Aamdar Aashutosh Kale News : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत.
20 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे.
अशा या वातावरणातच कोपरगाव तालुक्यातील सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर गत पाच वर्षांमध्ये विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे.
काळे यांच्या पाठपुराव्यामुळे मतदार संघातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
आता या निधीतून ज्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत त्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
स्वतः आ.आशुतोष काळे यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान आता आपण या निधीमधून कोपरगाव तालुक्यातील कोणकोणत्या रस्त्यांची कामे होणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
तालुक्यातील कोण-कोणत्या रस्त्यांची कामे होणार ?
रा.मा. ६५ मध्ये तालुका हद्द ते रांजणगाव पेट्रोल पंप तसेच झगडे फाटा ते पोहेगाव तालुका हद्द रस्ता सुधारणा करणे (१.२५ कोटी)
रा.मा.७ ते धामोरी-रवंदे-ब्राह्मणगाव-येसगाव-धोत्रे-खोपडी रस्ता (प्रजिमा-४) मध्ये येसगाव ते ब्राम्हणगाव रस्ता सुधारणा करणे (७५ लक्ष),
रा.मा. ७ ते धामोरी-ब्राह्मणगाव-येसगाव-पढेगाव-दहेगाव-बोलका-खोपडी रस्ता (प्रजिमा-४) मध्ये करंजी ते दहेगाव बोलका (नागपूर हायवे पर्यंत) रस्ता सुधारणा करणे (२.४० कोटी)
वाकडी-रामपूरवाडी रस्ता (प्रजिमा-८७) मध्ये रामा ३६ पुणतांबा रोड जंक्शन रस्ता सुधारणा करणे (५० लक्ष)
प्राजिमा ४ ते ब्राम्हणगाव-टाकळी-कोकमठाण-सडे-शिंगवे रस्ता (प्रजिमा ९९) मध्ये नगर मनमाड हाय वे ते सडे-शिंगवे रस्ता सुधारणा करणे (८ .९० कोटी)
रवंदे-पवार गिरणी-संवत्सर-भोजडे-धोत्रे जिल्हा हदद रस्ता (प्रजिमा-५) मंडपी नाला (टाकळी जवळ) पुलाचे बांधकाम करणे (१.२० कोटी)