Ahmednagar Politics : सध्या राजकरणात राजकारणी वेगवेगळे डावपेच टाकत आहेत. निडणुकांच्या अनुशंघाने विविध गणिते आखली जात आहेत.
त्याच अनुशंघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गहिनीनाथ गड दौरा गाजला होता. त्यांनी संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत भेट दिली होती.
आता त्या पाठोपाठ लगेचच आमदार रोहित पवार यांनी भगवानगडावर धाव घेतलीये. येथे दर्शन घेत त्यांनी त्यांचे विश्वासू सहकारी अॅड. प्रताप ढाकणे यांच्यासह महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्याशी सुमारे पाऊण तास बंद दाराआड चर्चा केली आहे.
गहिनीनाथ गड व भगवान गड हे भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी गडावरील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज संघटनाची मुहूर्तमेढ रोवली, संपूर्ण राज्याचे लक्ष दोन्ही गडांवरील कार्यक्रमावर वेधले गेले, गड जसा चर्चेचा विषय ठरले, तसे त्यामागील राजकारणही रंगले.
काही वर्षांपूर्वी भगवानगडावर भाषण बंदीचा निर्णय महंतांनी घेतला, त्याचा मोठा फटका माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीला बसला.
त्यानंतर त्यांनी गोपीनाथ गडाची स्थापना करीत भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या सुपे सावरगाव येथे दसरा मेळावा सुरू केला,
दोन दिवसांपूर्वी गहिनीनाथ गडावर येऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासकामासाठी गहिनीनाथ गड दत्तक घेत दरवर्षी येण्याची घोषणा करीत भाविकांची सहानभूती मिळवली.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमासाठी पालकमंत्री या नात्याने घेतलेला सहभाग पंकजा मुंडे यांनाही विचार करायला लावणारा ठरला आहे.
भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची मागील पंधरवड्यात नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यांनी मोदी यांना गडाच्या भेटीचे निमंत्रण देत पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी भगवानगडाचे आशीर्वाद दिले, डॉ. नामदेव शास्त्री यांच्याशी राज्यातील उच्च पदस्थ नेत्यांचे चांगले संबंध आहेत.
या नेत्यांबरोबर ते नेहमीच गप्पागोष्टी करीत असतात. या पार्श्वभूमीवर आ. रोहित पवार यांचा भगवानगड दौरा राजकीय अभ्यासकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे उपस्थित होते.