 कोटी पाण्यात !

Jhunjhunwala Portfolio

Jhunjhunwala Portfolio : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. बाजारातील या अस्थिरतेचा फटका गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात बसत असून यामुळे गुंतवणूकदारांचे करोडो रुपये पाण्यात गेले आहेत. सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जारी केले जात आहेत. तसेच काही कंपन्या बोनस शेअरची आणि … Read more

12 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असेल तरी ITR भरावा लागणार का ? जाणून घ्या नव्या नियमांबाबत

New Income Tax Rule 2025

New Income Tax Rule 2025 : नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस केंद्र सरकारने करदात्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये सरकारने नवीन करप्रणालीत मोठे बदल केले असून, आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. यापूर्वी ही मर्यादा 7 लाख रुपये होती. या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होणार आहे. तथापि, करमुक्त उत्पन्न … Read more