Arvind Kejriwal : दिल्लीत सध्या अनेक राजकीय गोष्टी बघत आहेत. सध्या आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांची चौकशी केली जात आहेत. असे असताना आता आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे आज ध्यानधारणेला बसले आहेत. आज सकाळीच अरविंद केजरीवाल यांनी ध्यान करायला सुरुवात केली आहे. यामुळे चर्चा सुरू आहे.
केजरीवाल हे पाच मिनिटं, अर्धा-एक तास नव्हे तर तब्बल सात तास हे ध्यान चालणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सीबीआयने अटक केली आहे. यामुळे दिल्लीत आता राजकीय वातावरण गरम आहे. यामुळे केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.
दिल्लीत शाळा आणि रुग्णालय तयार करणाऱ्यांना पंतप्रधान जेलमध्ये पाठवत आहेत. असे असताना कोट्यवधी रुपये लुटणाऱ्यांना जवळ करत आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. याचा सर्व स्थरातून निषेध केला जात आहे.
याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी केजरीवाल ध्यानधारणेसाठी बसले आहेत. देशातील लोकशाहीबद्दल चिंता वाटत असल्याने होळीनंतर ध्यान धारणा करणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होत. ही देशासाठीची पूजा आणि प्रार्थना असल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, अबकारी धोरणात गैरव्यवहार केल्याचा ठपका दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोजिया यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना सध्या सीबीआयने अटक केली आहे. भाजपाला विरोध करणाऱ्या देशातील बड्या नेत्यांविरोधात अशीच कारवाई केली जात आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.