राजकारण

महाराष्ट्रात जनावरांप्रमाणे आमदारांची खरेदी-विक्री, माजी मुख्यमंत्र्यांचा नगरमध्ये येत गौप्यस्फोट

Ahmednagar Politics : राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले व वेगळ्याच वळणार गेलेले दिसते. निवडणुकीच्या काळापर्यंत या गोष्टी अधिक तापलेल्या पाहायला मिळतील. दरम्यान आता माजी मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसते.

‘जनावरांच्या बाजारातील व्यवहाराप्रमाणे आता आमदारांची खरेदी-विक्री झाल्याचे महाराष्ट्रात पाहायला मिळाले. आपल्या राजकीय जीवनात असे प्रकार कधीही पाहिले नव्हते.

त्यामुळे राज्यातील जनता येत्या विधानसभा निवडणुकीत पक्ष फोडणाऱ्यांना धडा शिकवणार’ असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी अहमदनगर मधून दिला. ते बुधवारी श्रीरामपूर मध्ये आले होते.

जयंतराव ससाणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला यावेळी ते येथे आले होते त्यावेळी ते बोलत होते.
दिग्विजयसिंह म्हणाले, देशात सीबीआय, ईडी या सरकारी एजन्सींचा गैरवापर सुरू आहे.

महाराष्ट्रात तर पक्ष फोडाफोडीचे राजकारण झाले. उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना आमिष दाखवून फोडले गेले. महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत जातीधर्माच्या राजकारणाला नाकारले. विधानसभेला त्यापेक्षाही मोठे यश मिळेल.

बाप कितीही मोठा असो..
“बाप कितीही मोठा असो, पण वारसदार चांगले असावेत” असे वक्तव्य आ.थोरात यांनी श्रीरामपूरमधील कार्यक्रमात केले आहे. त्यांनी यावेळी कुणाचे नाव घेतले नसल्याने त्यांचे हे वक्तव्य कुणासाठी होते यावरून विविध चर्चा रंगल्या आहेत.

आ. थोरात श्रीरामपुरात बोलताना म्हणाले, “बाप कितीही मोठा असो, पण वारसदार चांगले असावेत”. ज्या कार्यक्रमात लोक चांगले असतील तो कार्यक्रम नक्कीच चांगला होत असतो.

येथे करण ससाणे असो किंवा त्यांना मानणारी तुमच्यासारखी मंडळी असू द्या, संघर्ष, अडचणी असतातच पण तरीही चांगलं काम करता येतं हे तुम्ही दाखवलंय असे ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts