Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा जिल्हा. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावरही मोठी पकड. अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणावर मोठमोठ्या नेत्यांचे लक्ष असते. आता अहमदनगर जिल्ह्याचा विचार जर केला तर अहमदनगर जिल्ह्यात १२ विधानसभा मतरदारसंघ आहेत.
म्हणजे अहमदनगर जिल्ह्याला १२ आमदार आहेत. तर विधानपरिषदेवर अहमदनगर जिल्ह्यातील तीन आमदारांची वर्णी लागलेली आहे. यात प्रा. राम शिंदे, सत्यजित तांबे व शिवाजीराव गर्जे या आमदारांचा समावेश आहे. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात आता १५ आमदार झालेत. त्यात पारनेरमधून खा.निलेश लंके यांनी राजीनामा दिला आहे.
आता अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक आमदार होणार का? स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडल्या जणाऱ्या आमदारांची वर्णी लागणे अद्याप बाकी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमदारकी नगर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अरुणकाका जगताप यांनी सलग दोन वळा भूषवली आहे.
त्यांच्या या आमदारकीची मुदत संपूनही आता ७-८ महिने झाले आहेत. आता नव्याने होणाऱ्या या मतदार संघाच्या निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आता आणखी एक आमदार नगर जिल्ह्यास मिळेल असे दिसते.
स्थानिक स्वराज्यची प्रतीक्षा
जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांतील नगरसेवकांचे प्रतिनिधीत्व करणारा आमदार प्रतीक्षेत आहे. मनपा, नगरपालिका जिल्हा परिषद,
पंचायत समित्यांतील सदस्य संख्या व ओबीसी राजकीय आरक्षण या मुद्यांवर निर्णय होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. तिचा निर्णय प्रतीक्षेत आहे. त्यामुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. नगर मनपा, जिल्हा परिषद,
१४ पंचायत समित्या तसेच संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव, नेवासे, जामखेड अशा नगरपालिकांच्या निवडणुका होणे बाकी आहे. त्या झाल्यानंतरच तेथे निवडून आलेल्या नव्या सदस्यांना त्यांचा आमदार प्रतिनिधी निवडता येणार आहे.
या मतदार संघाच्या निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची नावे चर्चेत आहेत असे म्हटले जाते. यात विवेक कोल्हे यांचेही नाव मधेच चर्चेत येत आहे.