Aditya Thackeray : मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे आगामी विधानसभा निवडणुकीत थेट वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, राज ठाकरेंनी आदेश दिल्यास वरळी काय, मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवेन. यामुळे चर्चा सुरू झाली आहे.
असे झाल्यास याचा फटका आदित्य ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वा वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज दिले होते. ते म्हणाले होते की, मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून वरळीतून आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी.
असे असताना आता मनसे देखील आदित्य ठाकरे यांची अडचण करण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरेंना भाजप-शिवसेनेचे कडवे आव्हान असणार आहे. आता मनसेने देखील यात उडी घेतली आहे. आदित्य ठाकरे सध्या एकनाथ शिंदे यांच्यावर रोज टीका करत आहेत.
संदीप देशपांडे म्हणाले, मी राज ठाकरे यांचा कट्टर महाराष्ट्र सैनिक आहे. ते मला जो आदेश देतील त्याप्रमाणे मी वागेन. ते म्हणाले, निवडणूक लढ, तर निवडणूर लढणार. ते म्हणाले, या जागेवरुन निवडणूक लढ, मी त्या जागेवरुन निवडणूक लढवणार.
तसेच राज ठाकरे म्हणाले, तर वरळी काय त्यांनी मला गडचिरोलीमधून मी निवडणूक लढेन. ते जो आदेश देतील तो पाळेन, असेही संदीप देशपांडे यांनी सांगितले. सध्या देशपांडे हे याठिकाणी तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.