Balasaheb thorat : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. यामुळे बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला होता. असे असताना आता ते राजीनामा मागे घेण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, आता ते सर्व सोडून द्या, जे झालं ते झालं. आता आम्ही फक्त पक्षाला पुढे घेऊन जाणार आहोत.
मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटल्यानंतर या वाद संपू शकतो, असे सूचक वक्तव्यही बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. प्रत्येक पक्षात काहीना काही मतभेद असतात. मग डॅमेज कंट्रोलचा प्रश्नच उद्भवत नाही. पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करु, असेही ते म्हणाले.
यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसमधील हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी मुंबईत बाळासाहेब थोरात यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
थोरात म्हणाले, आमच्यातील चर्चा तुम्हाला सांगू शकत नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्रातून मी माझी खंत मांडली होती. आता मी त्यांना भेटण्यासाठी दिल्लीत जाणार आहे. ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. कॉंग्रेस कुटुंबातल्या अंतर्गत बाबी आहेत.
पाटील यांनी माझ्याशी सविस्तर चर्चा केली. काँग्रेसच्या रायपूरच्या परिषेदेसाठी मी उपस्थित राहिले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी मी पक्षाचे नेते राहुल गांधी, नेत्या सोनिया गांधी यांच्यासमोर सविस्तर चर्चा करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.
दरम्यान, सत्यजीत तांबे आणि सुधीर तांबे यांचे निलंबन हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला होता. विधानपरिषद निवडणूक व अपक्ष आमदार सत्यजीत तांबेंबाबत नाशिक पदवीधर निवडणुकी दरम्यान काँग्रेसमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडून आले.