राजकारण

अजित पवार उद्या जाहीर करणार आपल्या उमेदवारांची पहिली यादी ! 37 लोकांना उमेदवारी मिळणार, अहिल्यानगर जिल्ह्यात कोणाला मिळणार संधी ?

Ahilyanagar Politics News : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विधानसभा निवडणुकांची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्याची आज घोषणा करण्यात आली आहे. आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आज पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल असे आज जाहीर केले आहे. अर्थातच आता राज्यात प्रचाराला देखील सुरुवात होणार आहे.

तथापि अजून महाविकास आघाडी आणि महायुती मधील घटक पक्षांच्या माध्यमातून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. अजूनही महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये जागावाटपावर खलबत सुरू आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाची उद्या पहिली यादी जाहीर होणार असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर जे आमदार अजित पवार यांच्या गटात सामील झालेत आणि जे अजूनही अजित पवार यांच्या गटात आहेत अशा सर्व आमदारांना आता तिकीट मिळणार आहे.

या सर्व आमदारांना तिकीट मिळणार असून यांची नावे उद्या जाहीर केली जाणार आहेत. ही अजित पवार गटाची उमेदवारांची पहिली यादी राहणार असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन आमदारांचा समावेश राहणार आहे.

अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे आणि अकोले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण यमाजी लहामटे या तीन उमेदवारांचा पहिल्या यादीत समावेश राहणार असा अंदाज आहे.

दरम्यान आता आपण उद्या जाहीर होणाऱ्या अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत कोणकोणत्या उमेदवारांना तिकीट मिळणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत या उमेदवारांचा समावेश

संग्राम जगताप
किरण लहामटे
आशुतोष काळे
अनिल पाटील
राजेश पाटील
दिलीप बनकर
अण्णा बनसोडे
संजय बनसोडे
अतुल बेनके
दत्तात्रय भरणे
छगन भुजबळ
यशवंत माने
धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ
दिलीप मोहिते
दिलीप वळसे
सुनील शेळके
प्रकाश सोळंके
माणिकराव कोकाटे
मनोहर चांद्रिकेपुरे
मकरंद पाटील
नरहरी झिरवाळ
सुनील टिंगरे
अदिती तटकरे
चेतन तुपे
दौलत दरोडा
राजू नवघरे
इंद्रनील नाईक
मानसिंग नाईक
शेखर निकम
अजित पवार
नितीन पवार
बाबासाहेब पाटील
सरोज अहिरे
धर्माबाबा आत्राम
बाळासाहेब अजबे
राजू कारेमोरे

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts