ग्राहकांची चंगळ,पालेभाज्या झाल्या स्वस्त

२५ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : गेल्या आठवड्यात ढगाळ हवामान होते.यामुळे पालेभाज्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होवू शकतो या शक्यतेने शेकऱ्यांनी तातडीने पालेभाज्या काढण्याची घाई केली.परिपक्व न झालेल्या पालेभाज्या बाजारात दिसू लागल्या.त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली.यामुळे पालेभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहेत.आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. मेथी दहा ते पंधरा रुपयांना जुडी मिळते.शेपू, पालक, करडई … Read more

‘शहराला पूर्णवेळ सक्षम आरोग्य अधिकारी मिळावा’ ; स्मायलिंग अस्मिताच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे मागणी

२५ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : गेल्या काही वर्षांत शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून मध्यंतरी तर नागरिक साथीच्या आजारांनी ग्रस्त झाले होते. याला सर्वस्वी महापालिकेचे आरोग्य अधिकारीच जबाबदार आहेत.कारण कनिष्ठ कर्मचारी खूप मनापासून काम करतात,परंतु वरिष्ठांकडून कामाचे नियोजन नसल्या कारणाने सगळा बोजवारा उडत आहे. त्यामुळे शहराला पूर्णवेळ आरोग्य अधिकारी मिळावा अशी मागणी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी … Read more

पेट्रोल टाकून उसाचा ट्रॅक्टर पेटवून चालकास मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल

२५ जानेवारी २०२५ राहुरी : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास चार जणांनी मिळून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत ट्रॅक्टरवर पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आले.ही घटना राहुरी तालुक्यातील मांजरी परिसरात दि. २० जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की मच्छिद्र गोरख पारखे (वय २५ वर्षे, रा. मांजरी ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या … Read more

मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी

Havaman Andaj

Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा देशात पावसाचा अंदाज दिला आहे. देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून काही ठिकाणी थंडीची तीव्र लाट येणार असा अंदाज या खाजगी एजन्सीने जारी केला आहे. खरे तर डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रासहित … Read more

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांच्यावरील कारवाई वैयक्तिक आकसापोटी : खा. लंके

२५ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगर मनपा आयुक्तांनी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर राज्य शासना अंतर्गत अधिकाऱ्यांचे विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे निर्देशांक रँकिंगमध्ये घसरण झाल्याचे कारण पुढे करून सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.मात्र ही कारवाई वैयक्तिक आकसापोटी केल्याचे पत्र खासदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. या पत्रात नमूद केले आहे की,अहिल्यानगर मनपा … Read more

चिमुकल्यासह आईची गळफास घेऊन आत्महत्या

२५ जानेवारी २०२५ कर्जत : तालुक्यातील खांडवी येथे एक वर्षाच्या चिमुकल्या मुलासह आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.मात्र, आत्महत्येचे कारण समजले नाही.तालुक्यातील खांडवी येथील साक्षी कुमार कांबळे (वय २३) व एक वर्षाचा मुलगा स्वरूप असे मृतांची नावे आहे. याबाबत किशोर परशुराम कांबळे (वय २४) रा. खांडवी ता. कर्जत … Read more

मिरजगावात ‘द बर्निंग बस’ चा थरार ; नगर – सोलापूर महामार्गावरील घटना

२५ जानेवारी २०२५ मिरजगाव : या एसटी बसमध्ये १५ ते २० प्रवासी असल्याने बसचे चालक एस. एस. टोपणधारे व वाहक सांगवे यांच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.बसचे मोठे नुकसान झाले आहे.एसटी बस नाशिक येथून सकाळी ६ वाजता निघाली होती.अहिल्यानगर येथून मिरजगाव बसस्थानकात ही बस आली तेव्हा बस सुस्थितीत … Read more

पक्षातील फुटीरवाद्यांना योग्य वेळी जागा दाखवणार

२५ जानेवारी २०२५ मुंबई : सध्या पक्षात काही राहिलेले नाही,असे सांगणारे काही फुटीरवादी आहेत.सर्वांची माहिती माझ्याकडे आहे.पक्षात राहून फुटीरपणा करणाऱ्यांना पुन्हा थारा देणार नाही.योग्य वेळी त्यांना जागा दाखवणार,असा सूचक इशारा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना दिला. तसेच सोबत निष्ठावंत असलेल्यांनी शिवसेनेची (ठाकरे) हिंदुत्वाची भूमिका तळागाळातील लोकांपर्यंत न्या, असे आवाहन केले.दिवंगत … Read more

राजकीय भूकंप कधी होतोय याचीच वाट बघतोय : शरद पवार

२५ जानेवारी २०२५ कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपल्यात बंद दरवाजाआड कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.कोल्हापूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याबद्दल आपली चर्चा झाली असल्याचा खुलासा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खा. शरद पवार यांनी शुक्रवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला. राज्यातील राजकीय स्थित्यंतराबद्दल बोलताना राजकीय भूकंप कधी होतो आणि कोण कधी बाहेर पडतात,याची मी … Read more

हैवानांचा हैदोस ; लैंगिक अत्याचारांच्या घटनांनी मुंबई हादरली

२५ जानेवारी २०२५ मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महिला, मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.हैवानांचा हैदोस सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून अशा संतापजनक तब्बल चार घटना उघडकीस आल्या. मुंबईत गोरेगावनजीक एका २० वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.तर तीन मित्रांनी एका अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार करत तिचा … Read more

हैवानांचा हैदोस ; पुण्यात महिलेवर सामूहिक अत्याचार

२५ जानेवारी २०२५ पुणे : विमाननगर परिसरात धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेला धमकावून तिला एका घरात डांबून ठेवण्यात आले.या महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एका ३२ वर्षीय पीडित महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संतोष … Read more

ममता कुलकर्णीने घेतला संन्यास

२५ जानेवारी २०२५ महाकुंभनगर : बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने आता आध्यात्मिक जगात पाऊल टाकले असून,शुक्रवारी किन्नर आखाड्याअंतर्गत स्वतःचे पिंडदान करून संन्यास घेतला. किन्नर आखाड्याकडून महाकुंभमेळ्यात दाखल झालेल्या ममताला महामंडलेश्वर उपाधी बहाल करण्यात आली.किन्नर आखाड्यात धार्मिक आणि भौतिक स्वातंत्र्याची मुभा असल्याने आपण त्याची निवड केल्याचे ममताने म्हटले. ५३ वर्षीय ममता कुलकर्णीने संगम तटावर आपल्या हाताने स्वतःचे … Read more

कृषि मंत्री असताना पवारांनी काय केले ? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे टीकास्त्र

२५ जानेवारी २०२५ मालेगाव : शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ‘सहकार से समृद्धी’ असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर शेतकरी हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. साखर कारखान्यांना देखील ऊर्जितावस्था प्रदान करून देण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. शरद पवार यांच्या कार्यकाळात साखर कारखाने पूर्णपणे लयास गेले होते, अशी टीका … Read more

प्रवास महागला ; आजपासून एसटी भाडेवाढ लागू !

२५ जानेवारी २०२५ मुंबई : एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ करण्याचा राज्य सरकारला सादर केलेला प्रस्ताव शुक्रवार, २४ जानेवारी रोजी मंत्रालयात राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.त्यामुळे आता १४.९७ टक्के एसटीची भाडेवाढ करण्यात आली असून ही भाडेवाढ शनिवार पासून राज्यभरात लागू होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. राज्य सरकारने एसटी प्रवासात … Read more

नगरच्या बालगृहातून ३ वर्षापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला पुणे जिल्ह्यातून घेतले ताब्यात

२५ जानेवारी २०२५ नगर : तीन वर्षांपूर्वी नगरच्या बालगृहातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध पोलिस अधिक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने लावला असून त्या मुलीला पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथून ताब्यात घेतले आहे.पुढील कारवाईसाठी तिला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या बाबतची माहिती अशी की, ७ ऑगस्ट २०२२ रोजी अज्ञात इसमाने एका अल्पवयीन … Read more

अहिल्यानगर शहरात घुसला बिबट्या सीनानदी लगत आढळले बिबट्याच्या पावलांचे ठसे

अहिल्यानगर : नगर शहराजवळील आयुर्वेद कॉर्नर ते काटवन खंडोबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीनानदीच्या पुलाखाली २२ जानेवारीला रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास काही युवकांना बिबट्या दिसला. त्यानंतर २४ जानेवारी रोजी दुपारी वनविभागाच्या पथकाने या परिसरात पाहणी केली असता सीना नदी लगतच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. याबाबत वरिष्ठांना अहवाल देत बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात पिंजरा … Read more

बंद पडलेल्या बसला दुचाकीची धडक ; एक ठार ! मदत करणाऱ्याऐवजी बघ्यांची गर्दी ; स्थानिक नागरिकांचा संताप

२५ जानेवारी २०२५ : श्रीगोंदा : तालुक्यातून गेलेल्या जामखेड ते न्हावरा या राष्ट्रीय महामार्गावरील श्रीगोंदा ते काष्टी रस्त्यादरम्यान अपघातांची मालिका सुरूच असून हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे.लिंपणगाव शिवारात श्रीगोंदा ते काष्टी रस्त्यावर बंद पडलेल्या श्रीगोंदा आगाराच्या बसला पाठीमागून दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. या अपघातात दुचाकीस्वार डॉ. नवनाथ अशोक साबळे (वय- … Read more

Adani Green Energy Share : अदानी ग्रुपसोबत मोठा धोका ! शेअरमध्ये मोठी घसरण

Adani Green Energy Share : अदानी समूहासाठी एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. श्रीलंका सरकारने अदानी ग्रीन एनर्जीच्या $448 दशलक्ष किंमतीच्या वीज खरेदी कराराला रद्द केलं आहे. या निर्णयामुळे अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली असून, समूहाच्या जागतिक प्रकल्पांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. श्रीलंका सरकारचा निर्णय श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्या … Read more