सिद्धार्थनगर परिसरातून मुलगा व मुलीचे अपहरण

११ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : शहरातील सिद्धार्थनगर परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी व १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा असे दोघांचे अपहरण केल्याच्या २ वेगवेगळ्या घटना ८ व ९ फेब्रुवारी रोजी घडल्या आहेत.याबाबतची माहिती अशी की, लाल टाकी परिसरातील सिद्धार्थनगर, साठे चौकातील बंगल्यासमोर ८ फेब्रुवारीला संध्याकाळच्या वेळेस खेळणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलास एका इसमाने फूस लावून त्याचे … Read more

बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा : आ. जगताप

११ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : संपूर्ण देशात बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनासह राज्यकर्तेही चांगलेच सरसावले आहेत.अशाच पद्धतीने अहिल्यानगर शहराचे आ.संग्रामभैय्या जगताप हे ही बांगलादेशातील घुसखोरांवर कठोर कारवाईसाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत.आ. जगताप यांनी सोमवारी (दि.१०) समर्थकांसह जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे या प्रकरणी लक्ष वेधले तसेच महानगरपालिकेतील आयुक्त यशवंत डांगे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.बांगलादेशातील घुसखोरांवर … Read more

अहिल्यानगरच्या अभियंत्याचा महाबळेश्वरमध्ये डंका

११ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : महाबळेश्वर पासून केवळ ५ किलोमीटर अलिकडे असलेल्या पण पर्यटन व विकासापासून वंचित असलेल्या मेटगुताड या गावाचा कायापालट अहिल्यानगरच्या एका अभियंत्याने केला. त्या गावाला पर्यटनाच्या नकाशावर झळकावले. मेटगुताडला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्याकडे अद्याप सर्वांचे दुर्लक्ष होते.निसर्गाची कोणतीही मोडतोड न करता नव्या साईट तयार करून गावाचा कायापालट केला. नगरच्या सुहास मुळे यांनी अत्यल्प … Read more

मी अक्षय कर्डिले बोलतोय…! जनता दरबारातून जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक

११ फेब्रुवारी २०२५ करंजी : नगर- पाथर्डी मतदारसंघाचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अनुपस्थितीत बुऱ्हाणनगर येथे आयोजित जनता दरबारात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवल्या. जनता दरबारात कर्डिले यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करत मी अक्षय कर्डिले बोलतोय… म्हणत आलेल्या … Read more

वातावरण बदलाने फेबुवारीतच उन्हाळ्याची चाहूल

११ फेब्रुवारी २०२५ सुपा : सध्या वातावरणात कमालीचे बदल जाणवू लागले असून, रात्री अन् पहाटे गारठा जाणवत आहे. तर दिवसभर उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. सध्या दिवसा तापमानाचा पारा ३० अशांच्या पुढे गेल्याने फेब्रुवारीतच येणारा उन्हाळा कडक असेल याचे संकेत मिळू लागले आहेत. रात्रीच्या वेळी तापमान खाली येत असल्याने या वातावरणाचा आरोग्यावर विपरित परिणाम दिसून … Read more

राहुरी रेल्वे स्टेशन रस्त्यावर अद्यावत ग्रामीण रुग्णालय बांधकामास सुरुवात ; ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

११ फेब्रुवारी २०२५ तांदुळवाडी : राहुरी ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्यानंतर १५ वर्षांपासून नविन इमारतीसाठी सुरू असलेल्या संघर्षाला पुर्णविराम मिळाला असून शहरातील जुन्या जागेऐवजी राहुरी रेल्वे स्टेशन रस्त्यावरील नवीन जागेमध्ये ग्रामीण रुग्णालय स्थलांतरीत होत आहे. ३० बेडचे सुसज्ज अशा रुग्णालयासाठी ५.५ कोटी रुपये निधीचा पहिला टप्पा मंजूर झाल्यानंतर कामकाजास प्रारंभ झाला आहे. राज्याचे जलसंपदा … Read more

राहुरी फॅक्टरी येथे तीन ठिकाणी चोऱ्या, 3 लाखांचा ऐवज लंपास

११ फेब्रुवारी २०२५ राहुरी : राहुरी फॅक्टरी परिसरात एकाच रात्री बंद अवस्थेतील दोन घरे व एक हॉटेल फोडून अडीच ते तीन लाखांचा ऐवज चोरी गेला. आठवडे भरातील घरफोडीची ही तिसरी घटना घडल्याने फॅक्टरी परिसरात चोरट्यांची दहशत वाढली. पहिली घटना राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग होम कॉलनीत घडली. अज्ञात भामट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळवत … Read more

पाथर्डीतील कुंटणखान्यावर छापा, तीन महिलांची सुटका

११ फेब्रुवारी २०२५ पाथर्डी : शहरालगत असणाऱ्या नगर रोडवरील ‘हॉटेल मित्रधन’ मध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पाथर्डी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा घालून तीन महिलांची सुटका केली.याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथक पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याची माहिती घेत असताना, … Read more

Hyundai Creta Electric ने बाजारात घातला धुमाकूळ !

hyundai creta electric

भारतीय बाजारपेठेत Hyundai च्या गाड्यांना नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. मात्र, जानेवारी 2025 मध्ये Hyundai च्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांची यादी पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. विशेषतः Hyundai Creta Electric ने ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली असून, गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे. Hyundai कंपनी 2025 च्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर कंपनीने आपल्या … Read more

शिर्डीतील अवैध धंदे, गुन्हेगारी व दादागिरी करणाऱ्यांचा बिमोड करा : सदाशिव लोखंडे

११ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : शहरातील अवैध धंदे व दादागिरी कायमची मोडीत काढावी.दहशत मुक्त शिर्डी शहर निर्माण करण्यासाठी शासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीचे दादागिरी करणारे व अवैध धंद्याविरोधात कठोर कारवाई करावी.शिर्डी शहर दहशतमुक्त करावे,अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे सांगितले. … Read more

सोन्याचा भाव @88,500 ! पाच लाखांचे Gold Loan घेतले तर EMI किती भरावा लागेल ?

Gold Loan : सध्या सोन्याचा दर 88,000 रुपयांहून अधिक गेला आहे, त्यामुळे जर तुम्ही गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही उत्तम संधी ठरू शकते. सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे तुम्हाला तुमच्या तारण ठेवलेल्या सोन्यावर जास्त कर्ज मिळू शकते. जर तुम्हाला झटपट कर्ज हवे असेल आणि सोन्याचे दागिने तारण ठेवण्यास हरकत नसेल, तर गोल्ड लोन हा … Read more

मुळा नदीपात्रामध्ये तरुणाचा मृतदेह आढळला, आत्महत्या केल्याचा अंदाज

११ फेब्रुवारी २०२५ राहुरी : तालुक्यातील वळण परिसरातील मुळा नदी पात्रात एका विवाहित इसमाचा मृतदेह आढळून आला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आदिनाथ बाळासाहेब आढाव, वय ४०, रा. वळण असे मृताचे नाव आहे. इसमाने मुळा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. आदिनाथ बाळासाहेब आढाव हे शनिवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरातून … Read more

आमदार आशुतोष काळे यांच्या जनता दरबारात अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी

११ फेब्रुवारी २०२५ कोपरगाव : विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे व हे प्रश्न मार्गी लागताना त्यांना त्रास होऊ नये, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांसाठी ‘जनता दरबार’ व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेऊन तत्काळ सबंधित अधिकाऱ्याकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेऊन समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्याला जागेवरच … Read more

१५ फेब्रुवारी पासून कुकडीचे आवर्तन – आ. काशिनाथ दाते

११ फेब्रुवारी २०२५ पारनेर : कुकडी प्रकल्पातील येडगांव धरणातून निघोज व परिसरातील १४ गावांना कालव्याद्वारे पाणी दिले जाते. डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याच्या तारखा निश्चित करण्यात येत असून त्यानुसार हे आवर्तन २० फेब्रुवारी रोजी सोडण्यात येणार होते. मात्र पीकांना पाण्याची आवष्यकता असल्याने हे आवर्तन आगोदर सोडण्याची मागणी निघोज परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे केली होती. … Read more

मै हु डॉन आणि, झिंगाट या गाण्यावर नाचणे हा पराक्रम नव्हे. तर महिलांचा अपमान !

तिळगुळ देणे हा  सण भारतीय परंपरेत पवित्र मानला जातो. मात्र तिळगुळ या समारंभाच्या नावाखाली महिलांना एकत्र करून तमाम महिला भगिनी समोर लोकप्रतिनिधींनी  वेगवेगळ्या गाण्यांवर केलेला डान्स आणि धांगडधिंगा घालून संगमनेर मधील तमाम महिला भगिनींचा अपमान करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. संगमनेर तालुक्यात अशी असभ्य संस्कृती मान्य नसल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला जात … Read more

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणार आहात ? मग ‘या’ 5 फंडात गुंतवणूक करा आणि करोडोंचे रिटर्न मिळवा

Mutual Fund Scheme

Mutual Fund Scheme : जर तुम्हाला तुमच्याकडील पैसा कुठं गुंतवायचा असेल आणि त्यावर तुम्हाला अधिकचा परतावा मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडचा पर्याय बेस्ट ठरणार आहे. खरंतर अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिट किंवा मग इतर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करताना दिसतात. मात्र फिक्स डिपॉझिट मधून किंवा इतर बचत योजनांमधून ग्राहकांना फारसा परतावा मिळत नाही ही वास्तविकता … Read more

एसबीआय कडून 35 लाखांचे Home Loan पाहिजे, मग मासिक पगार किती असायला हवा ?

SBI Home Loan News

SBI Home Loan News : अलीकडे घरांच्या किमती वाढल्या आहेत आणि यामुळे घर निर्मितीसाठी अनेक जण गृह कर्ज घेण्याचा विचार करतात. देशातील बहुतांशी बँका आपल्या ग्राहकांसाठी कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया देखील आपल्या ग्राहकांना किमान व्याज दरात गृह कर्ज देते. … Read more

DeepSeek AI सोबत लॉन्च होणार जगातला सर्वात स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन ! पहा व्हिडीओ…

Oppo Find N5 :- Oppo फोल्डेबल स्मार्टफोन Find N5 सादर करण्याच्या तयारीत आहे, जो 20 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनबाबत अनेक लीक आणि अधिकृत माहिती समोर आली असून सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्या डिस्प्लेवर कोणतीही क्रीज दिसणार नाही. ओप्पोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वेइबोवर लाईव्ह फोटो शेअर केले आहेत.ज्यामध्ये फोन उघडलेल्या … Read more