Ahmednagar Politics News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, सध्या राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेले पाहायला मिळत आहे. खरंतर महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता निवडणुकांकडे साऱ्यांचेचं लक्ष लागून आहे.
अशातच, मात्र अहमदनगर जिल्ह्यात एक वेगळेच राजकारण शिजत असल्याचं दिसतंय. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा एक नवीन वळणावर येणार असे संकेत मिळू लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील अजितदादांचा एक आमदार लवकरच शरद पवार यांच्या गटात सामील होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा सच्चा शिलेदार दादांची साथ सोडणार अशा चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या सहा आमदारांपैकी चार आमदार अजित दादांकडे अन दोन आमदार शरद पवारांकडे गेलेत.
मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा उराशी बाळगून पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अजितदादांची साथ सोडली. लंके यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. यामुळे आता जिल्ह्यात अजित दादांकडे तीनच आमदार राहिले आहेत.
यामुळे दादांची ताकद थोडीशी कमी झाली आहे. अशातच ऐन विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीच दादांकडील जिल्ह्यातील आमदारांची संख्याबळ आणखी कमी होईल असे वृत्त समोर आले आहे. कारण की, अजितदादांचा एक खंदे शिलेदार आता दादांना सोडून शरद पवार गटात जाणार असे बोलले जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपासंदर्भात आणि अन्य बाबींचा आढावा घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे या आढावा बैठकीत पक्षाचे नगर जिल्ह्याचे निवड पदाधिकारी देखील उपस्थित होते. या संबंधित पदाधिकाऱ्यांनी नगर जिल्ह्यातील राजकीय घडामोडीची माहिती शरद पवार यांना दिली.
सध्या अजितदादा यांच्या गटात अकोले, नगर शहर अन कोपरगाव या तीन मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र यातील एक आमदार आता पुन्हा एकदा मोठ्या साहेबांकडे परतणार असे बोलले जात आहे. संबंधित आमदाराने स्वतः शरद पवार यांच्यासोबत या संदर्भात चर्चा केली असून प्राथमिक चर्चेत सदर आमदाराने शरद पवार यांच्या गटात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचा मोठा दावा केला जातोय.
लवकरच ही चर्चा अंतिम रूप घेईल आणि सदर आमदाराची घर वापसी होईल असे म्हटले जात आहे. यामुळे अजित पवार यांच्या गटात समाविष्ट असणाऱ्या तीन आमदारांपैकी कोण पुन्हा मोठ्या साहेबांकडे परतणार ? याकडे अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.