Bachu Kadu : प्रहारचे नेते माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. धाराशिवनंतर आता नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांना घेरले आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नैताळे येथील कांदा उत्पादक सुनील बोरगुडे यांनी दोन एकर कांदा पिकावर रोटर फिरवत कांद्याचे पीक भुईसपाट केले होते.
या कांदा उत्पादक शेतकऱ्याची आमदार बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा, द्राक्ष निर्याती संदर्भात चर्चा केली भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. तुम्ही या गद्दारांबरोबर जायला नको होतं, असे विचारत त्यांच्यावर टीका केली.
भाऊ विधानसभेत तुम्हीच शेतकऱ्यांची बाजू मांडून आम्हा द्राक्ष कांदा उत्पादकांना न्याय द्या, अशी मागणी ही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. यावेळी कडू यांनी काही न बोलता तेथून काढता पाय घेतला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांना गद्दार म्हटले जात आहे. अनेक ठिकाणी मतदार संघात देखील लोकांना ते पटले नाही. यामुळे गद्दार हा शब्दच आता सर्वांना परिचित झाला आहे. आमदार बच्चू कडू हे देखील शिंदे यांच्यासोबतच बाहेर पडले होते.
आमदार बच्चू कडू यांना तर वैयक्तीक टीकेलाही समोरे जावे लागले आहे. त्यांना काही नागरिकांनी थेट सुनावले आहे. त्यांच्यासमोरच टीकात्मक घोषणाही केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका 80 वर्षाच्या शेतकरी अर्जुन भगवान घोगरे यांनी बच्चू कडूंची गाडी अडवून तुम्ही शेतकऱ्यांशी गद्दारी का केली, असा प्रश्न उपस्थित केला होता.
यामुळे बच्चू कडू यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. आजोबांनी कडू यांनी अपेक्षाभंग केल्याची खंतही व्यक्त केली. घोगरे या ज्येष्ठ शेतकऱ्याने त्यांचा ताफा अडविला. यावेळी बच्चू कडू हे गाडीतून बाहेर आले होते.