राजकारण

विधानसभा निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ठरलेत ! अहिल्यानगर जिल्ह्यात कोणाला मिळणार संधी ? संभाव्य उमेदवारांची यादी पहा

Ahilyanagar Politics : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड सध्या महाराष्ट्रात घडत असून राज्याच्या राजकारणातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ठरलेत अशी माहिती हाती येत आहे. खरे तर अजून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही.

पण, शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी सध्या प्रसार माध्यमांमध्ये झळकत असून आज आपण शरद पवार गटाच्या याच संभाव्य उमेदवारांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शरद पवार गटाकडून राज्यातील कोणकोणत्या मतदारसंघात उमेदवार उतरवले जातील, कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत आता आपण माहिती पाहणार आहोत.

शरद पवार गटाच्या या संभाव्य उमेदवारीच्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील उमेदवारांचा देखील समावेश आहे. राहुरी, कर्जत जामखेड आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे भिडू खिंड लढवतील असा अंदाज आहे.

राहुरी मधून पुन्हा एकदा विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांना संधी मिळणार आहे तर दुसरीकडे कर्जत जामखेड मधून विद्यमान आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित दादा पवार तसेच पारनेर विधानसभा मतदारसंघातून नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणीताई लंके निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आपण शरद पवार गटाच्या सर्व संभाव्य उमेदवारांची माहिती पाहूया.

या मतदार संघात शरद पवार गटाचे उमेदवार दिसतील

राहुरी : विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे
कर्जत जामखेड- रोहित पवार
पारनेर विधानसभा मतदारसंघ : खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके
इस्लामपूर- जयंत पाटील
तासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटील
शिराळा- मानसिंग नाईक
उत्तर कराड- बाळासाहेब पाटील
कोरेगाव- शशिकांत शिंदे
फलटण – दीपक चव्हाण
माण खटाव- प्रभाकर देशमुख
शिरुर- अशोक पवार
जुन्नर- सत्यशील शेरकर
इंदापूर- हर्षवर्धन पाटील
आंबेगाव- देवदत्त निकम
शेरी- बापू पठारे
दौंड- रमेश आप्पा थोरात
माळशिरस- उत्तमराव जानकर
काटोल- अनिल देशमुख
विक्रमगड- सुनील भुसारा
घनसावंगी – राजेश टोपे
बीड- संदीप क्षीरसागर
मुंब्रा- जितेंद्र आव्हाड
जिंतूर- विजय भांबळे
अहेरी- भाग्यश्री अत्राम
सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे
उदगीर- सुधाकर भालेराव
घाटकोपर पूर्व- राखी जाधव
परळी- राजाभाऊ पड
लक्ष्मण पवार- गेवराई
आष्टी- भीमराव धोंडे
केज- पृथ्वीराज साठे
माजलगाव- रमेश आडसकर
देवळाली- योगेश घोलप
दिंडोरी – गोकुळ झिरवाळ
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
जामनेर- गुलाबराव देवकर
अकोला- अमित भांगरे
खानापूर – सदाशिव पाटील
चंदगड- नंदाताई बाभूळकर
इचलकरंजी- मदन कारंडे

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts