राजकारण

Bachu Kadu : आमदार, खासदारांना पेन्शन नको, मलाही पेन्शन नको, राज्यात एकमेव आमदार म्हणतोय मलाही पेंशन नको

Bachu Kadu : सध्या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. हजारो सरकारी कर्मचारी ही योजना लागू करावी म्हणून संपावर गेले आहेत. यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून यामुळे प्रशासनाची कामे खोळंबली आहेत.

याचा सामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे. आमदार खासदारांना लाखालाखाची पेन्शन दिली जाते मग आमची पेन्शन तर हजारांमध्येआहे. अशा परिस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात काय अडचण आहे? असा प्रश्न याबाबत उपस्थित केला जात आहे.

असे असताना आता सरकारची पेन्शन नको, मी आजच शासनाला पत्र पाठवतो, अशी भूमिका माजी मंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे. यामुळे या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. सर्वसामान्य लोकांचे देखील हेच म्हणणे आहे.

राज्यात ८० टक्के आमदार, खासदार यांना पेन्शनची गरज नाही. सरकारने समान न्याय धोरण आणावे. आमदार खासदारांना पेन्शन आहे मग आम्हाला का नाही? मग माझा असा उलट प्रश्न आहे.

जर सगळ्या आमदार खासदारांनी पेन्शन नाकारली, ती घेतली नाही तर मग सरकारी कर्मचारीही पेन्शन नाकारतील. सगळ्या आमदार खासदारांनी हा निर्णय घेतला पाहिजे, असेही बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान, जुन्या पेन्शनमध्ये निवृत्तीवेळच्या पगाराची निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मिळते. यामुळे कर्मचारी ही मागणी करत आहेत. यामुळे मात्र सरकारी तिजोरीत मोठा भार वाढणार आहे. याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts