GBS च्या भीतीने पुणे हादरलं ! एक मृत्यू,१६ व्हेंटीलेटरवर, प्रशासनाचा अलर्ट

Pune News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत पुण्यात GBS चे 74 रुग्ण आढळले आहेत, ज्यापैकी 14 जणांना व्हेंटीलेटरवर उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महानगरपालिका प्रशासन अलर्ट मोडवर गेले असून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महापालिकेचा मोठा निर्णय पुणे महानगरपालिकेने GBS रुग्णांसाठी मोठा निर्णय … Read more

TATA Nexon घरी घेऊन जा फक्त फक्त २ लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर

TATA Nexon

टाटा मोटर्सची नेक्सॉन SUV गेल्या काही वर्षांत भारतातील लोकप्रिय कार्स पैकी एक बनली आहे. तिचं आकर्षक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान, उच्च सुरक्षितता, आणि उत्कृष्ट मायलेज यामुळे ती मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये चांगलीच पसंतीस उतरली आहे. जर तुम्ही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर टाटा नेक्सॉन फक्त २ लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर तुमची होऊ शकते. नेक्सॉनच्या किमती आणि … Read more

आधी झाला ‘बेपत्ता’ मग सापडला मृतदेह ! शहरात चाललंय तरी काय ?

२७ जानेवारी २०२५ :नगर मार्केट यार्ड पाठीमागील भवानीनगर येथून बेपत्ता झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह भवानीनगर परिसरात असलेल्या वेअर हाऊसच्या पाठीमागे २४ जानेवारीला दुपारी १२.४० च्या सुमारास मिळून आला आहे. इर्शाद मुजाहिद सय्यद (रा. भवानी नगर, वेअर हाऊस गोडावून समोर) असे या तरुणाचे नाव आहे. इर्शाद सय्यद हा २० जानेवारीला महात्मा फुले चौकातून चक्कर मारुन … Read more

‘या’ गावात आलेला बिबट्या पडला विहिरीत ; ‘रेस्क्यू ऑपरेशन’द्वारे मिळाले जीवनदान

२७ जानेवारी २०२५ नगर : नगर शहर परिसरात बिबट्यांचा वावर वाढलेला असून नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या जेऊर गावच्या परिसरात चापेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ‘रेस्क्यु ऑपरेशन’ राबवत बाहेर कडून जीवदान दिले आहे. २४ जानेवारीला दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० पर्यंत हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरु होते.बाहेर काढलेल्या बिबट्याला वनविभागाने … Read more

दिल्ली निवडणुकीसाठी भाजपचा तिसरा जाहीरनामा प्रकाशित ; तीन वर्षांत यमुना प्रदूषणमुक्त, २० लाख रोजगाराचे आश्वासन !

२७ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचा तिसरा व अंतिम जाहीरनामा जारी केला.याद्वारे भाजपने तीन वर्षांत यमुना नदी प्रदूषणमुक्त करण्याचे, ५० हजार सरकारी पदे भरण्याचे, रोजगाराच्या २० लाख संधी निर्माण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अमित शाह यांनी आपल्या आयुष्यात केजरीवालांसारखा खोटारडा माणूस पाहिला नाही, अशी टीकाही … Read more

ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली,त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र…

२७ जानेवारी २०२५ वडीगोद्री : गेल्या वर्षभरापासून मराठा समाज रस्त्यावर झुंजतोय,तरीही समाजाला न्याय मिळाला नाही.आता तरी राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे,सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या मागण्यांशी गद्दारी करणार नाहीत,असे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवार … Read more

‘हे’ काम नाही झाले तर…’या’ कायद्यानुसार होणार दंडात्मक कारवाई !

२७ जानेवारी २०२५ मुंबई : परराज्यांतून येणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती मंत्रालयातील महसूल विभागातील सुत्रांनी सांगितली.राज्यात शहरीकरणाचा वेग वाढल्यानंतर वाळूच्या उपलब्धतेचा तुटवडा जाणवू लागला.शहरीकरणामुळे रस्ते, बांधकाम यासाठी वाळूची उपलब्धता जाणवू लागली. त्यामुळे परराज्यांतून चोरट्या वाळूचा पुरवठा वाढला. या … Read more

यावर्षी शहरातील ३०० जलस्रोत होणार गाळमुक्त ; जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना दिले ‘हे’ आवाहन

२७ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यात जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून यश येत असून, जिल्ह्यात यावर्षी ३०० जलस्त्रोतातील गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.सालीमठ म्हणाले, गतवर्षी १०८ नदी, नाले आणि प्रकल्पांमधून २३ लक्ष … Read more

‘या’ तरुणांनी बसवले वाहतुकीचे नियम धाब्यावर ; धूमस्टाईलला आवर घालणार कोण ?

२७ जानेवारी २०२५ सुपा : अलिकडील काळात शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही चारचाकी व दुचाकींचे प्रमाण वाढत आहे.एक माणूस एक गाडी व एक मोबाईल हे समिकरण झाले आहे.त्यातच आजच्या तरुणांमध्ये धूमस्टाईलने गाडी चालविण्याची क्रेझ निर्माण झाली असल्याने अपघातांत जखमी व मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर वाहन चालविण्याचा परवाना मिळत असला तरी, आज अनेक … Read more

पोलीस प्रशासन झोपेत मात्र चोरांची नजर करडी ; दिवसाढवळ्या होत आहेत…

२७ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : अहिल्यानगरहून श्रीरामपूर येथे पेन्शनचे पैसे घेण्यासाठी आलेल्या एका वृद्ध महिलेची पर्स येथील बस स्थानक परिसरात चोरून त्यातील ३० हजार रूपये लंपास केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेबी हिरामण पवार (वय ६०, हल्ली रा. केडगाव, अहिल्यानगर), मुळ रा. दत्तनगर, श्रीरामपूर, या महिलेचे पती श्रीरामपूर पालिकेत नोकरीला होते.ते मयत झाल्याने … Read more

राज्य शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय ; सर्वसामान्य जनतेसाठी ‘या’ महसूल गावात ‘या’ शिबिराचे आयोजन..

२७ जानेवारी २०२५ : संगमनेर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागासाठी १०० दिवसाचा कृती आराखडा दिलेला आहे. या कृती आराखड्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जाणार आहे,अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत … Read more

उन्हाळी हंगामात मक्याची लागवड करणार आहात का? मग या पाच जातींची निवड करा!

Maize Farming

Maize Farming : उन्हाळी मका लागवड करणाऱ्यांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. मका हे खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामांमध्ये उत्पादित होणारे एक महत्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात या पिकाची लागवड रब्बी आणि उन्हाळी हंगामाच्या तुलनेत खरीप हंगामात अधिक होते. मात्र असे असले तरी मान्सून 2024 मध्ये महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला असल्याने उन्हाळी हंगामातही मका … Read more

घरबसल्या करा ICICI Bank Personal Loan साठी अर्ज ! पहा लाखाला किती पडेल EMI

ICICI Bank Personal Loan

ICICI Bank Personal Loan : आयसीआयसीआय ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखली जाते. एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आणि त्या पाठोपाठ आयसीआयसीआय बँकेचा नंबर लागतो. या बँकेचे करोडो कस्टमर आहेत आणि बँक आपल्या करोडो ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना चालवत आहे. बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज कमी व्याजदरात … Read more

तुरीचे बाजार भाव 12 हजारावरून 7 हजारावर, भविष्यात कसे राहणार दर ?

Tur Rate

Tur Rate : मान्सून 2024 मध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. मान्सून काळात काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली. यामुळे खरिपातील सोयाबीन कापूस पिकाचे नुकसान झाले. मात्र जास्तीच्या पावसाचा फायदा तुर पिकाला झाला असून यंदा तुरीचे बंपर उत्पादन झाले आहे. यामुळे राज्यातील अनेक प्रमुख बाजारांमध्ये तुरीची विक्रमी आवक होत असून जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अहिल्यानगर, नाशिकसह ‘या’ भागात लागवडीसाठी उपयुक्त कांद्याचा नवीन वाण विकसित

Onion New Variety

Onion New Variety : कांदा हे भारतातील एक महत्त्वाचे नगदी पीक. याची लागवड देशातील अनेक राज्यांमध्ये होते. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि कांद्याची शेती हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर व्यवसाय असं म्हंटलं जाते. कारण म्हणजे राज्यातील हवामान कांदा पिकासाठी विशेष पोषक आहे. या पिकाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला … Read more

शेअर बाजारात मंदी राहिली तरी ‘हे’ 3 शेअर गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार!

Share Market News

Share Market News : भारतीय शेअर बाजारात केल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार पाहायला मिळतोय. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरन झाली असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. पण शेअर बाजारात घसरण सुरु असली तरी काही स्टॉक्स आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसतील असा विश्वास तज्ञांकडून … Read more

कॉफी आरोग्यासाठी वरदान की त्रास ? जाणून घ्या फायदे आणि तोटे ! दिवसातून किती कॉफी पिणे योग्य ?

कॉफी पिण्याचे फायदे आणि हानिकारक परिणाम जाणून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे, कारण भारतात आणि जगभरात अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. नवीन संशोधनानुसार, दररोज एक किंवा दोन कप कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु प्रमाण जास्त झाल्यास त्याचे नकारात्मक परिणामही होऊ शकतात. कॉफीचे फायदे हृदयविकाराचा धोका कमी होतो युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, दररोज … Read more

आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आणखी एक मोठी भेट ! ‘हा’ भत्ता वाढणार

8th Pay Commission News

8th Pay Commission News : 2025 च्या अगदी सुरुवातीलाच केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांना चांगली बातमी मिळाली आहे. खरं तर, सरकारने गुरुवारी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून आठवा वेतन आयोगाची मागणी केली जात होती. अखेर कार सरकारने ही मागणी मान्य केली आणि आठवा वेतन … Read more