राजकारण

Ahmednagar Politics : माजी आ. वैभव पिचड भाजपला सोडत ‘या’ पक्षात येणार? खरी माहिती समोर

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणूक नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांचे निकालही लागले. केंद्रात जरी मोदी यांचे सरकार स्थापन झाले असले तरी महाराष्ट्रात मात्र भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान या घडामोडीनंतर विविध राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

कुणी पक्ष बदल करणार तर कुणी बंडखोर पुन्हा पहिल्या पक्षात येणार आदी. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात एका चर्चेने चांगलाच जोर धरला होता. माजी आ. वैभव पिचड भाजपला रामराम करणार. ते दुसऱ्या पक्षात जाणार आदी चर्चांना उधाण आलेले होते. दरम्यान आता याबाबत भाजपा तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे यांनी भाष्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या विचारावर श्रद्धा असलेले आमचे नेतृत्व माजी आ. वैभवराव पिचड असून ते कोणत्याही परिस्थितीत भाजप सोडणार नाही. त्यामुळे इतर पक्षात जाण्याच्या केवळ अफवा पसरविण्याचे काम काही लोक करत असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे यांनी केले.

आभाळे म्हणाले, अकोले तालुक्यात काही लोक जाणूनबुजून भाजप व माजी आ. पिचड यांची बदनामीकारक चर्चा करत आहेत. या सर्व निरर्थक आहेत. तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माजी आ. वैभवरावपिचड यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करत होतो.

मात्र, सहकारी पक्षातील काही लोकांनी महायुतीचा धर्मच पाळला नाही, असे निदर्शनास आले. उमेदवार लोखंडे यांना मिळालेली मते ही भाजप कार्यकर्त्याने केलेल्या कामामुळेच पडली आहेत. काहीजण वैभवराव पिचड भाजप सोडण्याची निष्फळ चर्चा करुन बदनामी करत आहेत.

पक्ष बदलाच्या वावड्या असून त्याला काहीही महत्व नाही. कोणीही वायफळ चर्चा करुन अकलेचे तारे तोडण्याचे काम करु नये, असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे यांनी दिला आहे.

२०१९ च्या विधानसभेला आले होते भाजपात
पिचड हे २०१९ मध्ये राष्ट्रवादीला रामराम करत भाजपात आले होते. त्यांना भाजपात आणण्यामागे विखे यांचा मोलाचा वाटा असल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगल्या. त्या विधानसभेला आ.लहामटे यांनी पराभव केला होता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts