Balasaheb thorat : काँग्रेसचे नेते बाळासाहेब ठाकरे सध्या नाराज आहेत. त्यांनी राजीनामा देखील दिला आहे. असे असताना पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडमधील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यात बाळासाहेब थोरात यांचाही समावेश करण्यात आलेला आहे.
आता ते ही जबाबदारी स्वीकारणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या थोरात हे मुंबईत असून त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे ते सध्या वैद्यकीय विश्रांती घेत आहेत, त्यामुळे थोरात हे कसबा पेठ आणि चिंचवडमधील प्रचाराच्या रणधुमाळीत उतरणार का? हा खरा प्रश्न आहे.
बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केले. नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या आरोपामुळे बाळासाहेब थोरात हे दुखावले आहेत.
दरम्यान, नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर कमालीचे नाराज असलेले थोरात हे नवी जबाबदारी स्वीकारून ती पार पाडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडमधील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांचा या यादीत समावेश आहे. काँग्रेस ही निवडणूक ताकदीने लढणार आहे.