राजकारण

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अहिल्यानगर जिल्ह्यातून कोणाला मिळाली संधी ?

BJP Candidate List : महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात मोठमोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत.

महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहेत. अशातच महायुतीचे जागावाटप अंतिम झाले असल्याचे समजते. कारण की भारतीय जनता पक्षाने आज आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे आहेत.

भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत अनेक नव्या नावाचा समावेश पाहायला मिळतोय. बीजेपी ने काही विद्यमान आमदारांना तिकीट नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे या यादीतून दिसते.

भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील उमेदवारांचा देखील समावेश आहे. कर्जत जामखेड, शिर्डी, शेवगाव, राहुरी आणि श्रीगोंदा या जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उतरवले जाणार आहेत.

शेवगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका राजळे, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे, शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील, राहुरी मधून शिवाजीराव कर्डिले, श्रीगोंदा मधून श्रीमती प्रतिभा पाचपुते यांना तिकीट देण्यात आले आहे.

उमेदवार ठरवताना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर चष्मा असल्याचे दिसते. दरम्यान आता आपण भाजपाने जाहीर केलेल्या या 99 उमेदवारांची यादी पाहुयात.

शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
राहुरी – शिवाजीराव कर्डिले
कर्जत जामखेड – राम शिंदे
शेवगाव – मोनिका राजळे
श्रीगोंदा – श्रीमती प्रतिभा पाचपुते
जामनेर – गिरीश महाजन
चिखली -श्वेता महाले
खामगाव – आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) – संजय कुटे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
देवली – राजेश बकाने
हिंगणघाट – समीर कुणावार
वर्धा – पंकज भोयर
हिंगना – समीर मेघे
नागपूर दक्षिण – मोहन माते
नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोरा – विजय रहांगडाले
गोंदिया – विनोद अग्रवाल
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव – अशोक उडके
यवतमाळ – मदन येरवर
किनवट – भीमराव केरम
भोकर – क्षीजया चव्हाण
नायगाव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड
हिंगोली – तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डीकर
परतूर – बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
बगलान – दिलीप बोरसे
चंदवड – राहुल अहेर
नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
नालासोपारा – राजन नाईक
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
मुरबाड – किसन कथोरे
कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
डोंबिवली – रवींद्र चव्हाण
ठाणे – संजय केळकर
ऐरोली – गणेश नाईक
बेलापूर – मंदा म्हात्रे
दहिसर – मनीषा चौधरी
मुलुंड – मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम
विले पार्ले – पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर
पनवेल – प्रशांत ठाकूर
उरन – महेश बाल्दी
दौंड- राहुल कुल
चिंचवड – शंकर जगताप
भोसली -महेश लांडगे
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले
कोथरुड – चंद्रकांत पाटील
पर्वती – माधुरी मिसाळ
केज – नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा – अभिमन्यू पवार
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण – अतुल भोसले
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कणकवली – नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
इचलकरंजी – राहुल आवाडे
मिरज – सुरेश खाडे
सांगली – सुधीर गाडगीळ

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts