Ahilyanagar Politics : नगर शहरातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अन बातमी समोर आली आहे. निवडणूक लढवण्यास उत्सुक असणाऱ्या संदीप कोतकर यांच्या अडचणीत थोडीशी भर पडली आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोतकर यांना लागू असणारी जिल्हा बंदी उठवण्यात आली होती.
म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे. दरम्यान कोतकर यांनी नुकतीच शाही मिरवणूक काढली. मात्र या मिरवणुकीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
यामुळे माजी महापौर कोतकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संदीप कोतकर हे शिवसैनिक संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी अन शहरातील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात मुख्य आरोपी आहेत.
त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली आहे. पण, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावर जिल्हा बंदी लागू होती मात्र ती जिल्हा बंदी उठवण्यात आली आहे.
दरम्यान ही जिल्हा बंदी उठवल्यानंतर त्यांनी नगर शहरातून भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकी दरम्यान त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. यामुळे कोतकर विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असे स्पष्ट होत आहे.
पण या मिरवणुकीवरूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी माजी महापौर संदीप कोतकरवर नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे.