राजकारण

आ.जगतापांच्या मतदारसंघात कार्यक्रमांना खा. लंकेंची मागणी वाढली ! संग्रामभैयांच्या डोक्याला ताप की दोघेही एकत्र? पहा..

Ahmednagar Politics : खासदार नीलेश लंके यांनी आता आपली राजकीय पकड घट्ट करण्यास सुरवात केली आहे. ते नगर शहरातील राजकारणात देखील आपले अस्तित्व सिद्ध करतील अशी चर्चा आहे. दरम्यान त्यांना असणारी जनतेची सहानुभूती हे विरोधकांची डोकेदुखी ठरू शकते. आता सध्या नगर शहर विधानसभा मतदारसंघात आ. संग्राम जगतापांइतकेच डिमांड खा. नीलेश लंके यांना देखील आले आहे.

अनेक कार्यक्रमांना उपस्थिती
खासदार नीलेश लंके यांनी नगर शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. ते सध्या शहरातील लहान – मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा शहरात दांडगा जनसंपर्क आहे. त्यांचीही शहरातील बहुतांश कार्यक्रमांना उपस्थिती असते.

नागरिकही आमदार जगताप यांच्यासोबतच आता लंके यांनाही निमंत्रण देतात. त्यामुळे हे दोन्ही लोकप्रतिनिधी योगायोगाने एकत्र दिसत असल्याने नगरच्या कार्यक्रमांत आता लंके, जगताप अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

आ. जगतापांना ताप की एकी?
आ. संग्राम जगताप हे आगामी विधानसभेला अजित पवार गटाकडून उभे राहतील अशी चर्चा आहे. त्यामुळे येथे जर शरद पवार गटाने उमेदवार दिला तर खा. लंके हे त्याच उमेदवाराचे काम करतील. त्यामुळे खा. लंके यांची वाढलेली लोकप्रियता आ. जगतापांना तापदायक ठरेल असे म्हटले जात आहे.

दरम्यान विधानसभेला वेळ असल्याने भरपूर पाणी पुलाखालून जायचे आहे. या काळात काही राजकीय घडामोडी बदलल्या व अजित पवार गट व शरद पवार गट एकत्र आले किंवा जगतापांनी शरद पवार गटाची वाट धरली तर लंके-विखे यांची एकी देखील होऊ शकते अशीही चर्चा आहे.

त्यामुळे आता लंके यांची वाढलेली लोकप्रियता आ. संग्रामभैयांच्या डोक्याला तापदायक ठरेल की दोघेही एकत्र येतील हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

लंके-विखेंमध्ये पुन्हा वादाची ठिणगी
खासदार नीलेश लंके यांनी केडगाव येथे एका कार्यक्रमात विखे परिवार मोठा आहे. त्यांच्यावर आता टीका करणार नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आशीर्वाद घेणार असल्याचे लंके यांनी जाहीर केले होते. विखे यांच्यावर लंके यांनी स्तुतिसुमने उधळली.

मात्र, माजी खासदार विखे यांनी ईव्हीएमच्या तपासणीची मागणी केल्याने खासदार लंके यांनी हा तर सरकारला घरचा आहेर आहे. त्यांनी अजून पराभव स्वीकारला नाही, अशी टीका माजी खासदार विखे यांच्यावर केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts