Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आतापासूनच मोट बांधली जात आहे.
अशातच कर्जत जामखेड मतदारसंघातून एक मोठे अपडेट समोर आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदार संघातून रोहित पवार यांनी विजयी पताका फडकवली होती. त्यांनी भाजपचे राम शिंदे यांचा पराभव केला होता.
दरम्यान, विद्यमान आमदार अर्थातच शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात त्यांचे काका म्हणजेच अजित पवार निवडणूक लढवतील असा अंदाज नुकताच वर्तवला होता.
मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार गट कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्षाला सोडू शकते.
महायुतीमधून अजित पवार गटाने अधिकाधिक जागांवर दावा ठोकला आहे. असे असतानाच मात्र कर्जत जामखेडची जागा ही भाजपासाठी सोडण्याचा निर्णय अजित पवार गटाने घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अजित पवार गटाच्या या भूमिकेवरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अजित पवार गटाने नुकतेच आम्ही कर्जत जामखेडचा आढावा घेतला असून येथे राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा भाजपा वरचढ असल्याचे दिसते. येथून जर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली तर तो उमेदवार रोहित पवारांना चांगली टक्कर देईल असेही अजित पवार गटाकडून सांगितले जात आहे.
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर कर्जत जामखेड मधील राष्ट्रवादीचे बहुतांशी कार्यकर्ते हे शरद पवार साहेबांसोबत तर राहिलेत. या विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडे कार्यकर्त्यांचे बळ तुलनेने कमी असल्याचे दिसते.
हेच कारण आहे की ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याचा निर्णय अजित पवार गटाने घेतला आहे. दुसरीकडे ही जागा भाजपाला देण्याचे अजून एक कारण असल्याचे दिसते. खरेतर दीड महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत बहिणीच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करून मी चूक केली असे विधान केले होते.
कुटुंबात राजकारण आणण्याची काहीच आवश्यकता नव्हती. त्यानंतर त्यांनी बारामती मधून निवडणूक लढवणार नाही असेही म्हटले. यामुळे ते बारामती सोडून कर्ज जामखेड मधून निवडणूक लढवतील की काय अशा चर्चांना उधाण आले होते.
मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कर्जत जामखेड ची जागा भाजपाला सुटू शकते असे संकेत देण्यात आले आहेत. यावरून अजितदादांनी नो पॉलिटिक्स विथ फॅमिली ही नवीन रणनीती आखून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असल्याचे समजते.