Balasaheb Thorat : काही दिवसांपूर्वी राज्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील याबाबत माहिती दिली होती. असे असताना आता बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांना तोंडघशी पाडले आहे. मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितले? असा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
यामुळे आता अजित पवार यांची चांगलीच अडचण झाली आहे. ते म्हणाले, पक्षस्तरावर या संदर्भात चर्चा सुरू आहे. सर्वच पक्षांत हे असेच चालते. मात्र, काँग्रेससंबंधी याची जास्त चर्चा होते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, हा वाद विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये संघर्ष झाला होता. यावेळी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वाद असल्याचे सांगितले गेले.
यावेळी थोरात यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले थोरात आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात मतभेद झाले, अशा बातम्या येत होत्या.
दरम्यान, काँग्रेसचे जयपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात देखील दाखल झाले आहेत. यावेळी ते बोलत होते. यामध्ये काँग्रेसचे बडे नेते उपस्थित आहेत. यामध्ये आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार आहे.