नगर : अहिल्यानगर विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून प्रचारार्थ विकास यात्रा काढत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी नालेगाव ग्रामस्थ आमदार संग्राम जगताप यांच्या स्वागतासाठी एकवटले होते, ठिकठिकाणी दारासमोर रांगोळी काढून महिला औक्षण करत होत्या नागरिक यावेळी फुलांचा वर्षाव करत फटाक्यांची आतषबाजी करत होते, नालेगाव ग्रामस्थ पहिल्यांदाच आपसातले गटतट बाजूला ठेवून आमदार संग्राम जगताप यांच्या निवडणुकीसाठी एकत्र आलेले पाहावयास मिळाले, शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक गणेश कवडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा दिला
यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, दीपक सूळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवले, संभाजी लोंढे, दत्तात्रय मुदगल, अजय चितळे, नरेंद्र कुलकर्णी, महेश लोंढे, मयूर बोचुघोळ, रवी दंडी, कैलास दळवी, गणेश शिंदे, रणजीत परदेशी, मयूर जोशी, काका शेळके, शांताराम राऊत, मुकुंद वाळके, सुहास पाथरकर, नाना देवतरसे, पिंटू पठारे, नितीन डागवाले, सागर गोरे, सुभाष दारवेकर, गोरख पडोळे, उदय अनभुले, गोपाळ वर्मा, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब शेळके, भास्कर कवडे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
चौकट : नालेगाव ग्रामस्थ माझ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वजण गटतट विसरून एकत्र येत मला पाठिंबा दिला मी केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवला माझ्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत मोठ्या उत्साहात माझे स्वागत केले त्यामुळे माझे मन भारावून गेले, यामुळे मला ऊर्जा मिळाली असून मी अधिक जोमाने शहर विकासासाठी काम करील अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली
चौकट : आमदार संग्राम जगताप यांनी शहरांमध्ये विकासाची कामे मार्गी लावली आहे त्यामुळे माझा विकास कामांना पाठिंबा आहे शिवसेनेचा शहरात उमेदवार नाही त्यामुळे आम्ही हिंदुत्व विचाराचे असल्यामुळे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा देत आहे त्यांच्यामुळे शहर विकासाला गती प्राप्त झाले असून आपल्या शहर नक्कीच विकसित शहर म्हणून ओळखले जाईल असे शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक गणेश कवडे यांनी सांगितले.
चौकट ; अहिल्यानगर विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप विकास यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहे, नागरिकही त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत आहे त्यांनी केलेल्या कामाची शाब्बासकी देत आहे, शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक गणेश कवडे यांनी देखील विकास कामांना पाठिंबा देत आमदार संग्राम जगताप यांच्याबरोबर असल्याचे सांगितले
मतदानापर्यंत नगर शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा देतील ही एक फक्त सुरुवात आहे असे मत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केले.