Tata कारचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल ! छोटीशी कार पण 42 हजार किलोचे तीन ट्रक…

Tataमोटर्सने Curvv ही SUV काय करू शकते हे एका व्हिडीओच्या माध्यमातून जगासमोर आणले आहे, ह्या कारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोशल मीडियावर टाटांच्या कारची मोठी चर्चा सुरु आहे. टाटा मोटर्सने Tata Curvv च्या शक्तीचे प्रदर्शन करत एक अनोखा स्टंट सादर केला आहे. या एसयूव्हीने 42,000 किलो वजनाचे तीन ट्रक ओढून दाखवले, जो … Read more

Stocks To Buy : आज खरेदी करा हे शेअर्स ! मोठा नफा मिळेल…

बुधवारी भारतीय शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली. निफ्टीने 74.50 अंक (0.32%) वाढीसह 23,033.20 वर व्यवहार सुरू केला, तर निफ्टी बँकने 118.70 अंक (0.24%) वाढीसह 48,689.60 वर व्यवहार सुरू केला. सेन्सेक्सनेही 276.06 अंक (0.36%) वाढीसह 76,114.42 च्या पातळीवर सुरुवात केली. सुरुवातीला तेजी दिसून आली असली तरी काही वेळातच बाजारावर दबाव निर्माण झाला, विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप … Read more

RBI ची मोठी घोषणा ! ‘त्या’ कंपनीची नोंदणी रद्द

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) X10 फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या डिजिटल कर्ज व्यवसायातील अनियमितता आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आढळल्यामुळे मोठी कारवाई केली आहे. या कंपनीची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. X10 फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही पूर्वी अभिषेक सिक्युरिटीज लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. तिला जून 2015 मध्ये नोंदणी प्रमाणपत्र मिळाले होते. कंपनीवर … Read more

आढळा कालवे दुरुस्ती कामात भ्रष्टाचाराचा आरोप ; भाजपचे वाकचौरे यांचा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार अर्ज

२२ जानेवारी २०२५ अकोले : तालुक्यातील अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यांतील १५ गावांना सिंचन उपलब्ध करणाऱ्या आढळा धरणावरील कालव्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सदस्य आणि माजी गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे.त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. आढळा धरणातून उजव्या आणि … Read more

‘मुळा-प्रवरा’ ची तातडीने निवडणूक घ्या ; भोसले यांची मागणी !

२२ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : येथील मुळा प्रवरा वीज संस्थेने निवडणूक घेण्यासाठी लागणारा खर्च देण्यास टाळाटाळ केल्यामुळे संस्थेच्या निवडणूकीचे सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे.दरम्यान,मुळा प्रवरा सहकारी संस्थेची निवडणूक शासनाने तातडीने घ्यावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०१५-१६ ते सन २०२०-२१ पर्यंत … Read more

अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

२२ जानेवारी २०२५ हातगाव : पैठण-पंढरपूर या राष्ट्रीय पालखी मार्गावर हातगाव शिवारात अरुंद रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला तर सोबतची महिला जबर जखमी झाली.महादेव मुरलीधर जऱ्हाड, असे मयताचे नाव आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, महादेव मुरलीधर जऱ्हाड (वय ३५, … Read more

खा.संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन ! राऊत यांना काळे फासणाऱ्याला १ लाख रुपयाचे बक्षीस : जाधव

२२ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नागा साधूबद्दल केलेल्या वक्तव्याचा नगर शहरात शिवसेनेच्या वतीने (एकनाथ शिंदे गट) निषेध नोंदवून,राऊत यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले. दिल्लीगेट वेस समोर झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला,तर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून साधू-संतांचा अपमान करणाऱ्या राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसेच खा. राऊत … Read more

संगमनेरात चक्क पाळीव कुत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल

२२ जानेवारी २०२५ संगमनेर : कुत्रा अंगावर आल्याने झालेल्या अपघातामध्ये महिला जखमी झाल्याने या महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चक्क शहरातील एका डॉक्टरांच्या पाळीव कुत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावाच्या शिवारातील नवशीचा मळा येथे ही जखमी महिला राहते. या महिलेच्या घराजवळच डॉ. पानसरे हे राहावयास … Read more

निवडणूक आली की, विरोधक विकासाच्या गप्पा मारतात : आ. जगताप

२२ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शहराची ओळख ही दोन वेशीच्या आतली होती.गेल्या दहा-बारा वर्षापासून शहराचा विस्तार कसा वाढवता येईल,याकडे नियोजन करीत लक्ष दिले. नागरिकांना विकासाच्या मूलभूत सुविधांपासूनची सर्व कामे मार्गी लावली,त्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत शहराच्या चारही बाजूला नवीन उपनगरे तयार झाली,बुरुडगाव रोड परिसराची विकसित व सुरक्षित उपनगर म्हणून ओळख निर्माण झाली. त्यामुळे शहरातील नागरिक … Read more

पोहेगाव येथे सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा ! नागरीकांनी दरोडेखोरांना पकडले…

२२ जानेवारी २०२५ पोहेगाव : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे काल मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी माळवे सराफ दुकानावर दरोडा टाकून दुकान लुटण्याचा प्रयत्न केला.मात्र नागरीकांच्या सावधानतेमुळे त्यांचा प्लॅन फसला व नागरीकांनी दरोडेखोरांना पकडून चोप दिला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी (दि. २१) सायंकाळी सहा वाजता रस्त्यावरून तीन तलवारधारी तरुणांनी रस्त्यावर नागरीकांना तलवारी … Read more

अबब..तारकपूर परिसरात पावसाळ्यासारखे घरात गुडघ्याइतके पाणी ! मनपाच्या जलवाहिनीतील गळतीने नागरिकांची गैरसोय…

२२ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अबब.. शहरातील तारकपूर परिसरात ऐन पावसाळ्यात जसे घरात पाणी शिरते अन् नागरिकांची दाणादाण होते, तशाच पद्धतीने गुलाबी थंडीत नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.ही किमया निसर्गाने नव्हे तर महानगरपालिकेच्या जलवाहिनीच्या गळतीने झाली आहे.मनपा प्रशासनाचा अनागोंदी कारभार या निमित्ताने पुढे आला आहे. एकिकडे मनपा प्रशासन पाणीपट्टीची भरमसाठ वाढ … Read more

टाकळीभान शिवारात अपघात; ३ ठार, ६ जखमी

२२ जानेवारी २०२५ टाकळीभान : दुचाकी आडवी आल्याने मोपेडस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बोलेरो गाडी लिंबाच्या झाडाला धडकली.यात मोपेडचालक व दोन महिला जागीच ठार तर सहा जण जखमी झाले आहेत.नेवाशातील विवाह सोहळा उरकून बोलेरो टाकळीभानकडे येत असताना काल मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास टाकळीभान शिवारात हा अपघात झाला. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,की श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील … Read more

भुजबळांना मिळाला दिलासा ; ईडीची जामीन विरोधी याचिका फेटाळली

२२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : बहुचर्चित महाराष्ट्र सदन घोटाळ्यासंबंधित हवालाकांड प्रकरणी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली आहे,त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्या. अभय एस. ओका व न्या. उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठाने ईडीच्या … Read more

उरणमध्ये बर्ड फ्लूची लागण ; आरोग्य आणीबाणी जाहीर !

२२ जानेवारी २०२५ मुंबई : मुंबईपासून जवळच असलेल्या उरणमध्ये बर्ड फ्लूचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.उरणमधील चिरनेर गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू पसरल्यानंतर आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार येथील सुमारे एक हजार कोंबड्या मारण्यात आल्या.एका गावकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये मृत आढळलेल्या स्थानिक कोंबड्या आणि कोंबड्यांचे नमुने चाचणीसाठी पुण्यातील सरकारी प्रयोगशाळेत पाठवण्यात … Read more

अध्यापनाचा अनुभव नसतानाही डॉक्टरांना प्राध्यापक बनता येणार ! एनएमसीकडून शिक्षक पात्रतेचे काही नियम शिथिल ; मात्र ‘बीसीबीआर’ पूर्ण करण्याची अट

२२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या डॉक्टरांसाठी खुशखबर आहे.राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक बनण्याचे पात्रता निकष शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.या नव्या बदलानुसार,अध्यापनाचा अनुभव नसताना किंवा किमान अनुभव असलेल्या डॉक्टरांना प्राध्यापक बनण्याची मुभा मिळणार आहे. देशात दिवसेंदिवस वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याने … Read more

किम यांच्या ‘स्पेशल ट्रेन’मध्ये सुंदर तरुणींची ‘प्लेजर ब्रिगेड’ ! हजारो मुलींमधून केली जाते निवड, भरघोस पगार

२२ जानेवारी २०२५ प्योंगयांग : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन वडील किम जोंग-इल यांच्याप्रमाणेच त्यांच्या विलक्षण सवयीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना वडिलांप्रमाणेच हवाई प्रवासाची भीती वाटते आणि त्यामुळे ते वडिलांप्रमाणेच विशेष रेल्वेचा वापर करत असतात. त्यांच्या या रेल्वेतील ‘प्लेजर ब्रिगेड’ कुतूहलाचा विषय आहे. रेल्वेतील या स्टाफसाठी देशभरातून कुमारिका तरुणीच निवडल्या जातात आणि त्या किम आणि त्यांच्या … Read more

नवाब मलिक यांच्याविरोधातील अॅट्रॉसिटी प्रकरण बंद होणार ? समीर वानखेडे – नवाब मलिक वाद,पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती ; मलिक यांना दिलासा !

२२ जानेवारी २०२५ मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) दाखल गुन्ह्याच्या तपासानंतर प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल कनिष्ठ न्यायालयात दाखल केला आहे,अशी माहिती मुंबई पोलिसांनी नुकतीच उच्च न्यायालयाला दिली.त्यानंतर केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी याप्रकरणी दाखल केलेली याचिका … Read more

केजी टू पीजी शिक्षण मोफत व ऑटोरिक्षा चालकांना १० लाखांचा विमा ; भाजपच्या जाहीरनाम्याच्या दुसऱ्या भागात आश्वासनांचा पाऊस !

२२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्लीतील गरजवंतांना ‘केजी टू पीजी’ पर्यंतचे शिक्षण मोफत देणे, ऑटोरिक्षा व टॅक्सीचालकांना १० लाखांचा विमा तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (पीसीएस) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन प्रयत्नांसाठी एकरकमी १५,००० रुपयांची आर्थिक प्रोत्साहनपर मदत देण्याची घोषणा भाजपने मंगळवारी केली. दिल्लीकरांच्या आरोग्य, वाहतूक, वीज, पाणी … Read more