Abdul Sattar : राज्यात काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. असे असताना सध्या तीन राज्यातील झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला.
त्यामुळे 2024 ची नांदी असल्याचे सूचक संकेत शिवसेना नेते आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. तसेच त्यांनी यावेळी मोठी घोषणा केली आहे. 2024 मध्ये कोण मुख्यमंत्री होणार याबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे.
ते म्हणाले, 2024 मध्ये राज्यामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. यामुळे भाजप नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तार म्हणाले, विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला असला तरी त्याचे चिंतन आणि मंथन करण्यात येईल.
कसबा पोटनिवडणुकीत मतदारसंघात झालेल्या पराभवावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर कसबा पोटनिवड़णुकीतील पराभवाचे कारण शोधले जाईल. तसेच पुढं भविष्यामध्येही असं होणार नाही याबाबत योग्य दिशा ठरवली जाईल.
दरम्यान, सध्या एकनाथ शिंदे यांना अचानकपणे मुख्यमंत्रीपद देण्यात आले. यामुळे 2024 ला भाजपलाच मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे अनेकांना वाटत आहे. मात्र आता शिंदे गट देखील मुख्यमंत्री पदावर दावा करत आहे. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.