Ahmednagar Politics News : येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वी अहमदनगर जिल्ह्यात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. श्रीगोंदा, शेवगाव पाथर्डी, कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज काही ना काही नवीन घडामोडी पहायला मिळत आहेत. अशातच नगर शहर विधानसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
नगर शहर विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक मोठी रंजक होणार असे चित्र तयार होत आहे. कारण की माजी महापौर आणि लांडे खून प्रकरणातील आरोपी संदीप कोतकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नक्कीच नगर शहर विधानसभा मतदारसंघात एक मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.
जर कोतकर निवडणुकीच्या आखाड्यात उतरले तर या ठिकाणी एक मोठी जबरदस्त फाईट पाहायला मिळू शकते. विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्यासाठी देखील हे एक मोठे आव्हान राहणार आहे. कोतकर यांच्या एन्ट्रीमुळे विद्यमान आमदारांना नगर शहराचा गड राखणे जिकरीचे होणार आहे. खरे तर कोतकर यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार या चर्चांना उधाण आले ते गणेशोत्सवाच्या काळात.
कोतकर यंदा विधानसभा निवडणूक लढवणार असे संकेत यंदाच्या गणेशोत्सवात पहिल्यांदा मिळालेत. दरम्यान आता माजी महापौर संदीप कोतकर यांनी नगरकरांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहिले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत असून आज आपण संदीप कोतकर यांनी लिहिलेल्या या पत्रात नेमकं काय दडल आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
संदीप कोतकर यांनी लिहिलेले पत्र जशाच्या तसे
माझ्या प्रिय
नगरकरांनो,
नमस्कार…
गेल्या अनेक दिवसांपासून मी माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे आपल्याशी हितगूज करू शकलो नाही. परंतू आता वेळ आलीय बोलायची…म्हणून आपल्याशी हितगूज करतोय… नगर शहर विकसित व्हावं, शहराचे रुपडे बदलावे हे स्वप्न मी पाहिलं. महापौर पदाच्या काळात केडगाववासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न, केडगाव पाणी पुरवठा योजना, शहर पाणी योजना, शहरातील रस्ते, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आपल्या पाठबळामुळे काही प्रमाणात का होईना यश आले.
याचे साक्षीदार तुम्ही आहातच. अजूनही नगर शहरात विकासाची कामे आपल्या पाठबळामुळे काही प्रमाणात का होईना यश आले. याचे साक्षीदार तुम्ही आहातच. अजूनही नगर शहरात विकासाची कामे करण्याजोगे खूप काही आहे. तरुणांच्या हाताला रोजगार, महिलांची सुरक्षितता, शिक्षणासाठी सोयी सुविधा, पाणी, आरोग्य, उच्च शिक्षण, एमआयडीसी उद्योगधंदे यावर काम करणं मला आवश्यक वाटतं.
नगर शहर विकसित व्हावं यासाठी मनापासून खूणगाठ बांधलीय. पण नगर शहराच्या बाबतीत पाहिलेलं स्वप्न काहीस मागे पडलंय. आपल्याशी हितगूज करतांना मनाला खूप वेदना होतायेत. पण आपल्या नगर शहराला पुणे, नाशिकच्या बरोबरीने का होईना न्यायचेय. ही मनोमन इच्छा आहेच. महापौर पदाच्या काळात शहराच्या विकासासाठी नगरकरांनो आपण मला लाख मोलाची साथ दिली.
तुम्ही दिलेली साथ माझ्या आयुष्यात विसरणं कदापीही शक्य नाही, नगरकरांशी जोडलेली माझी नाळ आजही कायम आहे. त्यात थोडासाही बदल झालेला नाही. आणि होणारही नाही. गणपती विसर्जनाच्या वेळी माझ्या एका आवाहनावर तूम्ही हजारोंच्या संख्येने स्पंदन प्रतिष्ठानच्या आयोजित गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. आणि गणपती बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीचे साक्षीदार झालात. हीच गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक नगर शहराला वेगळी दिशा देणारी ठरणार आहे.
माझ्यावर आपले असलेले अतूट प्रेम या मिरवणुकीतून दिसून आले. अन ह्दय भरुन आले. नगरकरांनो आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास हा कदापीही तूटू देणार नाही हा माझा तूम्हाला शब्द आहे. कोणी पुढे जात असेल तर त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच काहीसा प्रयत्न माझ्या बाबतीतही केला जातोय… पण आता मी थांबणार नाही… मागे हटणार नाही….नगरकरांना दिलेला शब्द…. शहर विकासाचं पाहिलेलं स्वप्न… पूर्ण करण्यासाठी मागे हटणार नाही…
शहराच्या विकासावर आपण नंतर बोलूच….!
सत्य परेशान हो सकता है
लेकिन पराजित नही…
लवकरच भेटूयात…
आपला
संदीप कोतकर
माजी महापौर