एसबीआय कडून 35 लाखांचे Home Loan पाहिजे, मग मासिक पगार किती असायला हवा ?

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया देखील आपल्या ग्राहकांना किमान व्याज दरात गृह कर्ज देते. यामुळे अनेकजण एसबीआय कडून गृह कर्ज घेताना दिसतात. पण जर तुमचाही एसबीआय कडून होम लोन घेण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

Published on -

SBI Home Loan News : अलीकडे घरांच्या किमती वाढल्या आहेत आणि यामुळे घर निर्मितीसाठी अनेक जण गृह कर्ज घेण्याचा विचार करतात. देशातील बहुतांशी बँका आपल्या ग्राहकांसाठी कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया देखील आपल्या ग्राहकांना किमान व्याज दरात गृह कर्ज देते.

यामुळे अनेकजण एसबीआय कडून गृह कर्ज घेताना दिसतात. पण जर तुमचाही एसबीआय कडून होम लोन घेण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

खरंतर कोणतीही बँक गृह कर्ज देताना प्रथम अर्जदाराचा सिबिल स्कोर चेक करते, सिबिल स्कोर चांगला असेल तर अर्जदाराला लवकर कर्ज मंजूर होते आणि कमी व्याजदर लागते.

सिबिल स्कोर सोबतच अर्जदाराचा पगार देखील गृह करतात महत्त्वाची भूमिका निभावतो. बँका फक्त सिबिल स्कोर पाहून कर्ज देत नाही तर पगार देखील कर्ज मिळवण्यात तेवढाच महत्त्वाचा फॅक्टर असतो.

दरम्यान आज आपण जर एखाद्या व्यक्तीला एसबीआय कडून 35 लाखांचे होम लोन हव असेल तर त्याचा मासिक पगार किती असायला हवा? याच एक कॅल्क्युलेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

35 लाखांच्या गृहकर्जासाठी किती पगार असायला हवा?

जर तुमच्यावर सध्या कोणतेच कर्ज नसेल आणि तुम्हाला 35 लाख रुपयांचे कर्ज 30 वर्षांच्या कालावधीसाठी हवे असेल तर तुमचा मासिक पगार हा 55 हजार रुपयांच्या दरम्यान असायला हवा.

ज्या लोकांचा मासिक पगार 55 हजार रुपये इतका आहे त्या लोकांना एसबीआय कडून 35 लाख रुपयांचे गृह कर्ज मिळू शकते. पण जर तुमच्यावर आधीच एखादे कर्ज असेल तर तुम्हाला एसबीआय कडून एवढी रक्कम मिळणार आहे.

किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार ?

दरम्यान जर एसबीआय कडून 35 लाखांचे कर्ज 30 वर्षांसाठी मंजूर झाले तर 26912 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच या कालावधीत 61 लाख 88 हजार 310 रुपये फक्त व्याज म्हणून बँकेला द्यावे लागतील.

अर्थातच या कर्ज कालावधीमध्ये ग्राहकाला 96 लाख 88 हजार 310 रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत. पण, बँकेच्या किमान व्याजदरात ग्राहकाला इतके कर्ज मंजूर झाले तेव्हाच 26912 रुपयांचा मासिक हप्ता राहणार आहे, समजा जर व्याजदर यापेक्षा अधिक राहील तर त्यानुसार कर्जाचा हप्ता ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe