राजकारण

राणीताई लंकेंचे ठरले ! पण शरद पवार गटाकडून नाही.. पवारांना धक्का? पहा..

Ahmednagar Politics : विधानसभेचे बिगुल वाजण्याआधीच सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरु झालीये. अहमदनगर जिल्ह्यात शरद पवार गट आता आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध करण्याच्या अनुशंघाने हालचाली वाढवू लागला आहे.

दरम्यान शरद पवार गट हा अहमदनगर जिल्ह्यातील पाच मतदार संघावर दावा करू शकतो व त्यातील एक मतदार संघ म्हणजे पारनेर. माजी आमदार व सध्याचे खासदार निलेश लंके यांचा हा मतदारसंघ असल्याने शरद पवार गट ही जागा आपल्याकडेच घेईल.

त्यामुळे तेथे सध्या चर्चेत असणारे राणीताई लंके हे नाव शरद पवार गटाकडून आमदारकीला फिक्स आहे अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. परंतु आता त्यांना तिकिट मिळेल पण ते शरद पवार गटाकडून नव्हे तर ठाकरे गटाकडून अशी चर्चा सुरु झालीये.

खा.संजय राऊत यांच्या श्रीगोंदेमधील एका वक्तव्यानंतर या चर्चेला उधाण आले आहे. एकंदरीतच खा. राऊत यांच्या वक्तव्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धक्का बसणार का? असेही बोलले जात आहे.

ठाकरे सेनेचे प्रवक्ते व ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत यांनी पाचपुते व लंके यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस यांची पारनेरच्या उमेदवारीबाबत फारशी हरकत नाही.

फक्त लंके यांची उमेदवारी ठाकरे सेना की शरद पवार गट, एवढाच मुद्दा आहे. मात्र, श्रीगोंद्यावर काँग्रेसने व शरद पवार राष्ट्रवादीचाही दावा असल्याने शिवसेनेने परस्पर साजन पाचपुतेंचे निश्चित केलेले नाव महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरवून गेले आहे.

ठाकरे सेनेचे जिल्हा उपप्रमुख साजन पाचपुते यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी खा. राऊत रविवारी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. स्थानिक राजकारणाचा आढावा घेताना आता राणीताई लंके कोणत्या भाषेत शपथ घेणार, असे सूचक भाष्य केले.

त्यामुळे त्यांनी एकप्रकारे राणीताई लंके यांचे नाव फिक्स केल्याची चर्चा रंगली. पारनेरचे माजी आमदार निलेश लंके आता नगर दक्षिणेचे खासदार झाले आहेत.

त्यामुळे त्यांच्या पारनेरच्या आमदारकीच्या रिक्त जागी आता खा. लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांचे नाव चर्चेत आहे. त्या शरद पवार गटाकडून लढणार की ठाकरे सेनेकडून, हा मुद्दा असला तरी त्यांच्या संभाव्य विधानसभा उमेदवारीला महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडून आक्षेप नाही असे सध्यातरी दिसत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts