राजकारण

Atul Bhatkhalkar : ‘उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या सल्ल्याने आता नवा पक्ष स्थापन करावा’

Atul Bhatkhalkar : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे खूप लोकप्रिय आहेत, असे वाटते ना, आताच दोन पोटनिवडणुका झाल्यात एकाही ठिकाणी निवडणूक लढवायला मिळाली नाही. यांना मुंबई महापालिकेत आणि महाराष्ट्रातही किंमत नाही.

यांचा पक्ष राहिला नाही, एवढे ताकदवान आणि लोकप्रिय आहेत तर शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार नवीन पक्ष स्थापन करावा असा खोचक सल्लाही त्यांनी लगावला आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यात हिंमत असेल तर वेगळा पक्ष काढून दाखवावा आणि ५ आमदार तरी निवडून आणावे.

यासह उद्धव ठाकरे यांना शिंदे-फडणीवस सरकार घाबरत म्हणून देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यावर सतत टीका करतात, अशी टीका ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे आणि भाजपवर करण्यात येत आहे. यावर अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्याने त्यांच्यावर टीका केली जाते. यामुळेच शिंदे गट बाहेर पडला. असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मात्र ठाकरे गट हे या आमदारांवर गद्दार म्हणून त्यांना डिवचत असतात. यामुळे याची रोज चर्चा होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं अस म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाजपला साथ देत ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले. यामुळे मोठा राडा बघायला मिळाला होता. येणाऱ्या काळात देखील मोठा संघर्ष बघायला मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts