Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार अहमदनगरमध्ये आले होते. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी जिल्हा बँकेत आघाडीला मतदान न करणाऱ्या संचालकांना इशारा दिला. गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही, असे अजित पवार म्हणाले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असून देखील यावेळी राष्ट्रवादीचा पराभव झाला.
बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल केला होता.
त्यामध्ये त्यांचा पराभव झाला, यावरुन अजित पवार यांनी बँकेच्या संचालकांना इशारा दिला. या निवडणुकीत खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिल्डिंग लावल्याचे सांगितले जात आहे. तसेच या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी एक दिवस अगोदर बैठक घेतली होती.
असे असताना निवडणुकीत घुले यांचा पराभव झाला. त्यावरुन अजित पवार म्हणाले, दिवसा आमच्या सोबत आणि रात्री तिकडे, असे चालणार नाही. अरे जनाची नाही तरी मनाती ठेवायची, तिथे १४ संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. त्या ठिकाणी चंद्रशेखर घुले यांचा पराभव होतो.
अशी माणस आम्हला नको, आम्ही गरिबांकडे जाऊन हात जोडू ती गरीब माणसे विश्वासाने आपल्या बरोबर राहतील, गरीब शब्दाला पक्की असतात, पण पद दिलेली मात्र, चुकीची वागतात, असेही अजित पवार म्हणाले.