राजकारण

Balasaheb Thorat : अहमदनगर जिल्ह्यात होणार हे दोन राजकीय भूकंप ? एक तांबे दुसरे थोरात…

Balasaheb Thorat : सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेस कमिटीमध्ये मोठी घुसपुस सुरू होती.

असे असताना आता पुढे काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. यामुळे बाळासाहेब थोरात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या ते राजकारणातून संन्यास घेतील अशी चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. जयश्री थोरात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील अशीही चर्चा सुरू आहे.

सत्यजित तांबे यांनीही अजून आपली भूमिका स्पष्ट केली नाही. यामुळे आता आगामी काळात नगरचे राजकारण वेगळ्या वळणावर जाणार हे नक्की. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात दोन राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. नाशिक मतदारसंघात कोणाला उमेदवार देयची यावरून हा वाद सुरू झाला होता.

अखेर सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. दरम्यान, सत्यजीत निवडून देखील आले होते. यानंतर थोरात विरुद्ध पटोले हा वाद समोर आला होता. पटोलेंबरोबर काम करणं शक्य नाही असे थोरात यांनी पत्र लिहून हायकमांडला कळवले होते.

असे असताना मात्र आता थोरात त्यांनी थेट विधिमंडळ पक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सत्यजित तांबे यांना थोरात यांच्या बंडाची कल्पना असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात याबाबत तांबे आणि थोरात मिळून निर्णय घेतील, असे सांगितले आहे.

बाळासाहेब थोरात हे आधी प्रदेशाध्यक्ष होते त्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळाले होते. प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली होती, राजकारणात त्यांना मोठा अनुभव आहे. तसेच एक निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. राज्यात जर काँग्रेसचे सरकार आले असते तर त्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली असती.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts