Bhagatsingh Koshari : माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केल्याने चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या परिवारावर माझे प्रेम होते. ते काही मोठे राजकारणी वाटत नव्हते. उद्धव ठाकरे राजकारणात कुठे अडकले? ते एक संतपुरुष आहे.
उद्धव पाच पानांचे पत्र लिहित. जर सरळ माणूस नसता. जर सज्जन माणूस नसता. तर त्यांनी असे काम काम केले असते का? ते राजकारणी नव्हते. पण, त्यांना सत्ताकारणात चुकीने किंवा फसवून आणले गेले. पण, बाकी जे झाले ते चुकीचे झाले, असे कोशारी यांनी म्हटले आहे.
तसेच आदित्य ठाकरे यांनी माझी भेट घेऊन महाविकास आघाडीचे समर्थन असल्याचे सांगितले. मी त्यांना सांगितले, समर्थन असेल तर तशी चिट्ठी द्या. अभि यादी या रही है म्हणत आदित्य यांनी दहा बारा वेळा बाहेर फेऱ्या मारल्या. बिचारा आदित्य मला याची दया आली. त्यांनीच वेळेत यादी दिली नाही त्यात माझी काय चूक, असेही ते म्हणाले.
तसेच पहाटेच्या शपथविधीबाबत ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माझ्याकडे सकाळी आले. येताना आपल्या माणसांची नावाची यादी घेऊन आले. ती यादी पाहून मी त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली, यात माझी काय चूक? असेही ते म्हणाले.
कोणाकडे किती बहुमत आहे याची चाचणी सभागृहात होते. सभागृहातच बहुमत सिद्ध होत असते. त्यामुळे मी त्यांना बहुमत चाचणीसाठी वेळ देतो असे त्यांना सांगितले होते. पुढे त्यांचे गणित बिघडले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी विश्वास ठेऊन मला महाराष्ट्रात पाठवले. इथल्या लोकांचे मला प्रेम मिळाले, असेही ते म्हणाले.