राजकारण

Ahmednagar Politics : विखे-पिचडांच्या व्यूहरचनेत आ. बाळासाहेब थोरात अडकतील ? विधानसभेला आ. थोरातांचा करिष्मा किती चालेल? पहा..

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा हा राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण जिल्हा राहिला आहे. जिल्ह्यातील अनेक घडामोडींवर प्रत्येकच पक्ष लक्ष ठेऊन असतो. जिल्ह्यातील राजकारणावर आ.बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व अबाधित राहिले आहे.

विखे कुटुंबीयांनी देखील वरचष्मा कायम ठेवला. मागील चार दशकांपासून संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व आमदार बाळासाहेब थोरात हे करताहेत. मतदारसंघातील १७१ गावे आणि २५८ वाड्यांतील जनतेशी कायम संपर्क, स्वच्छ प्रतिमा, एकनिष्ठता यामुळे आमदार थोरातांना जनतेने कायमच स्वीकारले आहे.

आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा करिष्मा कायम राहिल्याने तो आगामी विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहील, अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत देशात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी, तर राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अशी लढत झाली.

यात महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिला. त्यात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भूमिका प्रमुख राहिली. राज्यभर प्रचार करताना त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

यात त्यांच्या मतदारसंघातून शिर्डी लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंना अकोलेनंतर सर्वाधिक मताधिक्य दिले. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची भक्कम फळी तयार केली. याचा फायदा निकालात दिसून आला.

थोरात यांची मजबूत पकड
संगमनेर मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था (साखर कारखाना, दूध संघ, शेतकी संघ, शॅम्प्रो, बाजार समिती, बँक, पतसंस्थांवर थोरात यांनी नेहमीच मजबूत पकड ठेवलेली आहे, तसेच शिक्षण संस्थांच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.

आज जवळील तालुक्यांपेक्षा वैद्यकीय सुविधा आणि समृद्ध बाजारपेठ म्हणून संगमनेरलाच अधिक पसंती मिळते. त्यांनी सरकारच्या माध्यमातून देखण्या व सुसज्ज शासकीय इमारती, हायटेक बसस्थानक साकारले आहे. याचबरोबर आमदार थोरातांनी रस्ते, पाणी, रोजगार देण्यातही सातत्याने लक्ष दिले.

उत्तरेत विखे-पिचडांची व्यूहरचना
उत्तरेत आ. थोरातांसोबत विखे कुटुंबीय देखील विधानसभेला महायुतीसाठी अतिशय प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसेल. तसेच अकोले मधून माजी आ.पिचड पितापुत्र देखील थोरातांना विरोध करत महायुतीला सपोर्ट करताना दिसतील.त्यामुळे आगामी विधानसभेला उत्तरेत विखे-पिचडांची व्यूहरचना थोरातांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल यात शंका नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts